पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ व्यवहारमयूख. पांचा वगैरे प्रतिग्रह ( दिलेल्या वस्तूंचा स्वीकार) निरनिराळा केला असेल तर मात्र त्या देणगीवर दानाचा स्वीकार करणाऱ्यांचे निरनिराळें स्वामित्व येईल. परंतु अविभक्तां- मधील एकानें दानाचा स्वीकार केल्यास स्वीकृत वस्तूवर समाईक मालकी उत्पन्न होते. ' दानधर्म' ह्मणजे लेख पत्र वगैरे. 'आगमः ' ह्मणजे व्याज मुद्दलसुद्धां रक्कम घेणें. बृहस्पति ह्मणतो “ ज्याचें उत्पन्न, खर्च व गहाणाचा व्यापार ही निरनिराळीं आहेत, व खुद्द ज्याचे दरम्यान देणें, घेणें व व्यापार असतील ते निःसंशय विभक्त आहेत " ' वणिक्पथं ' ह्मगजे वैश्याचा व्यापार. याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० ५२ ) " विभाग होण्यापूर्वी भावाभावांत, पतिपत्नीमध्यें, आणि पिता व पुत्र यांमध्ये जामीनकी, देवघेव, किंवा साक्ष हीं होणें नाहींत असें सांगितलेले आहे. १२७० हीं लक्षणें जेथें नाहींत तेथे दिव्यच केलें पाहिजे, कारण त्याच स्मृतिकाराचे वचन आहे कीं, (व्य० श्लो० २२ ) " यांपैकीं कांहींच [ लक्षण ] नसेल तर दिव्य करवावें असें सांगितलेले आहे." पण " वांटणी झाल्याबद्दल संशय पडल्यास वांटणी झा- ल्याची शाबिती जातिबंधु, साक्ष आणि दस्तऐवजी पुराव्यानें [ झाली पाहिजे ]; तेथें दिव्य नाहीं " अ वृद्ध याज्ञवल्क्याचें वचन आहे, ते जेथे इतर प्रमाणे असतात तेथें लागू असें समजावें. विभाग झाला किंवा न झाला याबद्दलचा संशय कोणत्याही उपायांनी दूर होऊं शकत नाहीं, तेथे पुनः विभाग करावा असें मनु सांगतो 'विभाग्यांमध्ये वां- टणी झाली असल्याबद्दल संशय राहातो तेव्हां, जरी विभागी निरनिराळे राहात असले तरी, पुनः विभाग करावा. २७२ १,२७१ 66 विभक्त झालेले विभागी पुरुषांचें काम नारद सांगतो " एकापासून उत्पन्न झालेले अनेक पुरुष निरनिराळी धर्मकृत्ये करतात, निरनिराळे कामधंदे चालवितात, कामाची साधनें निरनिराळीं ठेवितात, व परस्परांच्या कामांत परस्परांच्या सल्लाम- सलती घेत नाहीत' त्यांस, तशी इच्छा असल्यास, आपली [ मालमत्ता ] दान देण्यास किंवा विकण्यास अधिकार आहे, किंवा [ त्या मालमत्तेचें ] त्यांस पाहिजे तें करतां येईल; तात्पर्य, ते आपल्या मालमत्तेचे मालक आहेत. १२७३ 6 धर्म ' ह्मणजे पंचमहायज्ञादिकांसारखी शास्त्रोक्त विधीने करण्याची कृत्यें. स्मृतीत ' क्रियाः ' असें पद आहे त्याचा अर्थ व्यापारधंदा वगैरे लौकिक कृत्यें. कर्मगुणाः ' ह्म- णजे घरांतील पात्रांदिक वगैरे कामाची साधने. हीं निरनिराळीं ज्यांची त्यांच्या ज- २७० वी० प० १८ पृ० २. २७१ वी० प० २२३, पृ० २. या ठिकाणीही है मनुवचन असेंच ह्यटलेले आहे. , २७२ येथे पाठ ‘सम्मताः ' ह्मणजे एकमेकांचे संमतीनें. परंतु ' संगताः' असाही पाठ माई (ख). २७३ वी० प० २२२ पृ. २.