पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहाविषयीं. ४३ यांत मामाच्या मुलीशी विवाह झाल्याची उदाहरणें हमेशा आढळतांत. हे जे सर्व विवाह लोकांनी मान्य केले आहेत, ते आतां सापिंड्याचा अतिक्रम होतो ह्मणून अशास्त्र असे कोर्टे ठरवूं लागळीं, तर कित्येक औरसांस अनौरस ठरवावें लागेल व त्यापासून कायकाय घोंटाळे होतील याचा अंदाज करितां येत नाहीं. मला वाटतें कीं, हिंदुधर्मशास्त्रा- संबंधी निर्णय करण्याच्या कामी लोकरिवाजाचें ज्ञान साधारणतः अत्यावश्यक आहे क विवाह आणि दत्तविधान या प्रकरणी तर त्यावांचून अनिर्वाहपक्षच आहे. सदरच्या हाय कोर्टाच्या ठरावांत मि. स्टीलच्या ग्रंथांतील कांहीं पत्रांचा आधार दिलेला आहे त्यांत १६५ हें पत्र आहे त्यावरही भाचीशी विवाह दारिद्र्यामुळे होतात असे सांगितलेले आहे; परंतुळींबरोबर नाहीं; कारण राजे सर माधवराव यांच्या सारख्यांच्या कुटुंबांत अशा प्रसिद्ध चाली आहेत; आणि जरी तसे नसते, तरी सापिण्ड्यसंकोच वेद- वचनांनी सिद्ध आहे; आणि कदाचित् वेदवचनें नसती तरीही बहुत वर्षे जातीनें मान्य केलेल्या विवाहास आतां दोष लावून विधवेनें दत्तक घेतलेला रद्द ठरणें है अन्याय्य आहे. ( ५२ . ) येथपर्यंत साधारणतः स्मृतिशास्त्राप्रमाणेच हल्लीं लोक चालत नाहींत व चालू आचारांत व त्या धर्मशास्त्रांत फार भेद आहे इतक्याचें दिग्दर्शन केलें. या- विषयीं आणखी विस्तार पुढें येईल. ६३ • ( ५३. ) आतां हिंदूतील विवाह हा कराराच्या स्वरूपाचा अशीं जी दुसरी गोष्ट कांहीं लोक गृहीत घेऊन चालत आहेत. तिजविषयी लिहितों. हिंदूत विवाह हा धर्मसं- स्कारांपैकी एक आहे, सबच कराराचे नियम त्यास लागू होत नाहींत, वः ह्मणूनच जन्मवेड्याचेंही लग्न हिंदूंत संभवते. तसेच सन १८७५ चा आक्ट ९ कलम २ प्रमाण प्राप्तव्यवहार मनुष्याचें वय ठरविलेले आहे त्यांत हा वयाचा नियम लग्नास लागू नाहीं ह्मणून लिहिलेले आहे. यावरून करार करणारा वयांत आलेला असला पाहिजे हा करारशास्त्राचा नियम विवाहास लागत नाहीं असे स्पष्ट दिसतें. यावरून नवऱ्याच्या इच्छेवांचून विवाह तुटणारच नाही असा सिद्धांत हल्लीं कोर्टें कारतात, त्याला आधार काय ते समजत नाहीं. ६२ ६१. मार्लोस डायजेस्ट. व्हा. १ पा. २९०. म. हा. रि. व्हा. १ पा. २१४ टीप. 66 ६२. या विषयाच्या संबंधानें स्टील साहेबांनी लिहिले आहे की, ( आवृत्ति १ ली प० १७३।१७४ ) “ उंच वर्णांत स्त्रीनें व्यभिचार, मनुष्यहत्या, किंवा असें महापातक केल्यास नवरा तिला टाकूं शकतो. स्त्री नवऱ्याच्या इच्छेवांचून त्याला सोडून जाईल अगर जातिभ्रष्ट होईल तर त्या स्त्रीचें पोषण करण्याची जबाबदारी नवऱ्यावर नाहीं.