पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. ( १७९ प्रा ही हाच नियम लागू आहे. विद्वत्तेवर में संपादिलें, कोणाचा यज्ञ केल्याबद्दल जें प्राप्त झा लें, किंवा शिष्यापासून मिळालें, त्यास विद्याधन असें ह्यटलें आहे.. यावांचून इतर कोणत्याही उपायांनी मिळविलेलें जें द्रव्य त्यास समाईक मिळकत असें ह्यटलेलें आहे. " बृहस्पतीनें ह्यटले आहे की " आपल्या प्रतिपक्ष्याचा पराजय करून पणपूर्वक विद्येचे बळावर मिळविलेलें जें द्रव्य तें विद्याधन समजावें; त्याचा विभाग व्हावयाचा नाहीं. " भृगूनें ४० ह्मटलें आहे की " प्रतिज्ञापूर्वक विद्वत्तेच्या बळावरं मिळविलेलें, शिष्याने दिले- लें, आर्त्विज्य करून मिळालेलें तें विद्याधन. " 'उपन्यास ' असें पद स्मृतींत आहे त्याचा अर्थ मदनरत्नांत असा केला आहे कीं, वेदाच्या क्रम, जटा, वगैरे विकृतींचा संपूर्ण पाठ करणें.. इतरांचे मतें अत्यंत गहन विषयार्चे समेंत विवरण करणें: स्मृतींत ' उपन्यस्ते व. .' पणपूर्वकं ' अर्शी दोन पदें दूर दूर आहेत त्यांचा अन्वय ‘'पप्पपूर्वकं उपन्यस्ते. ' असा करावयाचा. ' शंसनं ' ह्मणजे आपल्या विद्वत्तेची इतरांनी केलेली प्रशंसा. ध्ययनं ' ह्मणजे उत्तम प्रकारचें केलेलें अध्ययन किंवा पठण. ' शिल्पिष्यपि ' याचा अर्थ कारागीर लोकांतही हाच. विद्याधनाचां नियम लागू आहे असें समजावें.. ' मूल्याधि- कं' याचा अर्थ वस्तूच्या किंमतीहून अधिक [ कारागिरांस कौशल्याबद्दल ] बक्षीस ह्मणून जें त्यास खुष करण्यासाठीं दिलें जातें तें . ' ऋत्विङ् न्यायः ' याचा अर्थ ऋत्विजकर्म. करून व त्यासारखेच दुसरें कर्म करून मिळविलेले द्रव्य. जर विद्याप्राप्ति व तीपासून झालेली धनप्राप्ति. वडिलार्जित द्रव्याचा कांहीं एक खर्च न होतां झालेली असेल, तर मात्र वर सांगितलेले सर्व प्रकारचें विद्याधन विभागावयांचें नाहीं असें समजावें; परंतु वडिला- ज़िंत द्रव्याचा खर्च झाला. असल्यास त्या धनाचे विभाग होतीलच. ह्मणूनच कात्यायन ह्मणतो “बृहस्पतीनें असें सांगितलें आहे की, कुटुंबांत बापाच्या बलावर विद्या संपादन करून त्यावर, अथवा शौर्यानें मिळविलेले द्रव्य, विभागास पात्र आहे, " आणि " भावांपै- कीं ज्यानें जें मिळविले असेल त्यास त्याचे दोन विभाग मिळाले पाहिजेत, " असें वसिष्ठ- वचन आहे, ह्मणून वडिलार्जित द्रव्याचा खर्च झालेला असतांही. मिळविणारास दोन भाग मिळावयाचेच. कांहीं प्रकारच्या विद्याधनाचाही हिस्सा द्यावा लागतो याविषय: विशेष नियम नारद सांगतो " विद्याध्ययन करणाऱ्या भावाचें [ तो विद्याभ्यास करीत असेपावेतों ] ज्या दुसऱ्या भावाने कुटुंब चालविलें त्यास तो अश्रुत असेल. तरी (पूर्वी तसें वचन दिलेले नसेल तरी ) [ विद्वान् भावाच्या ] विद्याधनाचा त्याला हिस्सा मिळतो." ' अश्रुत' असें स्मृतींत पद आहे त्याचा अर्थ अविद्वान् असें मदन- २४० क० वि० व्य० मा० .