पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १७७ " 66 'प्रदत्त ' ह्मणजे देऊं केलेलें. नारद “ पितृदाय ( बापानें देऊ केलेल्या देणग्या ) देऊन व बापाचें कर्ज फेडून बाकी राहील तें भावांनी वांटून घ्यावें; तसें न केल्यास त्यांचा बाप [ लोकांचा ] ऋणी राहील." ' पितृदाय' ह्मणजे बापानें देऊं केलेलें. पुनः नारद "धर्मार्थं ह्मणून किंवा प्रीतिदत्त ह्मणून देऊं केलें असेल तें, व त्याने स्वतः काढलेले कर्ज, हैं कर्ज व जी विद्यमान जिनगी असेल ती ही त्यांनीं वांटून घ्यावी. दुसरें [ दान किंवा कर्ज वगैरे ] देणें बापाच्या जिनगींतून द्यावयाचें नाहीं." याचा अर्थ असाः धर्मार्थ व प्रीतिदत्त ह्मणून देऊ केलेलें व पित्याने स्वतः केलेले कर्ज हें कर्ज व जी विद्यमान जिनगी असेल ती वांटून घ्यावी; या कर्जाशिवाय दुसरें कांहीं एक वडिलार्जित जिनगींतून द्यावयाचें नाहीं. द्रव्य छपवून ठेवलेलें आहे असा संशय असल्यास तोच स्मृतिकार ( नारद ) सांगतो 66 घर, शेत, व चतुष्पाद जनावरें वगैरे जी दृश्यमान जिनगी ती वांटून घ्यावी. जिनगी छपवून ठेवल्याबद्दल शंका असल्यास [ त्याच्या प्रत्ययार्थ ] शपथ सांगितलेली आहे. " मनूनें असें ह्यटलें आहे की “ घरांतील सामानसुमान, गाड्या वगैरे ओढणारीं किंवा बसण्याची जनावरें, दूध देणारी जनावरें, दागदागिने, व नोकरी करणारे दास, यां- पैकीं दृश्यमान जिनगी असेल तिचा विभाग करावा. जिनगी छपवून ठेवल्याबद्दल शंका असल्यास कोशसंज्ञक दिव्य करवावें " ' कर्मिणः ' ह्मणजे दास वगैरे; ह्मणून त्याच स्मृतिकयनें ( नारदानें) दिव्यप्रकरणांत • जिनगी छपवून ठेवण्याचे बाबतींत को- शदिव्यच सांगितलेलें आहे. ती स्मृति अशी “ दायभाग ज्यांस मिळावयाचा त्यांस जिनगीचे हिस्से देण्याच्या वेळेस [ कांहीं जिनगी छपवून ठेवली असल्याबद्दल ] शंका आल्यास तशा प्रसंगीं विश्वासार्थ आणि अनेक प्रकारचे पुराव्याचे सत्यासत्याचा निर्णय करण्यांत सदा कोशदिव्यच करवावें. " 66 अविभाज्य. अविभाज्य ( विभाग न करण्याची ) जिनगी मनु सांगतो ( अं० ९ श्लो० २०६ ) " विद्येवर मिळविलेलें द्रव्य ज्याने मिळविलें त्याचेंच होय i तसेच स्नेहसंबंधास्तव मिळालेली देणगी, व विवाहाचे वेळेस किंवा मधुपर्कसमयीं मिळालेली देणगी, [हैं. अविभाज्य धन ]. " व्यास विद्येवर मिळविलेलें, शौर्यावर मिळावलेलें, किंवा सौदायिक ( नातलगांकडून विवाहाचे वेळीं मिळालेली देणगी ) द्रव्य, हें ज्यानें मिळ- विलें त्याचें असें विभागाचे समयीं [ समजावें ]; इतर हिस्सेदारांचा त्यावर कांहीं एक वारसा चालणार नाहीं. "" सौदायिक' ह्मणजे काय तें पुढें ( याच प्रकरणांत ) सांगण्यांत येईल. अविभाज्य धन यथं सांगितलें तें वडिलार्जित धनास कांहीं नुक २३