पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ व्यवहारमयूख. १९० एकत्र झालेल्या मृताच्या स्त्रियांविषयीं आहे असे मदनाचे ह्मणणे आहे. कात्यायन ह्मणतो “ स्त्रीचा नवरा स्वर्गस्थ झाला असतां स्त्रीस अन्नवस्त्र मिळावें; परंतु तो अ- विभक्त असून मरेल तर त्याचे स्त्रीस तिच्या हयातीपावेतों त्याचा भाग मि- ळावा. ” ‘अविभक्त ' असा शब्द स्मृतींत आहे तो संसृष्टाचे उपलक्षण समजावें. ' तु ' (तर) असे पद आहे त्याचा अर्थ ' वा' (अथवा ) ह्मणजे विकल्प समजा- वयाचा. यापासून दोन पक्ष उत्पन्न होतात; त्यांत दुसरा पक्ष पत्नीच्या ( सशास्त्र लग्ना- च्या बायकोच्या ) संबंधाचा, व पहिला ठेवलेल्या बायकोच्या संबंधाचा, असें मदनाचे मत आहे; परंतु अशी व्यवस्था करण्यास आधार नाहीं; कारण तोच स्मृतिकार ( कात्यायन) यासंबंधाचे नियमाची खरी व्यवस्था सांगतो " घरांतील वडील माणसांची शुश्रूषा. अंतःकरणपूर्वक करण्यांत जी स्त्री तत्पर असेल तिला आपल्या योग्य विभागाचा उपभोग घेण्यास अधिकार आहे. पण ती आपले कर्तव्य करणार नाहीं तर तिला अन्नवस्त्र मात्र द्यावें. " २९१ स्मृतीत 'गुरु' पद आहे त्याचा अर्थ सासरा 'वगैरे. त्यांच्या [ वडिलांच्या ] इच्छा असल्यास त्या स्त्रीस विभाग मिळतो नाहीं तर केवळ अन्नवस्त्र. तोच (कात्यायन) स्मृतिकार ह्मणतो “ अपकारक कर्म करणारी, निर्लज्ज, धनाचा नाश करणारी, व व्यभिचार कर्मांत निमग्न झालेली अशी स्त्री असेल तिला धन घेण्यास अधिकार नाहीं. ९२ “ पतित स्त्रियांस हाच नियम लागू करावा; त्यांस अन्नव- स्त्र द्यावें व त्यांनी घराजवळ [निराळ्या जाग्यांत ] राहावें " असें एक वचन आहे तें नवरा जिवंत असतां त्यांस लागू असें कांहीं ग्रंथकारांचें मत आहे. वरील दुसन्या वच- नाँत ' एतमेवविधिं ' ( हाच नियम ) असे आहे त्याचा अर्थ, पतितत्यागरूप [ व्यभि... चारिणी स्त्रीस लागू जो नियम तोच ]. हारीतस्मृतीप्रमाणें, व्यभिचार करणारी आहे इतका संशय असला तरी स्त्रीला अन्नवस्त्र मात्र द्यावें. वचन “ स्त्री आपल्या तारुण्यांत विधवा होऊन व्यभिचारिणी झाल्याची शंका येईल [ तर ] आयुष्याचे दिवस लोटण्यापुरतें तिला अन्न वस्त्र द्यावें. " वचनांत 'कर्कश' पद आहे त्याचा अर्थ मिताक्षराग्रंथाप्रमाणे, (विज्ञानेश्वर मिताक्षरा व्य ० श्लो० १३६) व्यभिचारिणी झाल्याबद्दल शंका जीविषयीं आली असेल ती स्त्री. ह्मणून सिद्ध होतें कीं, पत्नी ( शास्त्राप्रमाणे लग्न झालेली स्त्री ) इंद्रियनिग्रह २९० वी० प० २०३ पृ० ; क० वि० २९१ वी० प० २०३ पृ० २; क० वि०. २९१ वी० प० २०३ पृ० २ क वि० ; व्य० मा० . क्त ' असें आहे, परंतु माधवाचे मंथांत 'अपचार ' असें आहे. या वचनाचे आरंभी ' अपकारक्रियायु-