पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० व्यवहार मयूख. करावें. असेंच दत्तपुत्राच्या नातवानेही करावयाचें. कात्यायनऋषि द्वयामुष्यायण पु- त्राच्या संबंधानें विचार करतेवेळेस प्रारंभी ह्मणतो " आतां ज्या अर्थी दत्तक, क्रीत, व पुत्रिकापुत्र ह्या जातींचे पुत्र, दुसज्यांनीं त्यांस घेतल्याकारणानें, प्रवर नाहीं असे झाल्यास ते द्वयामुष्यायणपुत्र े होतात असेच समजले पाहिजें. " [ पुनः तो हम- णतो ] “ जर यांस ( दत्तकादिपुत्र घेणारास किंवा देणारास ) स्वपत्नीपासून अपत्य झालेले नसेल, तर ते (दत्तादिपुत्र ) त्यांची जिनगी घेतील; व त्यांस तीन पुरुषांपावेर्तो पिंड देतील. जर दोघांसही ( जनक पिता व पालक पिता यांसही ) अपत्य नसेल तर ते दोघांसही [ तीन पुरुषांपावेतों ] पिंड देतील; * [ मात्र ] एकाच श्राद्धांत दत्तक घे- णारा पिता व उत्पादक पिता या दोघांचीं पृथक नांवें तीन पिढ्यांपर्यंत घेऊन दो- घांस निरनिराळे पिंड द्यावे. " हें द्वयामुष्यायण दत्तपुत्रांसच लागू; कारण त्यांच्याच प्रकरणाच्या संबंधानें तें वचन आहे, ह्मणून वर सांगितलेले. पुत्र द्वयामुष्यायणसंज्ञक हो- तात असे स्पष्ट मटलेलेच आहे. यावरून जनक पित्यास किंवा पालक पित्यास औरस पुत्रसंतान नसेल तर ज्यास नसेल त्यास किंवा दोघांसही द्वयामुष्यायण दत्तपुत्राने पिंड द्यावा व त्याची किंवा त्यांची जिनगी घ्यावी; पण औरस पुत्र असल्यास तसें करावयाचें नाहीं. जर जनक पिता आणि पालक पिता या उभयतांसही औरसपुत्र असतील, तर दोघांतून कोणासही त्यानें पिंड द्यावयाचा नाहीं. पण घेणान्याच्या औरसपुत्रांस जिनगीचा जो हिस्सा मिळेल त्याचा चतुर्थांश या पुत्राने घ्यावा. याविषयीं वसिष्ठवचत " दत्तपुत्र घेतल्यानंतर जर औरस उत्पन्न होईल, तर जिनगीच्या एका हिश्शाच्या चौथा हिस्सा त्यास मिळेल. १२१८ त्याविषयीं दुसरा आधार. कात्यायन " [ दत्तकादिपुत्र घेत- ल्यानंतर ] औरस पुत्र होईल व ते दत्तादिपुत्र सवर्ण असतील, तर [ प्रत्येकीं ] एक विभागाचा चतुर्थांश घेण्यास ते अधिकारी होतात. परंतु ते भिन्न वर्णाचे असल्यास त्यांस अन्नवस्त्र मात्र मिळण्याचा हक्क आहे. " कल्पतरु ग्रंथांत, हे पुत्र एक विभागाचा " तृतीयांश घेणारे " अशा अर्थाचा पाठ लिहिलेला आहे. वरील कात्यायनस्मृ- तीत ' सवर्णाः ' ( एक वर्णाचे) याचा अर्थ विज्ञानेश्वराच्या मतें क्षेत्रज, द- त्तक वगैरे असो. जेव्हां दोहोंकडील बापांस औरस पुत्र नसतील, तेव्हां त्याने पूर्वी सांगितल्याप्रमाणें दोघांचेही श्राद्ध एकत्रच करावें. परंतु हेमाद्रि ग्रंथांत का- जिन ह्मणतो की, दोघांच्याही ( जनक व पालक पित्यांच्या ) वंशांत जि- तके पितर असतील तितक्या सर्वांशी दत्तकादिक पुत्रांनीं आपल्या पितरांचें सर्पि- डीकरण करावें; त्यांच्या पुत्रांनी दोन पिढ्यांपावेतों करावें; व त्यांच्या नातवांनी २१८ मि. व्य० प० ५५ पृ० २; बी० प० १९० पृ० २ ० वि०. २१९ मि० व्य० प० ५२ प० २. २१७ क० वि०.