पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० व्यवहारमयूख. रत्नग्रंथांत सांगितलें आहे; परंतु भाग देईन असें वचन [ विद्या शिकणारानें] ज्यास दिलेलें नाहीं त्या भावास, असा अर्थ योग्य. वडिलार्जित द्रव्य खर्चिलें नसूनही द्रव्य संपादिलें तरी त्याचा हिस्सा विशेष प्रसंगी द्यावा लागतो हें गौतम सांगतो' “ विद्वान् पुरुषानें स्वतेः मिळविलेल्या द्रव्याचा (ह्मण- जे विद्याधनाचा ) हिस्सा आपल्या विद्वान् हिस्सेदारांस इच्छा असेल तर हवा." ' "वैद्यः असें पद स्मृतीत आहे; विद्या जाणतो तो वैद्य असा त्याचा अर्थ. विद्वानानें आपल्या विद्याधनाचा भाग आपल्या विद्यासंपन्न भावांस इच्छेनुरूप द्यावा असा अर्थ. कात्यायन ह्मणतो की "विद्वान् भावानें आपल्या विद्याधनाचा भाग अविद्वान् भावांस कधींच देण्याची जरूरी नाहीं ; परंतु विद्वत्तेंत आपल्या बरोबरीचे किंवा ज्यास्ती विद्वान् असे विभाग घेणारे असल्यास त्यानें आपल्या विद्याधनाचा भाग देणें योग्य आहे. परंतु विद्वानानें वडिलार्जित द्रव्याची मदत घेतल्यावांचून मिळविलेल्या आपल्या विद्याधनाचा हिस्सा इतर विद्वान् विभाग घेणारांसही इच्छा नसल्यास देऊं नये. " मदनाचें असें ह्मण आहे कीं, "अविद्वान् भावांजवळ दुसरी मालमिळकत असेल तर मात्र त्यांस हिस्सा न देण्याविषयीं वरील वचन आहे ; इतर मालमिळकत नसल्यास त्यांसही विद्याधनाचा हिस्सा दिलाच पाहिजे." बाप वगैरेकडून मिळालेल्या देणगीचे हिस्से व्हावयाचे नाहींत याविषयीं बृहस्पति सांगतो “ पितामहानें, बापानें, किंवा आईनें जें दिलेलें असेल, तसेंच शौर्यानें मिळ- विलेलें द्रव्य, व स्त्रीर्धेनें, हें ज्याला ( मिळालें ) त्याचेंच ; [ विभागाचे वेळेस ] तें त्याज- कडून घेऊं नये. " नारद " शौर्यावर मिळविलेलें धन, स्त्रीचें धन, व विद्येवर मिळ- २४४ विलेलें धन, हीं तीन प्रकारचीं घनें, तसेंच बापानें प्रसन्न होऊन दिलेली देणगी, यांचा विभाग करावयाचा नाहीं. " कात्यायन " ध्वजाहृत धनाचा कधींही विभाग करावयाचा नाहीं असें ह्यटलेले आहे. स्वामिकार्याकरितां आपल्या जिवाकडे न पाहतां शत्रूच्या सैन्यास पळवून लावून लढाईत जे शत्रूपासून घेतले त्यास ' ध्वजाहृत' असें ह्मणताते पुनः तोच स्मृतिकार 'ज्यापासून प्राणसंकट येण्याजोगें असेल असें एकादें साहसकर्म केल्यावरून स्वामी प्रसन्न होऊन जें बक्षीस ह्मणून देतो तें शौर्यानें मिळविलेले असे समजावें. " यासंबंधानें कांहीं विशेष नियम व्यास सांगतो ईक वस्तूंपैकीं, जसें एकादी गाडी किंवा घोडें घेऊन त्याच्या आश्रयाने एका भावानें २४३ " , 66 66 समा- २४२ ' स्वमर्जितं असा येथे पाठ आहे, परंतु कमलाकर व माधव या ग्रंथांत 'स्वयमर्जितं ' असा आहे. २४३ क० वि०, व्य• मा०. २४४ मि० ध्य० प० ४७ पृ० १ ; क० वि०; व्य० मा० .