पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० व्यवहारमयूख. दायभाग घेण्याचे व्यवस्थेंत उपयोगी पडावा ह्मणून मुख्य पुत्र व गौण पुत्र यावि- षयींचा सविस्तर प्रकार याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १२८ पासून १३२ ) “(१) शास्त्रोक्त धर्मानें लग्न झालेले स्त्रीचे ठायीं उत्पन्न केलेला पुत्र तो औरस पुत्र होय; ( २ ) त्याच्याशी सम, पुत्रिका केलेल्या स्वकन्येचा पुत्र, किंवा ती कन्याच; (३) क्षेत्र- ज ह्मणजे नवयाच्या सगोत्र पुरुषापासून किंवा अन्य पुरुषापासून तिला झालेला पुत्र ; ( ४ ) ज्याचा बाप प्रसिद्ध नाहीं असा घरचे घरांत गुप्तपणें झालेला जो पुत्र त्यास गूढज असें ह्यटलें आहे ; ( ५ ) अविवाहित स्त्रीस झालेला जो पुत्र तो 'कानीन '; हा कानीन पुत्र आईंचे बापाचा पुत्र असें मानलेले आहे ; ( ६ ) स्त्रीस प्रथमविवाहसुखोपभोग झा- ल्यावर किंवा पूर्वी, दुसरा विवाह होऊन त्यापासून [ तीस ] झालेला पुत्र तो पौनर्भव (७) बापानें किंवा आईनें जो दुसऱ्यास दिला तो दत्तक होय; (८) आईबापांनीं विकलेला जो पुत्र तो क्रीत ; ( ९ ) आपण होऊन [ पुरुषाने किंवा स्त्रीनें ] पुत्राप्रमाणें जो पाळलेला किंवा मानलेला तो कृत्रिम पुत्र; (१०) आपण होऊनच जो [ आपणास ] दुसऱ्यास देतो तो स्वयंदत्त; ( ११ ) लग्न होण्यापूर्वी [ अन्यापासून ] गर्भात असलेला पुत्र तो सहोदन ; आणि (१२) आईबापांनीं टाकिलेला पुत्र दुसऱ्यानें पुत्राप्रमाणें स्वी- कारल्यास तो " अपविद्ध होय. " १९१ 33 १९० 66 शास्त्रोक्त धर्मानें विवाहित केलेले स्ववणीचे स्त्रीचे ठायीं उत्पन्न झालेला औरस पुत्र हा मुख्य पुत्रिकासुत दोन प्रकारचे. पहिला प्रकार वसिष्ठ सांगतो माझ्या या कन्येस भाऊ नाहीं; हिला अलंकृत करून मी तुला देतों ; हिला जो पुत्र होईल तो माझा पुत्र [ असा कन्या देणाराने ठराव करून दिलेले कन्येस पुत्र होतो तो ]. तो स्मृतिकार [पुत्रिकापुत्राचा ] दुसरा प्रकार सांगतो " कन्या हीच तिसरा पुत्र ". कन्यो- च पुत्रवत् मानलेली असेल तेव्हां पित्याचे मरणानंतर त्याचें और्ध्वदेहिक संस्का- रादिक कन्येनेंच करावे. क्षेत्रज पुत्र ह्मणजे [ शास्त्रोक्त रीतीनें ] गुरूची आज्ञा घेऊन भावाचे पत्नीचे ठायीं वगैरे दिराने किंवा अन्य सगोत्र पुरुषानें उत्पन्न केलेला अक्षता ह्मणजे प्रथम पतीनें न उपभोगिलेली; क्षता ह्मणजे प्रथम पतीनें उपभोगिलेली; अशा स्त्रीस नंतर केलेल्या अन्यपतीपासून झालेला पुत्र तो पौनर्भव. आतां दत्तका- १९० वी० प० १८४ पृ० २; क० वि०; व्य० मा० . १९१ मि० व्य० प० ५५ पृ० १; बी० प० १८५ पृ० १; क० वि०. १९२ पुत्रिकापुत्राचा दुसरा प्रकार सांगण्यांत ' तिसरा पुत्र कन्या हीच' असें येथें आहे, परंतु वीरमित्रोदयांत 'दुसरा पुत्र कन्या हीच ' असें आहे. मि० व्य० प० ५५ पृ० १; वी० प० १८५ पृ० २ क० वि०.