पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" " नीलकंठीय. १५५ झालेले कुटुंबांतील लहान भाऊ मरेल, तर त्यांनी ( इतर भावांनीं वगैरे ) मेलेले भावाचे पु- त्रास, त्याच्या चरितार्थासाठीं आजानें द्रव्य ठेवलेले नसल्यास, वारशाचा विभाग द्यावा. त्यानें आपल्या चुलत्यापासून किंवा चुलत्याच्या पुत्रांपासून आपल्या बापाचा विभाग: घ्यावा. त्याचे विभागाइतकाच विभागः वस्तुतः इतर बंधूंचा [ त्याचे चुलत्यांचा प्रत्ये- कीं] कायदेशीर विभाग आहे, किंवा त्याचे पुत्रास ( मृताचे नातवासही ) विभाग मिळेल. या पुत्रापुढे मात्र परंपरेचा वारसा संपतो. "१६४ 'अनुज' ( धाकटा भाऊ ) असें पद स्मृतीत आहे त्यांत ज्येष्ठाचेंही ग्रहण इष्ट आहे, त्यावरून वडील भाऊ देखील घ्यावयाचा. परतः ( त्यापुढे ) ह्मणजे पणतूचे पुढील पुत्र. कोणी माणसाचा बाप, आजा, आणि पणजा, हे मेल्यांनंतर खापरपणजा ( पणज्याचा बाप ) मरेल व त्याचे. पुत्र किंवा इतर विशेष जवळचे वारस शिल्लक असतील, तर खापरपणतूंस किंवा त्या- च्या पुत्रांस वगैरे त्याचें ( खापरपणज्याचे बापाचें ) द्रव्य मिळणार नाही. याचा अर्थ. असा की, मृत माणसापाठीमागे त्याचे पुत्र, नातु, पणतु, वगैरे राहिलेले नसतील तर तोही ( ह्मणजे पणतूचा मुलगाही ) वारस होतो. हा नियम अविभक्तांस लागू नाहीं; प- रंतु संसृष्टांस ह्मणजे एक वेळ वेगळे होऊन पुनः एकत्र झालेल्यांस ) लागू आहे - याविषयीं देवलाची स्मृति आहे " कुलांतील पुरुष एक वेळ विभक्त झाल्या- नंतर पुन: एकत्र झाल्यास दुसऱ्याने होणारे दायविभागाचा ( वांटणीचा ) हक चौथ्या पिढीपावेतों पोंचतो असा नियम आहे. १५ मनुष्य फार दिवस दूर देशी गेला असून जर कर्ज, दस्तऐवज, घर किंवा शेतकीलायक जमीन अशी माल - मत्ता त्याचे आजाची असेल, तर तो माणूस परत आल्यास, त्यास विभाग मिळावा. • आपलें कुटुंब सोडून कोणी परदेशांत राहण्यास जाईल आणि त्याचे वंशज परत येतील, तर त्यांस विभाग जरूर दिला पाहिजे यांत संशय नाहीं. " देवलस्मृतींत 'अविभक्त- विभक्तानाम् ' अर्से पद आहे, त्याचा अर्थ असा कीं, खापरपणजा आणि त्याचे पुत्र विभक्त होऊन पुनः जे एकत्र झालेले त्यांचा. एकाच देशांत राहणारांस हें लागू आहे. पण. निराळ्याच देशांत जाऊन राहिल्यास त्याची पांचवी व तीपुढील पिढीही वारसा घेते.. แ माणूस तिसऱ्या पिढीचा पांचवींचा किंवा सातवीचा असो, त्याचा जन्म व आडनांव यांची शाबिती झाल्यास तो परंपरेनें आलेल्या वारशाचा हिस्सा घेतो " असें बृहस्पति- वचन, त्या स्मृतीचे ‘देशांतर' प्रकरणांत (निराळ्या देशांत राहण्याचे संबंधानें ज्या प्रकरणांत नियम सांगितलेले आहेत त्यांत ) आलेलें आहे. 66 64 कांहीं ठिकाणीं [मातांचे संख्ये ] प्रमाणे वारशाचा विभाग होतो असें बृहस्पति सांगतो एका बापापासून अनेक मातांस अनेक पुत्र झालेले असतील व ते एका- १६५ वी प० १७७ पृ० १० क० वि० व्य० मा ०. १६४ क० वि०