पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ व्यवहार मयूख. नाहींत " ]" असें गौतमवचन आहे यावरून जनकपित्याच्या वंशाकडील सातव्या पिढीचे आंतील नातलगाशीं लग्न करणें सर्वथैव निषिद्ध केलेले आहे ; ह्मणून हा शास्त्रार्थ द्वयामुयायण दत्तकपुत्राचे संबंधानें निरर्थक होईल; कारण जनकपित्याशीं त्याचा सपिंडसं- बंध नित्यच आहे; ह्मणून गौतमस्मृतीस सार्थकता येण्यासाठीं केवल दत्तकपुत्र हा भेद मानलाच पाहिजे; कारण केवल दत्तकाचा सपिंडसंबंध जनकपित्याशी राहात नाहीं असें सांगितलेले आहे; शिवाय प्रबराध्यायांत असें सांगितलेले आहे की " दत्तक ह्मणून दिल्या- मुळे, विकत घेतल्यामुळे, किंवा दुसऱ्या मार्गानें जे द्र्यामुष्यायण पुत्र झालेले असतील त्यांनी शौंग व शैशिर यांप्रमाणें [ जनकपिता व पालकपिता ] या दोघांच्याही कुलांशी लग्नसं- बंध करूं नये. १२२३ या वचनानें यामुष्यायणाला दोन्ही गोत्रें ( जनकपालक पित्यांचीं ) सांगितलेलीं आहेत ; व मनु तर जनकपित्याच्या गोत्राशी संबंध तोडून टाकतो. तेव्हां या दोन वचनांचा परस्पर विरोध येतो. यांची एकवाक्यता केवल दत्तक व द्वयामुष्यायण दत्तक असे दत्तकाचे दोन भेद मानल्यावांचून होऊं शकत नाहीं. अर्थात् केवल दत्तक हाही भेद सिद्ध होतो. शेरै ( अ ) राजानें कुंतिभोज राजास दत्तक ह्मणून दिलेल्या आपल्या कुंती नावांच्या कन्येच्या अर्जुन नांवाच्या पुत्राचा सांपिंड्य संबंध त्याच शूर राजा- च्या वसुदेव नांवाच्या पुत्राच्या सुभद्रा नांवाच्या कन्येशी प्राप्त झाला तो पूर्वी सांगितले- ल्या मनुवचनानें दूर करून, जनकपित्याच्या सात पिढ्यांचे आंतील पुरुषांशी लग्नसंबंध नाहीं ह्मणून जें गौतमवचन पूर्वी सांगितलेले आहे त्यावरून अर्जुन सुभद्रा हीं दोन्ही शूर राजाची संतानें ह्मणून (विवाहप्रतिबंधक असा) त्यांचा परस्पर संबंध असतां त्यांचा वि- वाह होणें योग्य नव्हतें अशी आशंका घेऊन, अर्जुन सुभद्रा यांचा तसा संबंध नाहीं, तर दोघांमध्यें दत्तकरूपानें व्यवधान आहे (कुंती दत्तक दिलेली असल्यामुळे कुळ निराळें झालें आहे) असें वार्तिकाधाराने भट्ट सोमेश्वर याने समाधान सांगितलें तें केवल दत्तक २२१ दत्तकमीमांसा पृ० ३१. २२२ ‘निषिद्धः सद्व्यामुष्यायणे' या ठिकाणी ' तिविरुद्धः स्याद्वयामुष्यायणे' असा पाठ पुष्कळ पुस्तकांत दिसतो. परंतु येथे घेतलेलाच योग्य दिसतो. २२३ गोपीनाथकृत रत्नमालेंत हें वचन पारिजातमंथांतील आहे असें लिहिलेलें आहे. (२२३ अ ) शूर राजानें कुंती नांवाची आपली कन्या कुंतिभोज राजास दत्तक ाणून दिली होती त्यानें ती कन्या पंडूस दिली. त्यापासून तिला अर्जुन झाला. त्याच शूर राजास वसुदेव नांवाचा पुत्र होता त्याची कन्या सुभद्रा झंगून यांचे (अर्जुन व सुभद्रा यांचे) मामेभावंडे यासंबंधानें नातें असतां लग्न झालें हें प्रसिद्धच आहे.