पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ व्यवहारमयूख. तीला व बंधुवर्गास बोलवावें. बंधुवर्गास व विशेषकरून ब्राह्मणांस भोजन घालावें आणि अन्वाधान ( ह्मणजे अग्नीवर समिधा देणें ) वगैरे जे तेथून आज्योत्पवनादि ( घृतशुद्धि व- गैरे ) पावेतों कर्म केल्यावर दत्तक घेणाराने पुत्र देणाराजवळ जाऊन ' पुत्र दे' अशी विनंति करावी. देणारा दान देण्यास समर्थ असल्यास ( ह्मणजे देण्याची इच्छा व अ- धिकारादिक असल्यास ) 'ये यज्ञेन ' पूर्वक पांच मंत्र तोंडानें ह्मणून दात्यानें पुत्र द्यावा, आणि 'देवस्यत्वा' हा मंत्र तोंडानें ह्मणून घेणाराने आपल्या दोन्ही हातांनी पुत्र ध्यावा व ' अंगात् अंगात् ' या वेदऋचेचा जप करून पुत्राच्या मस्तकाचा वास घ्यावा. नंतर पुत्रास वस्त्रे नेसवून व अलंकारादिक त्याचे आंगावर घालून स्वतःच्या पुत्राच्या छायेप्रमाणे समजलेल्या ( ह्मणजे पुत्ररूप केलेल्या ) या मुलास नृत्यगीतवाद्यांसह कल्याणवाचक मंत्र ह्मणत गृहाचे मध्यभागी आणावें. नंतर शास्त्रोक्तमार्गानें भाताचा होम करावा. [ हवन करणें तें ] ' यस्त्वाहृदा ' या ऋचेनें ' तुभ्यमग्रे ' ह्या व ' सोमोददत्' इत्यादि पांच [ऋग्वेद ] ऋचांनी करावें. नंतर स्त्रिष्टकृदादि देवतांचा होम करून बाकीचे सर्व विधि पुरे करावे. ब्राह्मणांत दत्तक पुत्र घेणें तो सपिंड संबंध्यांतून घ्यावा; तसा नस- ल्यास असपिंडांतूनही घ्यावा. तसा नसल्यास त्याहून इतर ( भिन्नवर्ण ) घेऊं नये. क्षत्रियाने स्वजातीचा किंवा गुरूच्या गोत्राचा असेल तो ध्यावा. वैश्यांनी वैश्यजाती- तील व शूद्रांनीं शूद्रजातींलील दत्तक घ्यावा. सर्व वर्णांत आपापले जातीचाच दत्तक पुत्र होतो; दुसऱ्या जातीचा होत नाहीं. शुद्र जातींत कन्येचा मुलगा व बहिणीचा मुलगा हे मुख्य दत्तक होत. ज्यास एकुलता एकच पुत्र असेल त्यानें त्यास दत्तक कवीं- ही देऊं नये. ज्यास अनेक पुत्र असतील त्यानें ( शक्तीप्रमाणे ) यत्न करून पुत्रदान जरूर करावें. पुत्र घेणाऱ्या ब्राह्मणानें आपल्या शक्तीप्रमाणें दक्षिणा गुरूस द्यावी. [ दत्तपुत्र घेणाऱ्या ] राजानें अर्धे राज्य देखील द्यावें. वैश्यानें [ चालू नाणें, रुपये वगैरे ] * तीनशें शूद्रानें सर्वस्व ( देणाराचे स्वतःचेंच में द्रव्य असेल तेवढें मात्र ) द्या. [ इतकें ] सामर्थ्य नसल्यास शक्ति असेल त्याप्रमाणें द्यावें. 'छायावहम् ' (पुत्राचे प्रतिबिंबासारखा ) स्मृतीत आहे त्याचा अर्थ, तसाच किंवा त्यासारखा. २०३ २०४ " 6 आतां 'दौहित्रो भागिनेयश्च ' ( कन्येचा आणि बहिणीचा मुलगा) यांविषयीं वि- २०२ ‘सर्वेषामेववर्णानां ’ या ठिकाण ' सर्वेषां चैव वर्णानां' असाही पाठ आहे. ( क ) (ख) (घ ) ( ङ ). * संस्कारकौस्तुभ ग्रंथांत ३०० रत्ने द्यावी अशा अर्थाचा पाठ आहे. २०३ ‘वित्तशततत्रयं ' असा येथे पाठ आहे, परंतु 'रत्नशतद्वयं ' असा संस्कारकौस्तुभग्रंथांत पाठ आहे. २०४ दत्तकमीमांसा प० २५ – २६: दत्तकचंद्रिका प० ५१-५२; संस्कारकौस्तुभ प०४७प० १