पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ हिन्दुधर्मशाख. प्र० २ ५८ कोटींतच घातलेला आहे. यावरून स्मृतिशास्त्र जसें न्यायाधीशानें-निर्णयापूर्वी पाहिले पाहिजे, तसेंच आचार काय आहे तेंही पाहिले पाहिजे. स्मृत्युक्तविधि हा उत्सर्ग असे मानून आचारप्राप्तकर्म है त्या उत्सर्गाचा अपवाद असें मानण्यास व त्या धोरणानें आचार शात्री- द करण्याची जबाबदारी सर्व आचारांवर अवलंबणाऱ्या पक्षकारांवर टाकण्यास आधार दिसत नाहीं." अस्तु. वर जें साधारण धर्मशास्त्र ह्मणून सांगितलेले आहे त्याला प्र माणीभूत ह्मणून जी आधारांची मालिका दिली आहे तिजवरून एकादा वाचक चकित होईल. परंतु सूक्ष्म तपासणान्यास असे दिसून येईल की, या सर्व मालिकेत वचनें अशी दोन अवशिष्ट राहतात - एक मनुचें व एक याज्ञवल्क्याचें व स्टील साहे- बांनी लिहिलेला लेख इतकींच तीन प्रमाणें अवशिष्ट राहतात. सदरील दोनही वच- नांत असपिंडेशीं विवाह करूं नये, असे मात्र सांगितलेलें आहे; परंतु हा निषेध अ तिक्रान्त झाला असतां झालेले कृत्य रद्द करणाऱ्यांपैकी तो निषेध आहे, किंवा विध्यतिक्रम झाला ह्मणून कर्ता मात्र प्रायश्चित्तार्ह होतो, परंतु कृत्य रद्द होत नाहीं, अशा प्रकारच्या निषेधांपैकीं तो आहे, याविषयीं कांही सांगितलेले नाहीं. नुस्ते मनु- याज्ञवल्क्य यांच्या वचनांचे तरजुमे कोर्टाने पाहिले असे दिसते. तसें न करितां मात्र त्याच वचनांच्यासंबंधे आधुनिक संप्रदाय जाणणाऱ्या कोणत्याही मान्य ग्रंथकाराचा ग्रंथ पाहतें, तर कोर्टाला असे दिसून आलें असतें कीं, जें औत्सर्गिक सापिंड्य सांगितलेलें आहे, त्याचा संकोच आचारांत फारच आणि निरनिराळ्या रीतींनी झालेला आहे, व तो संकोच कोठें कोठें ऋषींनीही मान्य केला आहे." ५९ ( ५१.) वर लिहिलेल्या ठरावावरून त्या कामांत न्यायाधीशांच्या नजरेस सदरीं लिहिलेली गोष्ट कोणीं आणिली होती, किंवा अन्य ग्रंथांवरून त्यांच्या लक्षांत ती आली होती असें दिसत नाहीं. मद्रास इलाख्यांत, व दक्षिण महाराष्ट्र आणि ह्मैसूर प्रांतांत देशस्थ ब्राह्मणांमध्ये प्रत्यक्ष भाचीशीं मामाचा विवाह होतो; आणि ही चाल पुरातन स- वशिष्टमान्य आहे असें राजे सर टी. माधवराव, बडोद्याचे दिवाण, व रावबहादूर त्रिमळराव व्यंकटेश इनामदार धारवाड येथील माजी स्मालकाझ कोटीचे जज्ज यांधी पत्रे माझ्या इंग्रजी ग्रंथांत" छापली आहेत त्यांवरून दिसेल. कन्हाडे व देशस्थ ५८.०मू० इं० अ० व्हा० १३ पा० १४१, इंदरण वलंगी पुलीतलवर वि० रामस्वामी पौडयातलवर यांत प्रीव्ही कौंसलाने अर्से ठरविलें आहे की, एकदां विवाह झाला ही गोष्ट शाबीत झाली की, तो विवाह कायदेशीर होतो अर्सेच अनुमान केले पाहिजे. या न्यायानें पाहिले तर विवाह रद्द करूं इच्छिणाऱ्याबर तो रद्द कसा हे दाखविण्याचा बोजा पडला पाहिजे व फक्त अशा विवाहाबायद निषेध आहेत इतकेंच दाखविल्यानें तो बोजा दूर होईल असे दिसत नाही. कारण स्मृतीत निषेध दोन प्रकारचे आहेत. त्यांपैकी एकामध्ये मात्र झालेले कृत्य बाधित होतें. ५९. पहा धर्मसिंधु परि० ३ पूर्वार्ध प० ५० पृ० २. ६०. पहा प० ४२५.