पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ व्यवहारमयूख. ' आपत्तिकालीं ' या शब्दांचा अर्थ सोडून देऊन त्याचे उलट अर्थाची कल्पना वगैरे करावी लागल्यामुळे अनापत्कालाची परिसंख्या ('निवृत्ति ') होत नाहीं ( १९६ अ ); ह्मणून आपत्काल हा शब्द केवळ निमित्तमात्रबोधक समजावा; ह्मणजे आपत्काल प्राप्त झाला ह्मणून पुत्रदान असा अर्थ. आतां जर पुत्रदानास आपत्काल निमित्त मानलें, तर कदाचित् आपत्तिकाली पुत्रदान न केल्यास दोष येईल असे कोणी ह्मणेल, तर तसा दोष येत नाहीं. [ कारण ] 'माता पिता वा दद्यतां ' या मनुस्मृतीनें ' दत्रिम ' शब्द ही संज्ञा, व ही ज्याला प्राप्त होते तो, या उभयतांचा संबंध मात्र दर्शविला; आपत्काल प्राप्त झाल्यास पुत्रदान करावेंच असा विधि या स्मृतीने केला नाहीं. A रोगिणी व जिला भाऊ नाहींत अशा कन्येशी विवाह करूं नये' असा निषेध आहे. त्यांचे उल्लंघन केल्यास केवळ दृष्टविरोध येतो ( लग्नाचा जो ऐहिक हेतु तो सि- द्धीस जाणार नाहीं इतकें मात्र होईल ). लग्न केलेल्या कन्येस दोष असले तरी तीवर भार्यात्व येतेंच, असें ( आचाराध्यायांत) विवाहप्रकरणांत त्यानेंच ( विज्ञानेश्वरानं ) ाटलेले आहे त्याचेंही निराकरण वरील कोटिक्रमाने झालेच. ' सदृशं ' ( सारखा ) असा शब्द स्मृतीत आहे त्याचा अर्थ कुल आणि गुण या- संबंधानें सारखा असा आहे; जातीनें सारखा असा नाहीं; ह्मणून क्षत्रियादि जातीचा पुत्रही विप्रादि जातीचा दत्तक होतो असें मेधातिथि ह्मणतो. कुल्लूकभट्ट ह्मणतो कीं, जातीनेंच सारखा असें ह्यटलें पाहिजे (म० अ० श्लो० १६८, १६९). हेंच ह्मणग योग्य आहे, कारण याज्ञवल्क्यानें (व्य ०. 'लो० १२८ ) ' औरतो धर्मपत्नीजः ' यास आरंभ करून बाराही पुत्रांचीं लक्षणें (व्य० श्लो० १३३ ) सांगितल्यावर, " मी सां- गितलेला हा विधि सजातीय पुत्रांविषयीं आहे " असे शेवटी मटलेले आहे. शौनकाची दोन वचनें पुढे लिहिली आहेत त्यांवरूनही ही गोष्ट स्पष्ट होईल.: विज्ञानेश्वराचेही अ- सेंच मत आहे. विज्ञानेश्वराचे आणखी असें ह्मणणें आहे कीं, "ज्येष्ठ पुत्र उत्पन्न हो- तांच मनुष्य पुत्री होतो" असें वचन आहे; त्यावरून पुत्राने जीं कार्ये करणे त्यांचा मुख्य अधिकार ज्येष्ठ पुत्राकडेसच असल्यामुळे त्यास [ दत्तक ह्मणून ] देऊं नये ह्मणून जो निषेध आहे तोही देणाराला मात्र लागू आहे, घेणारास नाहीं. " १९७ ज्येष्ठ पुत्र दत्तक ह्मणून देऊं नये असा निषेध या [ मनु ] वचनाने जर केलेला असता, तर खरोखर तो निषेध देणारास लागू झाला असता; पण ज्येष्ठदानास निषेधक- ( १९६ अ ) सांगितले नियमाने कांहीं गोष्टींची व्यावृत्ति करण्याचा जो प्रकार त्यास परिसंख्या झगतात. यास उदाहरण 'पंच, पंच नखा भक्ष्याः ' ( पांच नखे असणारे पांच जातींचे पशु खावे ) या वाक्यांत हें पशु खावे असें अर्व विधान करण्याचा हेतु नसून खाणें असल्यास या पांच जातींहून भिन्न पशु खाऊं नये अशा अर्थी इतर जातींचे पशूंची व्यावृत्ति करतात तशी. १९७म० अ० ००० १०६