पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय " १७१ एकाच पिढीपावेतों करावें. [ दत्तपुत्रादिकांच्या ] चौथ्या पिढीपासून इच्छेप्रमाणें करावें. या कारणामुळे या पुत्रांस पिंडसंबंध तीन पुरुषांपावेतों मैत्रिं. साधारण तिथिपर्वाचे वेळेस [ नियमित काळी केलेले श्राद्धाचे समयीं ] पितरांचे पिढ्यांचा विशेष विचार नाहीं. पण वार्षिक एकोद्दिष्ट श्राद्ध हें शास्त्रक्क्त प्रकाराने एकालाच उद्देशून केलें पाहिजे. " परंतु ह्या वाक्याचा अर्थ कात्यायनस्मृतीस अनुसरूनच आहे. तो असाः द्वयामुष्यायण व दत्तकादिक पुत्रांनी जनक पिता अथवा पालक पिता या दोघांच्याही कुलांत मरतील त्यांचें सपिंडीकरण श्राद्ध मृताचे पितृत्रयीशी करावें; दत्त- कादिकांच्या पुत्रांनी तर जनकपिता व पालकपिता यांचें सपिंडीकरण त्या दोन्ही कु- ळांतील पितृशीं करावें; त्याच्या नातवांनीही आपल्या बापाचें सपिंडीकरण दत्तक वंशांतील पितृत्रयीशीं करावें. चौथ्या पुरुषाविषय, ह्मणजे दत्तकादिकाच्या पणतू- विषयी तर त्याची इच्छा असेल तसें करावें. 'छंद' ह्मणजे इच्छा [ दत्तकादिकाचे ] पालकपित्यास त्यानं उच्चारावे किंवा न उच्चारा; परंतु दत्तकाचे जनकपित्यास उच्चारलेंच पाहिजे. ' साधारणेषु' ह्मणजे अमावास्येप्रमाणे साधारण पर्वाचे वेळेस जनकपिता व पालकपिता या दोघांच्याही पितृगणांचे श्राद्ध करावें. मृतंदिवशीं तर ( मरणास ज्या दिवशी वर्ष होतें त्या दिवशी तर ) एकासच उद्देशून एकोद्दिष्ट श्राद्ध करावें. कोणी असें ह्मणतात कीं, ' केवल ' दत्तकपुत्र असा कोठेच सांगितलेला नाहीं, ह्मणून केवल दत्तक नाहीच. 'हा आमचे दोघांचेही कार्य करणारा' अशा ठरावाचे दत्त- कप्रकरणांत कोठें विधान नाहीं ह्मणून अशा करारावांचूनही घेतलेला दत्तकपुत्र द्वयामु- ध्यायणव. अमावास्यादि साधारण पर्वकाली जनकपिता व पालकपिता यांच्या उद्देशानें. निरनिराळी दोन श्राद्धे किंवा एकच श्राद्ध करावें. द्वयामुष्यायणाच्या पुत्राने तर आ- पल्बा बापाचें सपिंडोकरण व पार्वणश्राद्धादिक कार्य [ बापाचा ] जनकपिता व पाल- कपिता यांच्याशी मिळून करावें. याचप्रमाणे त्याच्या पुत्रादिकांनीही ( द्वयामुष्यायणा-- च्या नातवादिकांनीही ) करावें.. परंतु हें ह्मणणे संशयास्पद होय; मान्य नाहीं. 'केवल दत्तपुत्र ' अशा शब्दांनी निराळा भेद कोठें स्पष्ट रीतीनें सांगितलेला नाहीं ही गोष्ट खरी आहे, तरी वर लिहि- लेल्या मनुवचनानें [ केवल दत्तकाचे संबंधानें ] जनकपिता व तत्संबंध इतर पुरुषांशी [ सर्व प्रकारचें ] ना सर्वथैव तोडून टाकिलेले असल्यामुळे [-द्वयामुष्यायण ] दत्तकाच- संबंधानें तसें नातें तोडून न टाकिल्यामुळे वरील भेद सहजच सिद्ध होतो. दुसरे कारणः [ जनक ] पित्याच्या वंशाच्या गोतवळ्यांतील सातव्या पिढीपावतों ब जननीच्या वंशाकडील गोतवळ्याच्या पांचव्या पिढीपावेतों [पुरुषांश लग्ने होत. २२० दत्तकमीमांसा पृ० ३४; दत्तकचंद्रिका पृ० ५८.. 66