पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

T] नीलकंठीय. १६७ २०८ नवऱ्या- ज्याचे ज्ञातिबंधू दूर आहेत त्याला ( अशा पुत्राला ) शूद्राप्रमाणें अगदी दूर ठेवावे. कारण, ही गोष्ट सर्वांस माहीतच आहे कीं, [ दत्तक घेतलेले ] एकाच पुरुषाचे द्वारानें [ दत्तक घेणारा ] अनेकांस तारतो. जर दत्तक घेतल्यानंतर औरस पुत्र होईल तर दत्तक घेतलेले पुत्रास [औरस पुत्राच्या हिश्शाचा] चतुर्थांश हिस्सा मिळावा. १२०९ ची परवानगी पाहिजे ह्मणून लिहिलेले आहे ते सधवा स्त्रीसच लागू आहे; कारण त्यास व्यावहारिक उवड हेतु आहेत. विधवेला नवऱ्याची परवानगी नसूनही बापाची किंवा बाप नसल्यास ज्ञातीची आज्ञा घेऊन दत्तक पुत्र घेतां येतो. याच हेतूनें याज्ञवल्क्य ह्मण- तो (आ० श्लो० ८५ ) " कन्यादर्शत बापाने स्त्रियांचे पालन करावें, लग्न झाल्यावर `पतीनें, ह्मातारपणीं पुत्रांनों; पुत्र नसल्यास ज्ञातीनों करावें. स्त्रियांस स्वतंत्रपणा कोण- ही कार्य करण्यास नाहीं. " या स्मृतीवरून स्पष्ट दिसून येतें कीं, सुवासिनीस्थित त मात्र स्त्री पतिपरतंत्र (नवऱ्याच्या आधीन ) आहे. तो नसल्यास, किंवा वृद्धपणानें किंवा दुसन्या कारणानें दुर्बळ झाला असल्यास पुत्रादिकांवर ही स्त्री अवलंबून राहते. बापाची, नवऱ्याची वगैरे आज्ञा घेण्याविषयीं में शास्त्र आहे ते त्या त्या वयांत मात्र लागू . आहे असा कात्यायनाचाही अभिप्राय आहे. [ तो असा ] " कोणतेंही और्ध्वदेहिक ( स्वर्गादिक लोकांस उद्देशून केलेलें ) धर्मकृत्य बाप, नवरा, किंवा पुत्र यांची आज्ञा घेत- ल्यावांचून स्त्री करील तर तें करणें व्यर्थ. " 'और्ध्वदेहिकं ' ह्मणजे परलोकास उद्देशून केलेले धर्मकृत्य. यावरून ज्या कांहीं विशेष अवस्थेत नवऱ्याची. आज्ञा ह्मणून [ यान- वल्क्यानें ] पूर्वी सांगितलेलें आहे त्या आज्ञेचाच येथें अनुवाद केला आहे. हा नवीन नियम स्थापित केला असें नाहीं. या कारणास्तव नवऱ्याच्या आज्ञेवांचूनही विधवेस दत्तक घेण्यास अधिकार आहे असें सिद्ध होतें. 'अदूरे बांधवः ' ह्मणजे जितका जवळचा सपिंड पुरुष सांपडेल तितका. अगर्दी जवळचे सपिंडांत भावाचा पुत्र मुख्य; कारण मिताक्षराग्रंथांत मनुस्मृति (अ० ९ लो० १८२ ) आधार ह्मणून दाखविलेली आहे ती अशी. 'एका बापापासून झालेले भावांपैकी जर एक पुत्रवान होईल तर त्या पुत्राचे द्वाराने बाकीचे सर्व बंधु पुत्री होतात 66 २०८ ‘ अदूरे बांधवं संनिरुष्टमेव गृहीयात् ' असा पाठ एथे आहे, परंतु मिताक्षरा व वीरमित्रोदय ग्रंथांत ‘अदूरबांधवं बंधुसंनिकृष्ट एव प्रतिगृहीयात असा पाठ आहे. 'संदेहचोत्पन्ने दूरेबांधवं शूद्र- मिवस्थापयेत् । विज्ञायतेह्येकेन बहूंस्तारयेदिति तस्मिंश्चेत्प्रतिगृहीत औरस उत्पद्येत चतुर्थभागभागी ग्यात्’ हा भाग येथे दिलेला आहे परंतु तो अन्य ग्रंथीं नाहीं. मि० व्य० प० ५५ पृ० १, बी० प० १८९ पृ० १ क० वि०, व्य० मा० २०९ भित्र व्य० प० ५५ पृ० १० वी० प० १८९ पृ० १९; क० वि०; व्य० मा०