पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १९१ २८७ २८५ तें, असें स्मृतिद्रिका . ग्रंथांत सांगितलें आहे. माधव ह्मणतो कीं, दायादांचे संम- तावांचून स्थावर विकण्याचा अधिकार स्त्रीस नाहीं इतकाच ह्या वचनाचा अर्थ. " नव- च्याच्या मरणानंतर आपल्या कुळाचें नांव राखण्याच्या स्त्रीस तिच्या हयातीपावेतों तिच्या नव-याच्या हिश्शाची मालमिळकत तिला मिळावी; परंतु त्या मिळकतीचें दान करण्यास, ती गहाण टाकण्यास, किंवा विकण्यास तिला मालकी - नाहीं " २८६ असें कात्यायनाचें वचन आहे तें, स्तुतिपाठक, चारण व अशाच प्रकारचे हलके लोकांस द्रव्य देण्यास प्र- तिबंध करण्यापुरते आहे असें समजावें; कारण पारलौकिक हिताच्या प्राप्तीसाठी दान व त्याच हेतूस्तव मालमत्ता गहाण ठेवणें वगैरे हीं होतातच. कारण 'स्थावर व जंगम इत्यादि वर लिहिलेल्या प्रजापतिस्मृतीत स्पष्ट सांगितलेच आहे. शिवाय “ व्रतें व उपवास करण्यांत निमग्न, ब्रह्मचर्यव्रताचे धर्मांनीं वागणारी, व निरंतर इंद्रियदमन कर- ण्यासाठी तत्पर, वदान करण्यांत रत अशा विधवा स्त्रीस पुत्र नसेल तरी ती स्वर्गास जाईल असें कात्यायन वचनही त्यास प्रमाणभूत आहे. परंतु “ मृताची और्ध्व- देहिक क्रिया करण्यासाठी खर्च येईल तो व स्त्रिया आणि चाकर यांच्या निर्वाहा- साठीं जें जरूर असेल तें वजा करून बेवारस मालमत्ता राजाकडे जाते; पण बेवारस श्रोत्रिया द्रव्य दुसन्या श्रोत्रियांस द्यावें असें कात्यायन ह्मणतो, आणि नारदाचे वचन आहे की “स्वधर्मास अनुसरणाऱ्या राजाने ब्राह्मण शिवाय करून मृतां- च्या बायकांस चरितार्थासाठी कांहीं तरी द्यावें. हा वारशाचा विभाग करण्याचा नियम होय. ११२८८ पण हीं दोन्ही वचनें ठेवलेल्या बायकांच्या संबंधाचीं आहेत, कारण पत्नी (लग्नाची बायको ) असा शब्द वरील स्मृतींत दृष्टीस येत नाहीं. नारंद ह्मणतो की "भावांतून कोणी अपत्य न होतां मरेल, किंवा कोणी सन्यास स्वीकारील तर त्याच्या बायकोचें स्त्रीधन शिवाय करून बाकीचें त्याचें द्रव्य इतर भावांनीं वांटून ध्यावें व त्याच्या बायकांनीं आपल्या पतीची शय्या [ निर्दोष ] राखल्यास ( पतिव्रता- धर्मानें त्या चालतील तर ) त्याच्या हयातीपावेतों त्यांस त्यांनी ( इतर भावांनी ). अन्न- वस्त्र द्यावें. त्या बायका तशा न चालतील तर त्यांचें अन्नवस्त्र बंद करावें. १९२८९ पण हें वचन अविभक्त किंवा संसृष्ट या प्रकरणांतील असल्यामुळे अविभक्त किंवा पुनः २८५ वी० प० १९३ पृ० २. २८६ क० वि० ; व्य० मा० . २८७ वी० प० १९४ पृ. २; क० वि०. २८८ मि० व्य० प० ५८ पृ० १; व्य० मा० . २८९ वी० प० १९५ पृ० २; व्य० मा० ; क० वि०. माधव व कमलाकर या ग्रंथांत 'इतरासु तत् ' असा पाठ आहे. 'इतरासु तु' असा येथे पाठ आहे, परंतु