पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ व्यवहार मयूख. १,२२५ मुख्य पितृत्व प्राप्त होण्यास अवश्य ये २४ जें उत्पादकत्व ते नसल्यामुळे व उपनयनसं- स्कार त्याजकडून झालेले नसल्यामुळे पालकपित्याचा कुळांत तीन पुरुषांपावतों मात्र सापिंड्य. परंतु [ दत्तकाचे ] उपनयनादि संस्कार पालकपित्याच्या गोत्रांत झाल्यास पालकपित्याशीं वगैरे सात आणि पांच पिढ्यांपावेतों सापिंड्य संबंध उत्पन्न होतो. ' परंतु यास आधार काय आहे हें आह्मांस माहीत नाहीं. उत्पादकत्व नसल्यामुळे व त्याजकडून उपनयनादि संस्कार झालेले नसल्यामुळे जर दत्तक घेणारास पितृत्व प्राप्त होत नाहीं, तर त्याच्या कुळांत तीन पुरुषांपावेतों सापिंड्य संबंध व घेणारा पिता वगैरे यांचीं श्राद्धे करण्याचा अधिकार हीं दत्तकास कशी येतील ? उत्तर कीं, पितृत्वाची आणि सापिंड्य संबंधाची व्याप्तिी सारखी नाहीं ह्मणून जेथें पितृत्व नसेल तेथें सापिंड्य संबंधही नाहीं असे होत नाहीं. वस्तुतः तर " बापाकडील सातव्या पिढीच्या भाई- बंदांपावेतों " पालकपिता वगैरे पुरुषांशी सापिंड्य संबंध आहे हे पूर्वी गौतमादिकांच्या वचनांनी सांगितलेले आहेच. पुत्राचें दान व प्रतिग्रह यांचा विधि आतां सांगतों. २२५ पुत्र सधवा स्त्रियांस नसेल किंवा होऊन मेला नवऱ्याच्या आज्ञेनें दत्तपुत्र आतां ( 'अ) सर्वांत वडील पुत्र शिवाय करून कोणताही पुत्र [ दत्तक ह्मणू । ] देण्यास मात्र सर्वांस अधिकार आहे. परंतु स्वतःस असेल तर मात्र घेणाराप्त अधिकार येतो. घेण्याचा अधिकार येतो. नवरा नसल्यास बापाच्या वगैरे ( ज्ञातींच्या ) आज्ञेनें अधि- कार येतो. शूद्र जातींत मुलीचा मुलगा किंवा बहिणीचा मुलगा मात्र घेण्याचा अधिकार आहे; दुसरा घेण्यास नाहीं. इतर उच्च जातींस अगदी जवळचा सपिंड असेल तो घेण्याचा अधिकार. जवळचा नसल्यास दूरचा; परंतु अन्य जातीचा दत्तपुत्र घेण्याचा अधिकार नाहीं. २२६ 6 दत्तपुत्र देण्यासाठी ठरविलेले दिवशी देणाराने ( अमुक वर्ष, मास वगैरे) व देश यांचें स्मरण करून असा संकल्प करावाः आह्मी (मी आणि आमचे वंशांतील पुरुष ) व [ दत्तक ह्मणून देण्याचा ] हा पुत्र या उभयतांमध्ये जे पितृपुत्रादि स्वरूपाचे अनेक संबंध आहेत व त्या संबंधापासून जीं परस्परसंबंधानें उभयतांस अनेक कर्तव्ये उद्भ वतात ते संबंध व ती कर्तव्यें नाहींशी होऊन हा पुत्र व दत्तक घेणारा [ व त्यांचा वंश दिसतो. २२४ ‘पितृत्त्वप्रयोजक' असा येथे पाठ आहे, परंतु ' मुख्यपितृत्त्व प्रयोजक' असा पाठ चांगला २२५ याचा विस्तार ‘संस्कारकौस्तुभ ' ग्रंथांत पहावा प० ४९ पृ० १ ( २२५ अ ) हा लेख पूर्वी याच मंथकाराने ठरविलेले सिद्धांताविरुद्ध आहे. २२६ पूर्वी लिहिलेल्या निर्णयाप्रमाणे 'संभव असेल तर ' असा अभ्याहार येथे करणे जरूर आहे. ( मागील पृ० पहा ).