पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १८३ असें व्यास- पण येथें यांचा हजार पिढ्यांपावेतोंही सगोत्रपुरुषांत विभाग व्हावयाचा नाहीं " २५७ वचन आहे. या वचनांनीं घर व जमीन यांचा विभाग नाहीं असें ह्मणतात; घर ह्मणजे धर्मक्रियेसाठींच जें घर असतें तें, व जमीन ह्मणजे गुरें वगैरे चरण्याची जमीन इतकाच अर्थ समजावयाचा; आणि दानप्रतिग्रहाने प्राप्त झालेलें घर व जमीन यांचा वि- भाग क्षत्रियादि [ जातींच्या स्त्रियांपासून झालेल्या पुत्रांस ] नाहीं असा निषेध पूर्वी सां- गितलेला आहे तो अर्थ यांनी दर्शविला असे समजावयाचें; किंवा घर आणि जमीन वि शेष किंमतीची नसल्यास प्रत्यक्ष त्या वस्तूचा विभाग करूं नये, त्याच्या किंमतीचा विभाग करावा, अशा अर्थी हीं वचने समजावीं. वस्त्रांच्या विभागाविषयीं कांहीं विशेष नियम बृहपति सांगतो " वस्त्रादिकांचा विभाग होत नाहीं असें ज्यांनी सांगितले आहे त्यांनी या गोष्टीचा (योग्य) विचार केला नाही. [ कारण ] श्रीमान् लोकांचें द्रव्य, वस्त्रे व अलंकार यांचेच रूपानें असतें; विभाग न करतां तें (वस्त्रालंकार) तसेंच ठेवल्यास द्रव्य व्यर्थ रिकामें राहतें व एकाला तर देतां येत नाहीं. तेव्हां त्यांचा (वस्त्रालंका- रांचा ) युक्तीनें विभाग करावा; [ कारण ] न विभागल्यास ते निरुपयोगी होतील. [ स- णून ] वस्त्रालंकार विकून त्यांची किंमत वांटून घ्यावी; दस्तऐवजी येण्याचा विभाग कर्जाचा वसूल झाल्यावर करावा; शिजिवलेल्या अन्नाचा विभाग धान्य मोबदला करून करावा, ज्या विहिरींस पायऱ्या असतील व ज्यांचें पाणी पोहोज्यांनी काढावें लागतें अशा विहि- रीच्या पाण्याचा उपभोग आपापल्या गरजेप्रमाणें करावा, एकच दासी असल्यास वि- भागाच्या प्रमाणानें निरनिराळ्या भागिदारांचे घरीं तिनें काम करावें, पुष्कळ दासी अ- सल्यास समसंख्या करून वांटाव्या. गुलामांविषयीं हाच नियम लागू. शेतें आणि बांध- बंदस्ती (किंवा पूल वगैरे) हीं हक्काप्रमाणे हिस्सेरश्शीनें घ्यावीं. रस्ते व गायरानें नेहम हिश्शाप्रमाणें हिस्सेदारांनीं वांटून घ्यावी. " ' उगाल ' ह्मणजे रिणकोकडून ऋण वसूल करून [ नंतर वांटून घ्यावें. ] कात्यायन “ धर्मार्थ खर्च होण्यासाठीं योजून त्याबद्दल लेख करून ठेवलेलें द्रव्य, पाणी, दास, वंशपरंपरेचा हक्क किंवा उत्पन्न (निबंध), वापरलेली वस्त्रे किंवा दागदा- गिने, आणि जें कांहीं विभाग करण्याजोगें नसेल तें, यांचा उपभोग पूर्वीपासून चालत आल्याप्रमाणें भावांनी करावा. ११२५५ या वचनांत 'धनं' पद आहे त्याचा अर्थ धर्मकार्या- साठी काढून 'ठेवलेले व ज्याबद्दल लेखी दाखला ठेवलेला असेल तें. 'उदकं ' ह्मणजे २५७ ' अविभागः ' असा येथें पाठ आहे, पण मिताक्षरादि ग्रंथांत. 'अविभाज्यं' असा पाठ आहे. २५८ क० वि०; व्य० मा०; येथे बृहस्पतिस्मृति जितकी लिहिलेली आहे तितकी सर्व वीरमित्रो - यांत दिलेली नाहीं, कांहीं श्लोक कमी आहेतः प० १६० पृ० १.