पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/५०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १८९ [ ज्या पुरुषानें ] जें मिळविलें तें त्याचें एकट्याचेंच ; [ परतुं ] चोरीस गेलेलें किंवा हर- वलेलें अलून जें पुनः सांपडेल तें, आणि पूर्वी सांगितलेली [ मालामिळकत ], यांचा पुनः विभाग होईल. ' ' प्रागुक्तं ' ( पूर्वी सांगितलेली ) याचा अर्थ एका हिस्सेदाराने दुसऱ्या हिस्सेदारांस न कळत छपविलेली [ मालमिळकत ]. ' पुनर्भवेत् ' ( पुनः होईल ) ह्मणजे पुनः विभाग होईल. मनु " विभाग केल्यानंतर जर कांहीं समाईक मालमत्ता दृष्टोत्पत्ती - स येईल तर तो ( पूर्वी झालेला ) विभाग योग्य झाला असें समजलें जाणार नाहीं. पुनः विभाग करावा. नारद १,२६३ झालेला विभाग कोणी नाकबूल केल्यास त्याच्या निर्णयाचे नियम याज्ञवल्क्य सांगतो (व्य० श्लो० १४९ ) " वांटे झाले नाहींत अशी तकरार पडल्यास वांटणी झा- ल्याबद्दलची शाबिती बंधु, साक्षी, लेखपत्रे, आणि निरनिराळी २६४ घरे किंवा शेर्ते विभक्तं पुरुषांचे ताब्यांत असतील त्याबद्दलचे पराव्यावरून करावी." 'यौतकैः " ह्मणजे निरनि- राळी करून दिलेली. हें विशेषण घरे आणि शेतें या दोन्ही विशेष्यांकडे लागतें. " विभाग झाला किंवा न झाला अशाबद्दल हिस्सेदारांत विवाद पडल्यास त्याबद्द- लची शाबिती ज्ञातिबंधु, विभागसंबंधाचा लेख ( फारखत वगैरे), किंवा विभाग झालेला असतां जी कार्ये निरनिराळी व्हावयाचीं तीं निराळीं होतात किंवा एकत्र चालू आहे यावरून करावी. " २१५ तोच स्मृतिकार पुनः ह्मणतो " अविभक्त भावांचा ( भाऊबं- दांचा ) धर्म (धर्मसंबंधी क्रिया) एकच. विभाग झाल्यानंतर तो धर्म देखील प्रत्येक पुरुषाचा निरनिराळाच [ होतो ]. २ या स्मृतींत ' अविभक्तानां भ्रातॄणां ' अशीं पढ़ें आहेत. त्यांत पहिले पदाकडे उद्देश्यत्व असल्यामुळे तें विशेष्य. दुसरें पद ' भ्रातॄणां ' विशेषण असल्यानें त्या पदाचा अर्थ भाऊ असाच केवळ समजावयाचा नाहीं, सर्व तज्जा - तीय असा समजावयाचा, ह्मणून त्याचा एकंदर अर्थ असा होतोः अविभक्त कुटुंबांत, मग तें बाप, आजा, पुत्र, पौत्र, चुलते, भाऊ व पुतणे इतक्यांमिळून असो किंवा यांतून कांहीं मिळून असो, धर्मकर्म एकच. देश, काल, व कर्ता यांचें ऐक्य असतें तेथें निरनिराळ्या प्रयोगांनी कर्मे करावयाची असली तरी देखील एकच कर्म पुरे आहे, असा जो नियम आहे तोच येथे लागू व्हावा असें प्राप्त होते. परंतु जेथें अविभक्त अनेक कर्ते असतील तेथे कदाचित् एकतंत्रता न करतां निरनिराळीं कमें • २६३ व्य० मा० जरी हे वचन मनुस्मृतीचे अनेक पुस्तकांत सांपडत नाहीं, तरी में मनुवचन आहे, असे माधवमंथावरून सिद्ध होत आहे. २६४ वी० प २२३ प० १ ; क० वि० ; व्य० मा० २६५ मि० व्य० प० ६४ पृ० १ ; बी० प० २२३ पृ० १ ; क० वि० ; व्य० मा० . २६६ मिः व्य० प० ६४ पृ० १० वी० प० २२३ पृ० १ ; क० वि०. २४ 9