पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. ११७१ 66 १५७ परंतु विवाह न झालेल्या शूद्र स्त्रीपासून झालेले पुत्रास जंगम मिळकतीचाही हिस्सा मिळावयाचा नाहीं. याविषयीं मनु ( अ० ९ श्लो०१५५ ) शूद्र जातीचे स्त्रीस ब्राह्म- ण, क्षत्रिय, किंवा वैश्य यांपासून झालेल्या पुत्रास वारशाचा विभाग मिळावयाचा नाहीं ; त्याचा बाप त्यास जें काय द्रव्य देईल तितकेंच त्याचें. ' बाप मेल्यानंतर अशा पुत्रा- स मिळावयाचे द्रव्यांत थोडा फरक बृहस्पति सांगतो' "कोणी पुरुषास [ दुसरे पुत्र नसून ] शूद्र जातीचे स्त्रीपासून झालेला पुत्र, आज्ञेत वागणारा व गुणवान् असेल, तर त्यास अन्नवस्त्र मिळावें; बाकीची मालामळकत सपिंडांनीं समभाग वांटून घ्यावी. १,१७२ गौतम " निरपत्य पुरुषास शूद्र जातीचेही स्त्रीपासून झालेला पुत्र असेल व तो आज्ञेत वागणारा असेल, तर त्याची अन्नवस्त्राची तजवीज केली पाहिजे. ११७२ स्मृतींत ' वृत्तिमूलं ' असें आहे त्याचा अर्थ अन्नवस्त्राची तजवीज. 66 तोच स्मृतिकार “ शूद्र जातीचे स्त्रीचे पुत्रांसाठीं जी तजवीज सांगितली ती प्रतिलोम (नीच वर्णाचे पुरुषापासून वरिष्ठ वर्णाचे स्त्रीस झालेले ) पुत्रांसाठीं केली पाहिजे. " ' प्र- तिलोम ' याचा अर्थ कमी वर्णाचे पुरुषास त्याहून उंच जार्ताचे स्त्रीचे ठायीं झालेले पुत्र. लग्न न झालेले स्त्रीपासून शूद्रास झालेले पुत्राविषयीं कांहीं विशेष याज्ञवल्क्य सांग- तो (व्य० श्लो० १३३, १३४ ) शूद्र जातीचे पुरुषानें दासीचे ठायीं उत्पन्न केले- लाही (पुत्र) [ पित्याची ] इच्छा असेल तर हिस्सा घेणारा होतो. बापाचे मरणानंतर बंधूनी (दासीपुत्राच्या बंधूंनी ह्मणजे पित्याच्या औरस पुत्रांनी) त्यास अर्धा हिस्सा (एका पुत्रास मिळालेल्या हिश्शाचा अर्धा ) द्यावा. स्मृतीत 'कामः ' असा शब्द आहे त्याचा अर्थ बापाची इच्छा. वचनांत 'शूद्रेण ' ( शूद्रापासून ) असें पद आहे त्यावरून दिसतें कीं, दासीचे ठायीं द्विजापासून झालेले पुत्रास बापाची इच्छा असतांही विभाग मिळावयाचा नाहीं. • बाप मेल्यानंतर देखील अशा पुत्रास अर्धा हिस्सा मिळू नये; किंवा पुत्रादिक नसल्यासही सर्व वारसा त्यास मिळू नये, असें मदनरत्नादिग्रंथांत आहे. 905 १११७४ दायविभाग झाल्यानंतर उत्पन्न झालेले पुत्राचे संबंधानें विशेष गौतम सांगतो " विभाग झाल्यानंतर उत्पन्न झालेले पुत्रास बापाचा हिस्सा मात्र मिळतो. १७६ बृह- १७१ मि० व्य० प० ५३ पृ० २; वी० प० १८४ पृ० २; क० वि०. व्य० मा० १७२ क० वि० १७३ 'प्रतिलोमास्त्विति' या ठिकाणीं 'प्रतिलोमेष्विति' असा पाठ व 'प्रतिलोमास्तूत्पादका- पेक्षयोत्कृष्टवर्णस्त्रीषूत्पन्नाः ' या ठिकाणीं 'प्रतिलोमेषूत्पादकापेक्षयोत्कृष्टवर्णस्त्रीषूत्पन्नेष्विति ' पाठ आहे. (ख) (ग) (च). 33 असाही १७४ वी० प० १९२ पृ० २; क० वि०. १७५ मि० प० ५६ पृ० २; वी० प० १९२ पृ० २. १७६ हैं वचन गौतमाचें आहे असे वीरमित्रोदय ग्रंथावरून ठरते. प० १८२ पृ० २