पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय १९३ करून राहील तर तिला ( नवऱ्याचा ) वारसा घेण्याचा अधिकार आहे. अनेक पत्न्या असल्यास त्यांनीं तें द्रव्य विभागून घ्यावें. पत्नी नसल्यास कन्या [ वारसा घेते ]. याविषयीं मनुः ( अ० ९ श्लो० १३० ) 'जसा आपण स्वतः तसाच आपला पुत्र. कन्या पुत्राच्याच योग्यतेची. तेव्हां स्वतः- प्रमाणेंच जी कन्या ती विद्यमान असतां [ त्याच्या ] धनाचा वारसा दुसरा कोणी कसा घेईल? " एकीहून जास्ती कन्या असल्यास त्यांनी द्रव्याचे वांटे करून [ सारखे ] विभाग घ्यावे. कन्यांपैकी कांहीं लग्न झालेल्या असतील व कांहींचें लग्न होणें असेल तर पुढील कात्यायनस्मृतीचे आधारानें अविवाहित कन्यांस वारसा मिळेल " नवयानें मागें ठेविलेले द्रव्य ( वारसा ) त्याचे विश्ववेनें, ती अव्यभिचारिणी असल्यास, घ्यावें. तशी पत्नी नसल्यास अविवाहित कन्या असेल तर तिनें घ्यावें. " विवाहित कन्यां - मध्ये कोणी सधन व कोणी निर्धन असेल तर निर्धन असेल तीसच वारसा मिळेल. याविषयी गौतमवचन " [ मातेचें ] स्त्रीधन अविवाहित व अप्रतिष्ठित कन्यांकडे जातें. " ' अप्रतिष्ठिताः ' याचा अर्थ निर्धन. परंपरागत सांप्रदायास अनुसरून चाल- णारांचे मतें या वचनांतील 'स्त्री' शब्दानें पिताही समजावयाचा. 66 २९४ २९3 कन्या नसल्यास दौहित्र ( कन्येचा पुत्र ) वारसा घेतो. याविषयीं विष्णुस्मृति " [ ज्या पुरुषाचे ] पुत्र किंवा पौत्र मागें राहिलेले नसतील त्याचें द्रव्य दौहित्र घेतील; [ कारण ] पितरांचे पारलौकिक कर्मकर्तृत्वाचे संबंधानें दौहित्र हे पौत्रांप्रमाणेंच मानलेले आहेत. " दौहित्र नसल्यास धनाचा वारसा बाप घेतो. बाप नसल्यास माता द्रव्य घेते. याविषयीं कात्यायन " पुत्रसंतान नसलेल्या पुरुषाचा [ वारसा ] कुळाचें नांव रा- खणारी त्याची पत्नी, किंवा [ तिच्या अभावीं ] कन्या ही [ घेते ]. [ कन्येच्या ] अभावीं बाप, आई, किंवा भाऊ आणि पुतणे हे वारस धरलेले आहेत. २५ त्याचप्रमाणें विष्णु- स्मृति “ अपुत्राचें द्रव्य त्याचे पत्नीकडे जाते; ती नसल्यास कन्यांकडे; कन्या नसल्यास दौहित्रांकडे ; दौहित्र नसल्यास बापाकडे; बाप नसल्यास आईकडे ; आई नसल्यास भा - वांकडे ; भाऊ नसल्यास त्यांचे पुत्रांकडे ( पुतण्यांकडे ); पुतणे नसल्यास सकुल्यांकडे ( कुळांतील सगोत्र पुरुषांकडे ). " पण विज्ञानेश्वर असें ह्मणतो ( याज्ञ० स्मृ० १३५, १३६ यांतील वचनांत ): २९३ मि० ० ० ५० पृ० २; बी० प० २५१ पृ० १; क० वि० ; व्य० मा० . २९४ बी० प० २०५ पृ० १ ; मि० व्य० प० ५९ पृ० २. २९५ मि० व्य० प० ५७ पृ. २; बी० प० २९० पृ० २; मिताक्षरा प्रथांत हें बचन बृद्दाद्विष्णु- स्मृतीचे आहे असे लिहिलेले आहे. २५