पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १६५ चार करूं. ( या स्मृतीचा अर्थ कन्येचा किंवा बहिणीचा मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार शूद्रासच असा, किंवा कन्येचा किंवा बहिणीचा मुलगा हे मात्र शूद्रास द- त्तक होऊं शकतील दुसरा होणार नाहीं, असा :) आतां ' जसें मैत्रावरुणाय दंडं प्रयच्छ- ति ' मैत्रावरुणास दंड देतो ) या वाक्यांत पूर्वी झालेला व पुढे होणारा उपयोग अ- सल्या कारणानें दंडाला भाव्यत्व ह्मणजे प्राधान्य संभवत असले तरी 'मैत्रावरुणाय ' या चतुर्थी विभक्तीनें ' दंडी प्रैषानन्वाह ' या श्रुतिवाक्यावरून प्रैषानुवचन कर्तृत्व आल्या कारणानें भाव्युपयोगी जो मैत्रावरुण त्यालाच भाव्यत्व सांगितले; त्याप्रमाणें सांप्रतचे वाक्यांत ' शूद्रस्य ' ह्या चतुर्थी समानार्थक षष्ठीनें अनपाकृतर्णत्त्वामुळे (ऋण फेडणें हें ज्यानें केलें नाहीं अशा हेतूस्तव ) दौहित्र व भागिनेय या दोघांपेक्षां शूद्रा- लाच प्राधान्य आल्या कारणानें भाव्यत्व ( उद्देश्यत्व, ह्मणजे मुख्यत्व ) आहे असें जाणावें; ह्मणून दौहित्र भागिनेय यांसच अप्राधान्य आल्यामुळे दौहित्र भागिनेय हेच शूद्राला दत्तक होतात अशी नियमविधिविषयता ही बोधित झाली. शूद्राला तर अविधेयत्व ह्मणजे प्राधान्य असल्यामुळे शूद्राला दौहित्र भागिनेय दत्तक होत अशा नियमविधिविषयतेचा संभव नाहीं. जर दौहित्र भागिनेय शूद्रालाच होतात असा वचनाचा अर्थ मानला तर विप्रादिक तीन वर्णांस हे दत्तक होऊं शकणार नाहींत अशी क्लिष्ट कल्पना करावी लागेल; ह्मणून शूद्रास दत्तक घेण्यास कन्येचा आणि बहिणीचा पुत्र हेच मुख्य. ते नसल्यास त्याच वर्णाचा दुसरा पुत्र घेण्यास मोकळिक आहे; कारण “ शूद्रांनी शूद्र जातींतील [ दत्तक घ्यावा ] ' " असें शौः. - काचेच वचन वर गेलें आहे. 'जाति' शब्दाचा अर्थ कन्येच्या आणि बहिणी- च्या पुत्रापावेतोंच व्याप्ति होण्यापुरता संकुचित करावयाचा नाहीं; कारण कन्येचा किंवा बहिणीचा पुत्र असला ह्मणजे तो सजातीय असलाच पाहिजे किंवा सजातीय असला ह्मणजे तो कन्येचा किंवा बहिणीचा पुत्र आहे असेंही नाहीं. सजातीयत्व असून कन्यापुत्रत्व किंवा भगिनीपुत्रत्व नसेल व कन्यापुत्रत्व किंवा भगिनीपत्रत्व असून सजातीयत्व नसेल अशा स्थलांत उक्त धर्मांचा ) परस्परव्यभिचार येतो. दुसरें कारण असें कीं, संकुचितार्थ केल्यास त्याच स्मृतीतील 'शूद्राणां शूद्रजातिषु ' ह सामान्य वाक्य व्यर्थ होईल.. • २०५

  • व्यभिचार ह्मणजे एका वस्तूचे ठायीं दोन धर्मापैकी एक असून दुसरा नसणें.

२०५ येथें 'शूद्रानें शूद्र जातीचा दत्तक घ्यावा' असा सामान्य नियम पहिल्यानें सांगितला आणि ज्या अर्थी स्वतःहून उच्च वर्णाचे स्त्रीशीं शूद्रपुरुषाचा विवाह कायदेशीर नाहीं, ज्या अर्थी शूद्राने शूद्रजातीचे स्त्रीशीच लग्न केलें पाहिजे, त्या अर्थी त्याच्या बहिणीचा किंवा कन्येचा पुत्र झटला ह्मणजे शूद्रच असला पाहिजे, ह्मणून ' कन्येचा व बहिणीचा मुलगा हे शूद्रास' या स्मृतीचा, कन्येचा व बहिणीचा मुलगा