पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ व्यवहारमयूख. १६६ १११६८ च वर्णाचे, आणि [ प्रत्येक मातेचे ] पुत्रांची संख्या सारखी असल्यास, मातांचे [सं- ख्ये ] प्रमाणें वारशाचा विभाग करणें कायदेशीर होतें. " व्यास अनेक स्त्रियां- पासून एकाच पुरुषास अनेक पुत्र झालेले असल्यास व त्यांची ( प्रत्येक स्त्रीचे पु- त्रांची) संख्या व वर्ण सारखे असल्यास मातांचे [ संख्ये ] प्रमाणे द्रव्याचा विभाग करणें ही गोष्ट पसंत झालेली आहे. १६७ बृहस्पति याविरुद्ध एक उदाहरण सां- गतो. तें असें “ एकाच वर्णाचे अनेक पुत्र असतील, परंतु [ प्रत्येक मातेचे ] सारखे नसतील, तर तेथें दायाचे वांटे होणें ते पुरुषसंख्येचे मानानें ( पुत्रांचे संख्येप्रमाणें ) करणें प्रशस्त आहे; [ त्यांचे आईचे संख्येचे मानाने करावयाचे नाहीत. ] एका पित्यापासून निरनिराळ्या वर्णाच्या [ मातांस ] झालेल्या पुत्रांस दायविभाग कसे मिळावे हें याज्ञवल्क्य (व्य० लो० १२५ ) सांगतो " [ब्राह्मण, क्षत्रिय, ] वैश्य, आणि शूद्र जातींच्या स्त्रियांपासून ] ब्राह्मणास झालेल्या पुत्रांस अनुक्रमानें चार भाग, तीन भाग, दोन भाग आणि एक भाग मिळतात; [ क्षत्रिय, वैश्य व शूद्र जातींचे स्त्रियांपासून ] क्षत्रियास झालेले पुत्रांस अनुक्रमें तीन, दोन आणि एक भाग; आणि [ वैश्य व शूद्र जातींच्या स्त्रियांपासून ] वैश्यास झालेले पुत्रांस अनुक्रमें दोन आणि एक विभाग. १,१६९ 6 6 66 ब्राह्मणात्मजाः' याचा अर्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, व शूद्र जातींचे स्त्रियांपासून ब्राह्मणास झालेले पुत्र. क्षत्रजाः ' क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्त्रियांपासून क्षत्रियास झालेले पुत्र. ‘विड्जाः ' वैश्य व शूद्र स्त्रियांपासून वैश्यास झालेले पुत्र. बृहस्पति “प्रतिग्रहाचे द्वारानें [ ब्राह्मणास ] मिळालेली जमीन क्षत्रिय जातीचे किंवा त्याहून कमी वर्णाचे स्त्रीपासून झालेले पुत्रांस कधींही देऊं नये; असें असूनही जर बापानें [ अशी जमीन ] त्यांस दिली, तर बाप मेल्यावर ब्राह्मण स्त्रीपासून झालेले पुत्रानें ती परत घ्यावी. "" ,१७० देवल “ शूद्र जातीचे स्त्रीस द्विजापासून झालेला पुत्र जमिनीचा " विभाग घेण्यास योग्य नाहीं; परंतु स्ववर्णाचे स्त्रीपासून झालेले पुत्रानें सर्व जातीची ( स्थावर किंवा जंगम ) मालमिळकत घ्यावी हा नियम ठरलेला आहे. "१७० स्मृतींत 6 भूमेः' (भूमीचा भाग ) असें पद आहे त्याचा अर्थ खरेदीचे वगैरे कारणानें संपादलेली असली तरी [ तिचा हिस्सा द्यावयाचा नाहीं ], परंतु जंगम मिळकतीचा हिस्सा त्यास मिळावयाचाच. १६६ कवि १६७ वी० प० १७० पृ० १; क० वि० १६८ क० वि०. १६९ वी० प० १८३ पं० १. क० वि०; व्य० मा० १७० मि० व्य० प० ५३ पृ० २; बी० प० १८४ पृ० २; क० वि०; व्य० मा० .