पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. 6. १६१ ता प्राप्त होण्यास प्रमाण नाहीं. शिवाय दुसरें असें कारण कीं, 'मनुष्य पुत्री होतो या वाक्याने सपुत्रता मात्र सांगितली असल्यामुळे त्याचा उद्देश ( पितरांचे ) ऋणापासून पुत्रवानाची मुक्ति होते एवढे दर्शविण्यापुरताच आहे असें समजले पाहिजे. ह्या कार- णास्तवच “तो [ बाप प्रथम पुत्रोत्पत्तीनें ] आपल्या पितरांचे ऋगापासून मुक्त होतो या- करितां ज्येष्ठ पुत्र बापाच्या सर्वस्वाचा ( सर्व मालमत्तेचा ) मालक होतो १,१९७ असें उत्तरार्ध आहे त्याचा यथायोग्य अर्थ जमतो; नाहीं तर तो [ सुसंगत होणार नाहीं ].. 'सर्व' असेस्मृतींत आहे त्याचा अर्थ द्रव्य पुरुष मात्र दत्तक होतो, कन्या दत्तक होऊं शकत नाहीं, कारण ' स ज्ञेयो दत्रिमः सुतः ' ( तो दत्तक पुत्र समजवा ) असें स्मृतिवा- क्य आहे; तेव्हां संज्ञा व संज्ञी यांचा संबंध दर्शविणाऱ्या या वाक्यांतील 'सः' असें जें (पुल्लिंगी) सर्वनाम आहे त्यापासून आईबापांना प्रीतिपूर्वक व जलपूर्वक केलेले व आ- पत्तिकाल ज्यास निमित्त अशा दानास विषयीभूत सजातीय जो पुरुष त्याचाच बोध होतो, जसे ' आठ वर्षांचे ब्राह्मणाचे उपनयन करावें व त्याकडून अध्ययन करावें ' या वाक्यांतील “ त्याकडून ' या सर्वनाम शब्दानें आठ वर्षांचें वय ज्याचें, ब्राह्मण्य, व पुंस्त्व या गुणांनी युक्त व उपनयनसंस्कार झालेला अशा पुरुषाचाच बोध होतो, स्त्रीचा नाहीं ; [ तसें येथें समजावें ]. कांहींचे मत आहे की, ज्या अर्थी 'क्त्रेर्ममनित्यं' ( ह्मणजे क्त्रि प्रत्ययांत शब्दास मप नित्य होतो ) या सूत्रानें दत्रिम शब्द सिद्ध होतो तेथें [ स्त्री- लिंग किंवा पुलिंग] कोणचेंही वाच्य असले तरी ज्या अर्थी दानांचे कर्मत्व [दोन्ही स्थलीं ] तुल्य आहे त्या अर्थी त्या शब्दानें नवन्यास दिलेली कन्या हा जसा बोध होतो, तसाच दत्त ह्मणून दिलेली वगैरे कन्येचा बोध होईल. परंतु हे पण वर सांगितलेले कारणा- वरून ग्राह्य नाहीं... पुत्रप्रतिग्रहाचा प्रकार ( ह्मणजे दत्तपुत्र घेण्याची रीति ) आतां सांगतों. शौनक "मी, शौनक, दत्तपुत्र घेण्याची उत्तम रीति सांगतों. " ज्या पुरुषास पुत्रसंतान नसेल. किंवा पुत्र होऊन मेले असतील [ त्यास दत्तपुत्र घेण्याचा असल्यास ] त्यानें पुत्रासाठी उपोषण करावें; व सर्व वेद जाणणारा, विष्णुभक्त, व स्वधर्माने चालणारा अशा आपल्या आचार्यास धोतरजोडा, कानांतील कुंडलें, पागोटें आणि आंगठी हीं द्यावी. नंतर कुशांचे: केलेलें बहिं" व पलाशसमिधांचे इध्म ( जुडी ) ही सामुग्री आणून यानें आपल्या ज्ञा- १९७म० अ० ९ श्लो० १०६. १९८ म० अ० ९ श्लो० १६८. त्र आहे (अ० १ क० १९ सू० १ ) १९९ ' अष्टमे वर्षे ब्राह्मणमुपनयेत्.' असे आश्वलायनसू- २०० पाणिनि अ० ४. पा०४ सू० २०. २०१ 'कुशसमं बर्हि' असा पाठ पुष्कळ पुस्तकांत आढळतो, तरी तो शुद्ध नाहीं, असें संस्कारकौ - स्तुभ ग्रंथांत लिहिलेले दृष्टीस आल्यावरून ' कुशमयं ' हाच पाठ येथें स्वीकारला आहे.