पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १८७ 2 आहे. यावरून वाग्यज्ञादि चार यज्ञांच्या प्राप्तीचा संभव होतो [ ह्मणून 'वाग्यज्ञपूर्वक अतद्गुणबहुव्रीहि समासच मानला पाहिजे..] ह्मणून ब्रह्मयज्ञ निराळाच करावा. परंतु या दोन्ही वचनांस शिष्टांनी मान दिलेला नाहीं. धर्मप्रवृत्तिग्रंथांत पुढील वचनें आहेत: "बा- पाचें मृताहिक श्राद्ध ( वार्षिक श्राद्ध), दर्शश्राद्ध, क मासिकश्राद्ध, ही अविभक्त सर्व भावांनीं निरनिराळीं करूं नयेत, एकच करावीं. ते निरनिराळ्या देशी राहत असल्यास [ वरील कृत्यें ] नेहेमी निरनिराळीं करावी. भाऊ [ विभक्त झालेले नसून ] निरनिराळ्या गांवी गेलेले असल्यास मातापितरांनी दर्शश्राद्धे व मासिक श्राद्धे नेहेमी निरनिराळीं करावीं. भाऊ [ विभक्त झालेले नसून ] निरनिराळ्या गांवीं राहत असतील व स्वतः मिळ- विलेल्या पैशावर निर्वाह करीत असतील तर त्यांनीं श्राद्ध व पार्वणश्राद्ध निरनिराळीं करावीं.” आणि स्मृतिसमुच्चयग्रंथांत असें वचन आहे: “वैश्वदेव, वार्षिकश्राद्ध, महाल- यश्राद्ध, आणि दर्शश्राद्ध हीं [ कर्ते ] निरनिराळे देशांत राहत असल्यास निरनिराळी करावीं..” हीं सर्व वचनें संसृष्ट ( पुनः एकत्र झालेले) असून देशांतरीं राहाणान्यांच्या संबंधाचीं आहेत असें कांहींचे मत आहे. वस्तुतः या वचनांस मूळ नाहीं. अथवा देश, काल, आणि कर्ता एकच असल्यास साधारण न्यायाने, एकच कर्म करावें, असें प्राप्तः होत आहे. कर्त्यांचा भेद असून [ इतर अंशीं तीच स्थिति असतां ] एक कर्म करावें असें प्रत्यक्ष वचनानें सिद्ध आहे. देशभेद असल्यास ( कर्ते निरनिराळे ठिकाणी असल्यास ) वचन किंवा न्याय यांतून एकही अनुकूल नसल्यामुळे श्राद्धादि करें निरनिराळी व्हावयाचीं; [ ह्मणून देशभेद असल्यास श्राद्धादिक क्रिया निरनिराळ्या कॅराव्या ] अशी कल्पना. लढवून हीं वचनें कोणी तरी नवीन रचलेली असावीं. याप्रमाणें थोडें दिग्दर्शन करून [ हा विषय ] पुरा करतों.. · विभाग झाला असल्याबद्दलचीं दुसरीं लक्षणें नारद सांगतो “ विभक्त झालेले भाऊ मात्र परस्परांचे २६ संबांधने साक्ष किंवा जामीन होऊं शकतील किंवा कर्ज देणे, घेणें हीं परस्परांत करूं शकतील; अविभक्त करूं शकत नाहींत. [ कर्ज ] देणें, [ कर्ज ] घेणें, पशु, अन्न, घरें, शेर्ते, देणग्या, दस्तऐवज करणें वगैरे व उत्पन्न व खर्च हे विभक्त बंधूंचे निरनिराळे असतात हैं. ध्यानांत ठेवावे. ज्या विभागी पुरुषांच्या दरम्यान हीं कृत् घडतात ते, त्यासंबंधी लेख नसेल तरी, विभक्त आहेत असें समजावें. १२६९ 'दानग्रहण' ( देगें, घेरों) हीं ऋरासंबंधाने आहेत. 'दानग्रहण, ' या पदाची आवृत्ति स्पष्टते- साठी दुसऱ्या लोकांत केलेली आहे. यावरून असें होतें कीं, विभक्त झालेल्यांनी २६८ येथें 'परस्परं असा पाठ आहे, परंतु मिताक्षरा आणि वीरमित्रोदय यांत 'कथंचन ' असा पाठ आहे. २६९ मि० व्य० प० ६४ पृ० १० वी० प० २२३ पृ० १० क० वि०.