पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नील कंठीय. १७५ वगैरे] यांचेमध्ये त्या त्या संबंधाला मानून होण्याचीं तीं तीं कार्ये करावी ह्मणून मी पुत्र- दान करतों. ' नंतर गणपतिपूजन,, स्वस्तिवाचन, मातृकापुजन आणि वृद्धिश्राद्धादिक धर्मकार्ये करावी. पुत्र घेणाराने पुत्र घेण्याचे पूर्व दिवशीं उपोषण करून दुसरे दिवशीं आपल्या सर्व भाऊबंदांस बोलावून व आपण दत्तपुत्र देणार ह्मणून राजास कळवून पुढे [ अमुक वर्ष, महिना, दिवस ] कालादिकाचें स्मरण करून असा संकल्प करावाः 'जो मी दत्तपुत्राणून घेणार त्याचा, त्याच्या बाप वगैरे नातलगांमध्ये सांप्रतचा पुत्र पिता वगै- रे प्रकारचा परस्पर संबंध नाहींसा व्हावा ह्मणून व मी व माझे इतर संबंधी आणि हा पुत्र यांमध्यें पितापुत्रादि संबंधाचे कारणाने होण्याची सर्व कार्ये परस्परांकडून व्हावीं ह्मणून मी पुत्र घेतों.' पुढे गणेशपूजा, स्वस्तिवाचन, मातृकापूजन, व वृद्धिश्राद्ध हीं करावी, आणि [ दत्तपुत्रावधि चालविण्यासाठी ] आचार्यास सुपारी देऊन व त्याची मूजा करून आणि कानांतील कुंडलें, आंगठी, धोतरजोडा, व पागोटें हीं देऊन संकल्पपूर्वक मधुपर्कादिक आचार्यपूजा केल्यावर तीन ब्राह्मणांस व भाऊबंदांस भोजन घालावें. आचार्यानें तर 'मी आपले कर्म करतों' असा संकल्प करून स्थंडिल करावें, त्यावर रेषा काढाव्या, व सर्व इतर कृत्ये करून नंतर अग्निप्रतिष्ठापन करावें. नंतर अन्वाधान करावें. [' अस्मिन् अन्वाहितेग्नौ' एथून आरंभ करून ] “चक्षुषी आज्येन" येथपर्यंत ह्मणून या कर्मांत प्रधान अग्नीस, वायूस, सूर्यास, व प्रजापतीस एक एक घृताची आहुति देईन; पुनः एक चरू- ची आहुति अग्नीस, व सूर्यासावित्रास साहा चरूच्या आहुति देऊन, बाकी चरु राहील त्यानें ' स्विष्टकृत् ' होम करीन असें तोंडानें ह्मणावें; नंतर आज्योत्पवनसंज्ञक कर्मापावे - तो कर्म करावें. इतकें झाल्यावर दत्तपुत्र घेणारानें पुत्र देणाराजवळ जाऊन ' पुत्र दे' अशी माग- 'णी मागावी. 'ये यज्ञेनं ' इत्यादिक पांच ऋचा उच्चारून काळ व देश यांचे स्मरण करून ( अमक वर्ष, महिना, दिवस हे उच्चारून ) [ देणाराने करण्याचा ह्मणून वर संकल्प सांगितला आहे तो ] संकल्प करावा, आणि 'माझ्या शक्तीप्रमाणे अलंकृत केलेला हा पुत्र मी देतों ' असें ह्मणावें. ज्या पांच [मंत्रांचा ] ऋषि, मानव पुत्र नाभानेदिष्ठ, ज्यांची देवता विश्वेदेव, व ज्यांचा छंद जगती, असे " ये यज्ञेन " हे पांच मंत्र पुत्रदानाचे परिपूरणार्थ ह्मणावे. पुत्रदान घेणारानें 'देवस्यत्वा या मंत्राने पुत्राचे ग्रहण करून स्वशाखेतील कामस्तुतचि पठण करावें; व 'अंगात् २२७ ऋक्संहिताअष्टक ८, अ० ३, वर्ग १, ऋ० १. २२८ 'तैत्तिरीयारण्यक' तृतीयाध्याय, दहावा अनुवाकू. २२९ २२९ ' आश्वलायन श्रौतसूत्र' पूर्वषट्क, अ० ५ ० ३ सू० १५ ( पृ० ४३१) ,२२८