पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ व्यवहारमयूख. २६७ " करावी अशी शंका प्राप्त होईल. पण तसें नाहीं. एकच क्रिया पुरे आहे हे वरील नारदवचनांतील विशेष विधीनें दर्शविलें आहे. याच कारणास्तवं श्रौतानि व स्मार्ताग्नि यांनी साध्य जीं धर्मकर्मे ती अविभक्त कुटुंबांतील निरनिराळ्या पुरुषांनी निरनिराळीच केली पाहिजेत; कारण आहवनीय, आवसथ्य व इतर अग्नि यांचा संबंध कर्त्याच्या भेदा- प्रमाणे बदलतो. त्याचप्रमाणें अनावास्यादिक पर्वकाळी चुलता व पुतण्या वगैरेंनी करा - वयाची श्राद्धे, देवताभेद असल्यामुळे, निरनिराळीच केली पाहिजेत. ज्यांनी श्रौतस्मा- र्तादि अग्नि सिद्ध केलेले नाहींत त्या भावांनी करावयाचें श्राद्ध, देवतांचें ऐक्य असल्यामु- ळें एकच. परंतु भाऊ निरनिराळे ठिकाणी असल्यामुळे स्थलभेद झाल्यास निरनिराळी श्राद्धे. अग्नि सिद्ध केलेल्या भावांत अग्निसंबंधाने करावयाच्या क्रियाही निरनिराळ्या; परंतु गृहदेवतांची-पूजा व वैश्वदेवादिक कर्म एकच. ह्मणून शाकल तो एकत्र अन्नपाक करून राहणाऱ्यांमध्यें घरांतील देवांची पूजा व वैश्वदेव हीं एकच; विभक्त असल्यास प्रत्येकाच्या घरीं निरनिराळी. " पारिजात ग्रंथांत आश्वलायनवचन असें आहे की “ पूर्वी विभक्त झालेले असतांही एकत्र राहत असून ज्यांचा अन्नपाक एकाच ठिकाणी होतो [ अशा कुटुंबांत ] वाग्यज्ञ आदिकरून ( वेदपठण आदिकरून ) करण्याचे चार यज्ञ ( ह्मणजे एकंदर पांच यज्ञ स्वाध्याय, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, व मनुष्ययज्ञ ) हे मुख्यानेंच करावे. परंतु विभक्त होऊन एकत्र झालेल्यांचा अन्नपाक निर- निराळा होत असेल अशा द्विजांनीं दररोज भोजनापूर्वी यज्ञ ( पंचमहायज्ञ ) निरनिराळे करावे.” परंतु हें वचन संसृष्टीस ( निराळे होऊन पुनः एकत्र झालेल्यांस ) लागू आहे; कारण ‘ एकपाकेन वसतां ' ( ह्मणजे विभक्त झाले असूनही एकत्र अन्नपाक करणारे) आणि ‘ विभक्ताअविभक्ताश्च ' ( ह्मणजे विभक्त झाल्यावर पुनः एकत्र झालेले ) या वच- नांवरून असेंच स्पष्ट प्रतिपादित आहे. यावरून इतकें निष्पन्न होत आहे की, एक वेळ विभक्त होऊन पुनः एकत्र झाल्यावर अन्नपाक निरनिराळा होत असल्यास महायज्ञ निरनिराळे करावे. वरील आश्वलायनवचनांत , वाग्यज्ञ पद आहे त्याचा अर्थ ब्रह्मयज्ञ. ' वाग्यज्ञपूर्वकान् चतुरो यज्ञान् ' या स्मृतिवचनाच्या पदांतील पहिले पद अतद्गुणसंविज्ञान बहुव्रीहि ' समास समजावा. [ हा समास ] ' तद्गुणसंविज्ञान ‘बहुव्रीहि' मानला तर ‘वाग्यज्ञपूर्वकान् ' हें पद व्यर्थ होईल. कारण 'चतुर: ' या वि- शेषणानेंच ब्रह्मयज्ञादि क्रमानें चार यज्ञ समजले जाते. [ पहिला सोडून वाग्यज्ञाच्या पुढी- ल चार असा अर्थ न व्हावा ह्मणून ' वाग्यज्ञपूर्वकान् ' या पदास सार्थक्य येतें असें को- णी ह्मटल्यास त्यास उत्तर कीं, ] योग्य प्रमाणावांचून प्रथम पदार्थ सोडूं नये असा न्याय २६७ ‘ प्रयोगपारिजातांत' असा पाठ आहे ( क ) (स ). 6 , 6