पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६ व्यवहारमयूख. अंगात तू ' या ऋचेचा जप करावा व पुत्राच्या मस्तकाचा वास घेऊन वस्त्रे वगैरेंनी त्यास सुशोभित करून मंगलवाद्ये वाजवीत पुत्रास घरांतील मध्यभागी ( माजघरांत ) न्यावे. नंतर आचार्यानें आज्यस्थापनादि आज्यभागविधीचे शेवटापावेतों कर्म करून व व्याहृति- मंत्रांनीं प्रथम एक एक व्याहृतीनें व शेवटीं समस्त व्याहृतीनें आज्यहोम करावा व त्यापुढे चरुहोम करावा. पुत्रप्रतिग्रहकर्मातील मुख्य चरुहोम ' 'यस्त्वादा' या मंत्रानें प्रति- ग्रह परिपूर्तीसाठी करावयाचा. [ या मंत्राचा ऋषि ] वसश्रुत, [देवता ] अग्नि, आणि [ छंद ] त्रिष्टुप्. ' यस्त्वाहृदा ' [ इत्यादि मंत्र ह्मणावा ] आणि आहुति देऊन ' अग्नये इदं न मम ' ( हैं अनीस अर्पण केलें, तें आतां माझें नव्हे); पुनः ' तुभ्यैमग्ने ' इत्यादिक मंत्रानें होम करावा. [ या मंत्राचा ऋषि आणि देवता ] सूर्यासावित्री [आणि छंद ] अनुष्टुप्. [ आहुति देऊन ] ' सूर्यासावित्र्यै इदं न मम ' ' हें सूर्यासावित्रीस अर्पण, माझें नव्हे ' असें ह्मणावें. पुनः ' सोमोदेदेत ' [ इत्यादिक पांच ऋचांनी होम करा- वा ]. [ या मंत्राचा ऋषि व देवता ] सूर्यासावित्री, [ आणि छंद ] अनुष्टुपू. विनि- योग पुर्ववत्च करावयाचा. 'सोमोदेर्देत्' इत्यादि पांच मंत्रांनी आहुति द्याव्या. नंतर स्विष्टकृत् होम करून हवनक्रिया पुरी करावी. याप्रमाणे दत्तपुत्र घेण्याचा विधि झाला. 5 सांप्रत विषयास आतां अनुसरूं. कर्जाचे विभाग करण्यांत कांहीं विशेष का- त्यायन सांगतो " बापानें केलेले कर्ज बापाचे ऋणसंबंधार्चे, आणि स्वतःचे, [ह्मणजे] स्वतःसाठी केलेलें हें सर्व कर्ज भावाभावांतील विभागाचे वेळेस फेडावें. वचनांत ' पित्र्यर्णसंबंधं ' ( बापाच्या ऋणसंबंधाचें ) असें ह्मटलें आहे त्याचा अर्थ पि- त्यानें केलेले कर्ज फेडण्यासाठी काढलेले कर्ज. "" आत्मीयं' स्वतःसाठी केलेलें (ह्मणजे आपले कुटुंबपोषणासाठी दुसऱ्याने केलेले कर्ज पुनः कात्यायन " कुटुंबाचे पोषणा- साठीं भावानें, चुलत्यानें, किंवा आईनें केलेलें असेल तें सर्व कर्ज वारशाचे हिस्से घेणा- रांनी विभागाचे वेळेस दिले पाहिजे. वारशापेक्षां कर्ज कमी असल्यास त्याविषयीं तोच स्मृतिकार ह्मणतो 'कर्ज देऊन व प्रीतिदत्त ( प्रीतिपूर्वक देऊं केलेली देणगी ) ह्मणून देऊं केलेले असेल तें देऊन बाकी राहील तें [ हिस्सेदारांनी ] वांटून घ्यावें. " 66 २३० ' ऋक्संहिता ' अष्टक ८, अ० ८, व० २१ ऋ० ६ २३१ ‘तैत्तिरीयसंहिता ' प्रथमकांड, चौथा अध्याय, शेवटचा अनुक् २३२ ' ऋक्संहिता' अष्टक ८ अ० ३ ० २७ ऋ० ३. २३३ 'ऋक्संहिता' अष्टक ८ अ० ३ ० २८ ऋ० १. २३४ ‘येथेही ‘सूर्यासावित्र्या इदं न मम' असा त्याग ह्मणावा (संस्कास्कौस्तुभ प० ४८ पृ० २).