पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ 64 व्यवहारमयूख. 4 या मुद्याचा सविस्तर निर्णय आमच्या वडिलांनी 'द्वैतनिर्णय' ग्रंथांत केला आहे, आणि शिष्टांचा चालू संप्रदायही असाच आहे. 'निषादस्थपति' न्यायानें जसा निषादास यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त होतो तसा शूद्रात दत्तक घेण्याचा अ- धिकार प्राप्त झालेला असून पुत्रप्रतिग्रहविधीमध्यें होम वैदिक मंत्रांनी कर्तव्य आहे ह्मणून त्यास दत्त पुत्र घेण्याचा अधिकार नाहीं, असें शुद्धिविवेक ग्रंथांत सांगितलेले. आहे तें (शौनकवचनानें ) खंडित होतें. शूद्रानें समंत्रक होम तर विप्रद्वारा करावा. या- विषयीं पराशरस्मृति उपवास, व्रतें, होम, तीर्थस्नान व जपादिक [ धर्मकृत्यै हीं ] ब्राह्मणांनीं ज्याकरितां केली जातात त्यास त्या कृत्यांचें पूर्ण फल प्राप्त होतें. " स्मार्त आणि हरिनाथ या दोघांही ग्रंथकारांची अशीच मतें आहेत. " दक्षिणा मिळविण्याचे हेतूनें शूद्राचा होम हवनादिक विधि जो ब्राह्मण करील तो ब्राह्मण शूद्र होतो; [ आणि ज्या शूद्रासाठीं तें कृत्य केलें ] तो शूद्र ब्राह्मण होतो” असें पराशरवचन आहे, याचा अर्थ, शूद्राचें काम यथासांग होतें आणि ब्राह्मणास दोष लागतो असें माधवाचें मत आहे. स्त्रियांसही शूद्राप्रमाणेंच ( दत्तक घेण्याचा ) अधिकार आहे, कारण "स्त्रिया आणि शूद्र यांचे धर्म एकच " असें वाक्य आहे.. वसिष्ठ “ शुक्र व शोणित यांचा बनलेला व मातापिता या उभयतांचे कारणापासून उत्पन्न झालेला असा पुत्र असल्यामुळे त्यास देणें, विकणें, व सोडून देणें ही करण्यास त्यांस ( मातापितरांस) अधिकार आहे. पण एकच पुत्र असल्यास कोणी देऊं नये किंवा घेऊं नये, कारण तो पुरुषास ( देणाऱ्यास ) [ पूत्नामक ] नरकापासून सोडवितो. नवऱ्याचे परवानगीवांचून स्त्रीने पुत्र देऊं नये किंवा घेऊं नये. ज्यानें दत्त पुत्र ध्यावयाचा त्यानें आपल्या जातीस बोलवावें व आ-- पला विचार राजास कळवावा; आणि घराचे मध्यभागी व्याहृतिमंत्रांनी होम करून. स्ववर्णाचा व स्वजातीतील जवळचा [ मुलगा ] दत्तक घ्यावा. जेथें संशय असेल तेथें हे मात्र शूद्रानें दत्तक घ्यावे, असा संकुचितार्थ केल्यास वरील 'शूद्रानें शूद्र जातीचा दत्तक घ्यावा या सामान्य वाक्यास व्यर्थता येते. " २०६ ‘निषादस्थपतिं याजयेत् ' हे वेदवाक्य आहे. त्याचा अर्थ निषाद जातीच्या स्थपतीकडून ( सुताराकडून ) यज्ञ करवावा. वस्तुतः निषाद (शूद्र ) जातीचे उपनयन होत नाहीं, ह्मणून त्यास यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त नाहीं, तेव्हां त्याजकडून यज्ञ केला जाणार नाहीं अशी शंका येते, परंतु जरी सामान्यतः शूद्रास उपनयनसंस्कार नाहीं, तरी या वचनाचे बलावर त्याचें उपनयन करून यज्ञ कर- विला जातो. याप्रमाणें जैमिनीकृत पूर्वमीमांसा, सहावा अध्याय, प्रथम पाद, सूत्र ५१, यांत निषादस्थप- तिन्याय पहावा. २०७ ‘ पुत्रपरिग्रहे ’ या ठिकाणीं 'पुत्रप्रतिग्रहे ' असाही पाठ आहे. (क) (ख) (घ े ं(ड) (छ):