पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ व्यवहारमयूख.. भोजन करणाऱ्यास द्याव. तें वचन असें " बापाची वस्त्रे, दागदागिने, शय्या वगैरे, तसेंच त्याचें वाहन वगैरे असेल तें त्याचें श्राद्धभोजन करणाऱ्या [ ब्राह्मणाची ] गंधफुलांनी २५० पूजा करून त्यास द्यावें. " [ वांटणीचे वेळेस ] बकऱ्या, मेंढ्या, वगैरेच्या ( सर्वांस सारखी संख्या वांटून देतां येण्याजोग्या नसून ) विषम संख्या असल्यास तेथें विशेष नि- यम मनु सांगतो (अ० ९ श्लो० ११९ ) " बकऱ्या, मेंढ्या, किंवा ज्यांचे खूर दुभाग- लेले नसतात अशी जनावरें [वांटणीत ] विषम ( ह्मणजे सम संख्येनें न विभागण्याजोगी ) राहिल्यास त्यांचा कधीं विभाग करूं नये; तीं वडील पुत्रासच द्यावीं. १२५१ तयार झालेलें अन्न व उदक जरूरीप्रमाणे सर्वांनी उपभोगावें. ' स्त्रियः ' ह्मणजे दासी. जर त्यांची संख्या विषम असेल तर सोईप्रमाणे पाळीनें त्यांजकडून काम करवून घ्यावें. सम संख्या असल्यास त्या वांटून घ्याव्या. बापाच्या राखलेल्या बायका समसंख्या असल्या तरी खालीं लिहिलेल्या गौतमस्मृतीवरून विभागास पात्र नाहींत. ती स्मृति अ "बापाने उपभोगार्थ ठेविलेल्या राखी बायकांचा विभाग होणें नाहीं. " कल्पतरु ह्मणतो hai ' योगक्षेम ' याचा अर्थ मंत्री पुरोहितादिक समजावा. परंतु लौगाक्षि ह्मणतो कीं, “ तत्त्वद्रष्टे पूर्वकर्माला क्षेम आणि इष्टकर्माला योग ह्मणतात. हीं दोन्ही, तसेंच शय्या क आसन हीं विभागास पात्र नाहींत " वरील वचनांत 'पूर्त' पद आहे त्याचा अर्थ. तळें,- बाग वगैरे ; आणि 'इष्टं " ह्मणजे याग, ब्राह्मणभोजन वगैरे. या कृत्यांकरितां एक- त्र असतां सर्वांच्या अनुमतानें ज्या पुरुषाने अशा कृत्यासाठीं जें द्रव्य उत्सर्ग करून निः राळें काढून ठेविलेले असेल तें द्रव्य त्याच धर्माकडे त्याच पुरुषानें लावावें ; दुसऱ्या पुरु-- षानें किंवा सर्वांनी मिळून त्याचा व्यय करावयाचा नाहीं. वरील मनुवचतांत ' प्रचार पद आहे त्याचा अर्थ, गृहादिकांत येण्याजाण्याचा मार्ग व गाई वगैरे जनावरें चरण्या- ची जागा. २५४ २५५ 53 आतां शंखलिखित याची स्मृति “ राहाण्याचें घर, पाण्याची भांडी, दागदागिने व वापरलेली वस्त्रे यांचा विभाग नाहीं " अशी आहे ; आणि " यज्ञकर्मांत. आचार्यास मिळालेलें, जमीन, वाहन, तयार केलेले अन्न, पाणी, आणि स्त्रियाँ २५० मि० व्य० प० ५० पृ० २; वी० प० २२१प० १. २५१ मि० ध्य० प० ५० पृ० २; क० वि०. २५२ वि० प० २२१ पृ० १; मि० व्य० प० ५० पृ० २; क० वि०; ध्य० मा० . २५३ 'स्त्रीषु च संसक्तासु ' असा येथे पाठ आहे, पण 'स्त्रीष्ववरुद्धासु ' असा वीरमित्रोदयता पाठ आहे. २५४ बी० प० २२१ पृ० २; मि० व्य० प० ९० पृ० २; क० वि०, व्य० मा० . २५५ क० वि० २५६ क० वि०; व्य० मा० मि० व्य० प० ५० पृ० २.