पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ व्यवहारमयूख. सान न होतां मिळविलेले असलें पाहिजे असें समजावयाचे. त्याविषयीं याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० ११८, ११९) "वडिलार्जित जिनगीचें कांहीं नुकसान न होतां जें स्ने- क्ष्यानें देणगीदाखल दिलेलें तें, व तसेंच लग्नाचे वेळेस देणगी म्हणून मिळालेलें तें, यांवर हिस्सेदारांचा हक्क नाहीं. [ त्याचप्रमाणे ] वडिलार्जित मालमिळकत गेलेली असून ती जर पुनः मिळविली तर, तसेंच स्वतःचे विद्वत्तेवर मिळविलेलें, या चार प्र- कारांनीं जें नवीन स्वतः मिळविलेलें त्याचा हिस्सा इतर हिस्सेदारांस देण्याची ज- रूर नाहीं. " २७५ गेलेली वडिलार्जित जमनि पुनः संपादित केल्यास तीविषयीं विशेष नियम शंख सांगतो “वडिलार्जित जमीन कोणी पूर्वी हरण केली गेलेली असून ती इतरांचे साहाय्यावांचून पुनः जो संपादील त्यास तिचा चौथा २३९ हिस्सा देऊन बाकी राहील ती पुनः संपादणारा व इतर हिस्सेदार यांनी सारखी वांटून घ्यावी; " ह्मणजे पुनः संपादलेल्या भूमीचा चौथा हिस्सा संपादकास देऊन बाकी राहील ती संपादकासह [ सर्व हिस्सेदारांनी समभाग ] वांटून घ्यावी. मनु (अ० ९ श्लो० २०८ ) “ वडिलार्जित द्रव्याचें कांहीं नुकसान न करतां आपल्या परिश्रमानें जो जें मिळवितो, किंवा आपल्या विद्येवर जें मिळ- वितो तें इतर हिस्सेदारांस देण्याची जरूर नाहीं." व्यास " वडिलार्जित धनाच्या म- दतीवांचून आपल्याच पराक्रमानें जें मिळविलें व आपल्या विद्येवर संपादिलें तें इतर हिस्से- दारांस देण्याची जरूर नाहीं. " २३८ , २३७ विद्याधन (विद्येवर मिळावलेलें धन ) ह्मणजे काय हें कात्यायन सांगतो “ पर- कीय पुरुषानें दिलेल्या अन्नावर उपजीवनं करून अन्यपुरुषापासून संपादिलेल्या विद्येच्या साधनानें मिळविलेल्या द्रव्यास 'विद्याधन' ह्मणावें. याचेच स्पष्टीकरण तोच स्मृति- कार करतो “ विद्येच्या संबंधानें पणपूर्वक उपन्यास करून संपादिलेलें द्रव्य द्याधन जाणावें. विभागाच्या वेळेस त्याचा विभाग केला जात नाहीं. शिष्यापासून मिळालेलें, आचार्यापासून मिळालेलें, सभेत पूर्वपक्ष करून किंवा संदिग्ध प्रश्नांचा नि- र्णख सांगून मिळविलेलें, किंवा [ लोकांनीं ] विद्वत्तेची तारीफ केल्यावरून, किंवा वाद- विवादांत जय मिळून त्यावरून मिळालेलें, किंवा उत्तम अध्ययन [ किंवा पाठ ] करून मिळविलेलें तें विद्याधन. याचा विभाग वांटणीचे वेळेस व्हावयाचा नाहीं. [ कौशल्या- बद्दल बक्षीस ह्मणून ] कारागिरास वस्तूचे किंमतीहून अधिक दिलें असेल त्याविषयीं -२३५ बी० प० २२ पृ० २; क० वि०; व्य० मा०. २३६ मि० व्य० प० ४९ पृ० २; वी० प० २२० पृ० २; क० वि०; व्य ० मा०. -२३७ मि० व्य० प० ५० पृ० १; वी० प० २२ पृ० २; क० वि०; व्य० मा ०. २३८ क० वि०. २३९ मि० व्य० प० ५० पृ० १; बी० प० २२० पृ० २; क० वि०; व्य० मा० .