पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १८१ शौर्यादिक कर्म करून द्रव्य मिळविलें तर त्यांत इतर भाऊ विभागी होतात. [ मात्र ] दोन भाग त्याला ( मिळविणाराला ) देऊन बाकीच्या घ्यावे. " यन 6 भावांनी सम भाग सौदायिक धन ह्मणजे काय हें व्यास सांगतो “ लग्न झालेल्या किंवा अविवाहित स्त्रीस नवऱ्याकडून किंवा बापाच्या घरांतून' ( कुटुंबातील माणसांकडून), भावांकडून, किंवा आईबापांकडून, मिळालेलें जें धन त्यास 'सौदायिक असें नांव आहे. " कात्या- " स्वजातीच्या कन्येशी विवाहाच्या वेळेस मिळालेलें जें कन्यागत ( कन्येबरोबर आलेलें ) द्रव्य तें शुद्ध व समृद्ध करणारें आहे असें ह्यटलें आहे. भार्येबरोबर आलेलें जें द्रव्य तें ' वैवाहिक ' द्रव्य असें समजावें. या प्रकारचें सर्व धन धर्माचें साधनस्वरूप समजावें ( ह्मणजे धर्माचरणांत याचा व्यय व्हावा ) . " आर्ष ४७ ( ह्मणजे दोन गाई घे- ऊन अशा प्रकारचे ) विवाहप्रयोगानें केलेल्या विवाहाचे वेळेस जें धन प्राप्त होतें त्यास कन्यागत' असें नांव आहे. विद्याधनाप्रमाणेच येथेंही वडिलार्जित द्रव्य खर्च झाले नसेल तर मात्र अविभाज्यत्व समजावें. विद्या वगैरे साधनें शिवाय करून निराळ्या मार्गांनी मिळविलेल्या धनाचे विभाग झालेच पाहिजेत. मनूचें असेंच ह्मणणें आहे ( अ० ९ श्लो० २०५ ) “ [ विभाग होण्याचे पूर्वी ] अविद्वान् बंधूंनी शेतीवर संपादिलेले द्रव्य, वडिलार्जित धनाचा उपयोग त्या कामांत केलेला नसला तरी सर्व बंधूंस समभाग मिळेल असें समजावें.” २४८ 'ई'हा' असें पद स्मृतींत आहे त्याचा अर्थ शेतीकाम वगैरे. 'अपिवे' ह्मणजे वडिलार्जित द्रव्याची मदत झाली नसेल तरी मदतीवांचून विभाग न होण्याची दुसरी मालमत्ता मनु सांगतो ( अ० ९ श्लो० २१९ ) " वस्त्रे, वाहनें, दागदागिने, तया- र झालेलें अन्न, पाणी, स्त्री, इष्टापूर्तसंबंधी द्रव्य, आणि गायराने यांचा विभाग व्हावयाचा नाहीं असें सांगितलेले आहे. " पत्र ' ह्मणजे वाहन. वस्त्रे व दागदागिने हे जो वापरतो त्याचेच ; मात्र ते [ इतरांची वस्त्रे व दागदागिने यांच्याशीं ] सारख्या मोलाचे असावे; कमज्यास्तपणाचा फरक असल्यास त्यांचा विभाग झाला पाहिजे. बापानें वापरलेलीं वस्त्रं वगैरे असतील तीं, बृहस्पतीच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या श्राद्धार्चे आहे. २४९ 6 २४५ ' पितृगृहादपि' असा येथें पाठ आहे, परंतु वीरमित्रोदयांत 'पितगृहेऽपि वा' असा पाठ भ्रातुः सकाशात् ' असा पाठ 'येथे आहे; परंतु कल्पतरु वगैरे ग्रंथांत 'भर्तुः सकाशात्' असा पाठ आहे. २४६ वी० प० २१५ पृ० १; क० वि० ; व्य० मा०. २४७ मि० आ० श्लो० ५९ ० ८ पृ० १. २४८ क० वि०. २४९ मि० ध्य० प० ५० पृ० २ ; वी० प० २२१ पृ० १; क० बि०; व्य० मा० .