पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० हिन्दु धर्मशास्त्र. प्र० २ ५४ व्यभिचारी ठरवून शिक्षा देण्याची वहिवाट पडली आहे. * ही वहिवाट फार अन्यायाची दिसते; कारण, एकंदर शेकडों वर्षे ज्या कृत्यास लोक अपराध ह्मणून समजत आले नाही- त, ती गोष्ट त्यांणी केली असतां त्यांना शिक्षा देणें हें शिक्षेचा उद्देश कांही अंशी तरी विफल करणे होय. दुसरें; सदरच्या ठरावांत दोन गोष्टी गृहीत दिसतात. त्या ह्या :- ( १ ) पहिली गोष्ट अशी की, सर्व जातीचे लोक विवाहाच्या कामांत स्मृतिशास्त्रांतील प्र- तिपदोक्त विवीनेच आज मितीस चालत आहेत, व ( २ ) दुसरी अशी की हिंदु लोकांतील विवाह युरोपदेशांतील चालीप्रमाणें व्यावहारिक कराराच्या स्वरूपाचाच आहे, सबक तो मोडणे तर करार करणाऱ्या असामीच्या संमतीवांचून तो मोडतां येणार नाहीं. आतां वास्तविक पहातां वरील पहिली गोष्ट तर्फे गृहीत करणाऱ्यांची एतद्देशीय आचा- राविषयींची गैरमाहिती स्पष्टपणें प्रगट करिते; कारण तसा आचार नाही. आरंभी वेदांत व नंतर सूत्रस्मृतिग्रंथांत जो विवाहविधि सांगितलेला आढळतो त्यांत, आणि जो विधि आचारांत आढळतो त्यांत, जमीनअस्मानाचें अंतर आहे. ही गोष्ट नारायण- भट्टांपासून अलीकडे जे प्रयोगकार झाले त्यांनी कबूल केली आहे व असा फेर झाला आहे असे सांगून आचारानुसारी विधान ह्मणून प्रत्येकाने दिले आहे. आश्व- लायन गृह्यसूत्रांत* देशधर्म, ग्रामधर्म, व कुलधर्मविवाहांत पाळावे असे स्पष्ट सांगितलेलें आहे, त्यावरून विवाह ह्या विषयावर निरनिराळ्या ऋषींनी केलेल्या आज्ञा केव्हाही सर्वमान्य झाल्या नव्हत्या, व निरनिराळ्या स्थळीं, निरनिराळ्या कुळांत लग्नाचा आ- ५४. पहा करसन गोजा वि. बाई रूपा मुं. हा. रि. व्हा. २ पा. १२४. राणी वि. मनोहर रायजी मुं. हा. रि. व्हा. ५ फौ. शा. पा. १७ खेमकोर वि. उमियाशंकर मुं. हा. रि. व्हा. १० पा. ३८१. राही वि. गोविंद इं. ला. रि. मुं. व्हा. १ पा. ९७. परंतु अलीकडे घटस्फोटाचा व पुनर्विवाहाचा रिवाज पुष्कळ कज्जांत शाबत धरलेला आहे. घटस्फोटासंबंधानें:- राणी सरकार वि. शंभू इं. ला. रिं. १ मुं. ३४७. मुं. स. वि. गंगा इं. ला. रि. ४ मुं. ३३०. बादशाहीण वि. उमी इं. ला. रि. ६. मुं. १२६. पुर्नविवाहासंबंधानें:-राही वि. गोविंद इं. ला. रि. १ मुं. १७. हरिचरण बि. नुमैचंद इं. का. रि. १० क. ३०८ ५५. पहा प्रयोगरत्न पं. ७२. धर्मसिंधु परि. ३ पूर्वार्ध प. ५० पृ०२. संस्कारकौस्तुभ प. २२१ पृ. १. शूद्रकमलाकर प. १९५.१. पहा अध्याय १ कंडिका ७. सूत्र १.