पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहांविषयीं. ४१

चार भिन्नभिन्न होता असा दृढ निश्चय होतो... ही गोष्ट लक्षात ठेविली ह्मण जो अलीकडे केव्हां केव्हां आधुनिकन्यायाधीश विवाहाच्या सशास्त्रतेविषयों अगर अ शास्त्रतेविषयों ग्रंथ पाहून निर्णय करण्याचा यत्न करितात, तो अगदीं बराबर नाहीं ' हे उघड होईल. ५७ . (४९.) एक उदाहरण देतो त्यावरून है व्यक्त होईल. स्पेशल अपील नं० ३९७ सन १८७९, रामण गावडा आणि दोन असामी वि०. शिवाजी रायाजी पाटील, या कज्जांत वादीनें आपण दत्तक पुत्र आहों. ह्मणून दत्तक घेणाऱ्या बापाच्या मिळकतीवर दावा करण्याची फिर्याद केली. तो दावा दत्तविधान शाबीद धरून खालील दोन्ही कोर्टानी देवविला. पुढे हायकोटीनें ते दोन्ही ठराव रद्द करून वादीचा दावा काढून टाकला. त्याची कारणे दिली आहेत, ती अशी:- "निशाण नंबर ५१, ५४ व ७८ च्या कागदां- वरून हे उघड होतें कीं, दत्तक घेणारी नरसावा ही आपल्या नवयाच्या बहिणींची मुलगी होती. साधारण हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे भाचीशी विवाह अशास्त्र आहे; कारण सपिंडेशी विवाह करण्याची शास्त्रावरून मनाई आहे. (पहा० मनु अ० ३ श्लो० ५; याज्ञवल्क्य अ० १ ० ११९२; विज्ञानेश्वर आचारकांड सदर श्लोकावरील टीका; वेस्ट व बुलर पा० १४१; व्यवहारमयूख भाग ४, कलम २९; म्याक्नाटन पा० ६१ व स्टील प्रथमावृत्ति पा० ३३, ३६, १६५, १६८). या आधारांवरून प्रस्तुतचा विवाह ·प्रतिषिद्धव्यभिचारस्वरूपाचा आहे हे ठरतें, ह्मणून तो विवाह रद्द मानला पाहिजे. मात्र अशा स्त्रीचें भर्त्यानें व त्याच्यामार्गे त्याच्या कुटुंबानें भरणपोषण केले पाहिजे, ज्या ब्राह्मण जातींत हा विवाह झाला, त्या जातींत असा विवाह आचाराने मान्य झाला आहे अशी तकरार अगर पुरावा त्या कज्यांत नाहीं, ह्मणून रायापाचें लग्न नरसावाशीं झालें तें नच झाल्यासारखें मानले पाहिजे व तिनें रायापास ह्मणून पुत्र दत्तक घेतला तें दत्तविधानही रद्द समजले पाहिजे. " (५०.) आतां आचाराविषयीं गैरमाहित न्यायाधीशांनीं, विवाहासारखे जे संस्कार विशेषत: आचारमूलकच आहेत त्यांविषयीं, निर्णय करण्याचें मनांत आणले ह्मणजे काय काय अनर्थ होतील, व लोकांच्या मनांत न्यायासनाविषयीं अविश्वास कसा उत्पन्न होईल याचे वरील ठराव है उत्तम उदाहरण आहे. साधारण हिंदुधर्मशास्त्र ह्मणजे काय व असाधारण हिंदुधर्मशास्त्र ते कोणतें, याचें निर्णायक चिन्ह सदरच्या ठरावांत कांही सांगितलेलें नाहीं. धर्मशास्त्राची मूले ह्मणून मनुयाज्ञवल्क्यप्रभृतींनी सांगि- तलेली आहेत, त्यांत सदाचारही सांगितलेला आहे, आणितो श्रुति व स्मृति यांबरोबर समान ५७ मुं० हा० छापी ठरावांची फैल सन १८७६ पा० ७३. !