पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाविषयीं. ३९ ५३ लिहितों. वरच्या तीन वर्णात विवाह झाल्यावर स्त्रीनें एक नवरा सोडून आपल्या इच्छेने दुसरा करावा याविषयी उपलब्ध स्मृतीत आधार आढळत नाहीं. एक देवलव- चन शूद्रकमलाकरे ग्रंथांत घेतलेले आहे तें हीनवर्णाचद्दल असावें. आचारांत ब्राह्मण वर्ण खेरीज करून बाकी ज्ञातींत विवाह तोडात्रयाची बहुत देशीं वहिवाट आहे. त पासाअंती समजतें कीं, विवाह तोडावयाचा तो नवयानें सोडचिठ्ठी दिल्यानें, अगर जातीच्या लोकांसमोर स्त्रीचें मंगळसूत्र तोडल्यानें, अगर अन्य मार्गानें विवाह संपला इतकें उघड केल्याने तुटतो. नवरा असे न करील, तर स्त्रीच्या विनंतीवरून जातीनें एके ठिकाणी जमून विवाह तुटला असे सांगितल्यानें विवाह तुटतो, असा सर्वत्र आचार आहे. सदर अदालतीचे ठराव छापले आहेत त्यांत हा जातीचा अधिकार कोर्टानीं कबूल केल्याची उंदाहरगेंही आहेत. जातोनें काडी तोडलेली कायम केली असें उदाहरण बारोडेलचें रिपोर्ट (वा० १ पृ. ४१० ) मध्ये आहे. तेथें काशी नांवाच्या मनुष्यानें बायकोच्या कब्जाकरितां दावा आणिला. . तिनें उत्तर दिलें कीं, वादीच्या छाकटेपणा- मुळें व नीच वर्तणुकीमुळें जातीच्या लोकांनी आमचा विवाह तोडून काडी दिली आहे. जो जातीचा ठराव झाला आहे तो बराबर आहे असा कोटीने ठराव केला. गुजराती कासार यांच्या जातींतील काशीराम नांवाच्या मनुष्यानें आपल्या स्त्रीशी जुलुमाचें आ- चरण केलें; त्यावरून जातीच्या पाटिलांनी अपील कोर्टासमोर येऊन सांगितलें कीं, आमची पुरातन चाल अशी आहे कौं, जर कोणी नवरा अशी दुष्ट वर्तणूक करील तर त्याचें लग्न रद्द होतें. त्यावरून बायकोला आपल्याकडे पाठवावी असा जो सासऱ्यावर दावा आणिला होता तो रद्द होऊन लग्नही रद्द झालें: (बारोडेल रि० वा १ पृ० ३८७). परंतु ह्यावेळी सन १८२७ चा का० २ नव्हता. आतां लग्नासंबंधीं दावा चालणार नाहीं असे मला दिसतें. नवज्याने आपल्याजवळ राहण्यास येण्यासाठी स्त्रीवर फिर्याद आणिली त्यांत बायकोची तकरार कीं, नवन्याचा व आपला विवाह तुटला आहे. कोर्टाचा ठराव कीं, हिंदुधर्मशास्त्रावरून विवाह तुटत नाहीं, तरी ज्या जातींत अशी चाल असल्याचें शाबीत होईल तेथें ती चाल कायद्याच्या बरोबरीचीच मानिली पाहिजे;

  • ( कडोमी दासी वि० जोतिराम कोलिता. इं. ला. रि. कल. व्हा. ३ पा. ३०१).

• ( ४८.) परंतु हायकोर्ट झाल्यापासून कांहीं ठराव झाले आहेत, त्यांत जातीच्या ठरावांबद्दलची मातबरी न धरतां नवऱ्याच्या संमतीवांचून पाट किंवा नात्रा लावून जो एकाद्या स्त्रीशीं राहतो त्याला हिंदुस्थानच्या अपराध्यांचा कायदा कलम ४९४ प्रमाणे ५२. पहा प. ७४ पृ. २. ५३. पहा बारोडेल रि. व्हा. १ पान ३८७. २३ "," ४१०.