पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय १७३ भेद मानला तरच सुसंगत होते. केवल दत्तक असा दत्तकांतील भेद न मानल्यास सुसंगत होणार नाहीं. कोणी एक ग्रंथकार ह्मणतो कीं, गौतमवचनाचे आधारावरून भट्टसोमेश्वर यानें शुकुलाशीं सात पुरुषांपावेतों कुंतीचा सापिंड्य संबंध सांगि- तलेला आहे. परंतु हें ह्मणर्णे ज्यास ग्रंथाचे अध्यपन नाहीं त्याचें समजलें पाहिजे. कारण भट्टसोमेश्वर यानें तर पहिल्यानें सापिंड्य संबंध राहात नाहीं असें सांगून नंतर गौतमवचनाने बापाचे कुळांत सात पिढ्यांपावेतों विवाह होण्यास निषेव आहे असें सांगितलें आहे. गौतमवचनानें सापिंड्य संबंध बोधित होतो असें सां- गितलें नाहीं. याप्रमाणें केवल दत्तक व द्वयामुष्यायण दत्तक हे दोन्हीही सिद्ध झाले, . ह्मणून " हा आह्मां उभयतांचा पुत्र " अशी शर्त द्वयामुष्यायण दत्तकास आहे तीही अर्थात् सिद्ध होते; कारण अशा शर्तींत जो उघड हेतु कीं, दत्तक घेणाऱ्या पित्यानें " 66 दत्तक तो पुत्र दोघांचा असें समजावें, तो सफल झाला. तेव्हां आतां केवल दत्तक पुत्राचा सापिंड्य संबंध पालक बापाचे कुलांत बापाच्या बाजूकडे सात पुरुषांपात्रतों पोंचतो; व आईच्या बाजूकडे पांच पिढ्यांपावत पोचतो. परंतु वृद्धगौतम ह्मणतो " दिलेले, विकत घेतलेले किंवा इतर पुत्र, त्यांचे संस्कार पालकपित्याचे गोत्रांत झाले अप्तल्यास, त्या संस्कारांच्या कारणाने त्या गोत्रांत मात्र येतात, परंतु त्यापासून सापिंड्य संबंध उत्पन्न होत नाहीं. बृहत् मनूचेंही' असेंच दत्तक दिलेले, विकत घेतलेले आणि इतर पुत्रांचा सापिंड्य संबंध उत्पादक बापाच्या कुळाशी [ अनु- क्रमाने आईचे बाजूस व बापाचे बाजूस ] पांचव्या आणि सातव्या पिढीपावेतों राहातो; परंतु पालकपित्याचे संबंधानें या पुत्रांस केवळ गोत्रित्व मात्र येतें. " नारदाचे- ही असें वचन आहे " धर्मक्रिया सिद्ध व्हाव्या ह्मणून जे पुत्राप्रमाणे वाढविलेले पुत्र असतात ते [ दायाचा ] अंश व पिंड यांविषयीं मात्र विभागी होतात ". परंतु हीं सर्व वचनें अगदी निराधार आहेत. या वचनांस कांहीं आधार असला तरी तो द्वयामुष्यायण पुत्रास पालकपित्याचे कुळांत सात पुरुषांपावेतों सापिंड्य संबंध नाहीं हैं दर्शविण्यापुरताच समजला पाहिजे; कारण पूर्वी लिहिलेल्पा गौतमवचनानें केवल दत्तक पुत्रास पालकपित्याचे कुळांत सात पुरुषांपावतों सापिंड्य संबंध सांगितलेला आहे; आणि मनुवचनाने जनकपित्याच्या कुलाशीं सापिंड्य संबंध नाहींसा होतो ह्मणून सांगि- तलेले आहे. सापिंड्यनिर्णय ग्रंथांत कांहीं शहाण्या ग्रंथकारांचे मत आहे की " [ दत्तक दिलेल्या पुत्रांचे ] उपनयनादि संस्कार जनकपित्याच्या गोत्रांत झालेले असतील [ आणि नंतर तो दत्तक दिला जाईल ] तर जनकपित्याचे कुळांत बापाच्या बाजूकडे सात पिढ्यांपावेतों- व आईच्या बाजूस पांच पिढ्यांपावेतों सापिंड्य संबंध राहातो; परंतु