पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १५३ पादिलेले मिळकतीचे विभाग बापास व पुत्रास सारखे मिळावयाचे असें ठरवि- लेलें आहे, मग ती मिळकत स्थावर असो किंवा जंगम असो. ११४९ याज्ञवल्क्य ( व्य० श्लो० १२१) “ आजानें संपादलेले जमिनीवर, निबंधावर ( राजाकडून मिळा- लेले नेमणुकीवर ), किंवा द्रव्यावर, बाप व पुत्र या उभयतांचीही मालकी सारखी- च. कात्यायन “ मातापितर व बंधु हे जेव्हां सर्व सामयिक द्रव्य घेतात आणि सर्व त्याचे सम विभाग करून घेतात, तेव्हां त्या विभागाला यथान्याय विभाग असें झट- लेले आहे. १,१५० 66 "" १५१ १५३ 66 १५२ पुत्रांस कमजास्त विभाग देऊन बापानें केलेली वांटणी [जर यथान्याय असेल तर ] सशास्त्र झाली असें ह्यटलें आहे” असे याज्ञवल्वयाचें वचन ( व्य० श्लो० ११६ ) आहे त्याचा मंदन, विज्ञानेश्वर आणि इतर यांचे मलें अर्थ असा कीं, “ बापानेच केलेला विभाग जर सशास्त्र झालेला असेल, तर तो कायम समजावयाचा; तो रद्द होत नाहीं. [ पुत्रांस ] कमजास्त हिस्से देऊन जर अशास्त्र असेल तर रद्द होईल; त्यांस बापानेच जर विभक्त केलें, तर ती वांटणी सशास्त्रच त्यांनीं समजावयाची ( त्याप्रमाणें कबूल करणें हा त्या पुत्रांचा धर्मच आहे ), कारण बाप पटला ह्मणजे सर्वांचा धनी ११५४ हें नारदवचन वरील अर्थास बाध आणील, परंतु तें पूर्वीचे युगाला लागू होतें, या युगाला लागू नाहीं, असें समजावयाचें. 66 बाप व पुत्र जेथें जेथें सारखे विभाग घेतात, तेथें तेथें पत्नीलाही एक विभाग मिळणें आहे असें याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० १११) “ नवयाने किंवा सासऱ्यानें ज्या स्त्रियांस स्त्रीधन दिलेलें नाहीं अशा स्त्रियांस, ज्या ठिकाणीं पिता आणि पुत्र, हे द्रव्याचे समभाग घेतात तेथें, सारखे भाग घेण्याचा अधिकार आहे. ११५५ पण कांहीं स्त्रीधन दिलेलें असेल तर तिला अर्धा हिस्सा द्यावयाचा. कारण असें वचन आहे कीं “ जर कांहीं [ स्त्रीधन ] दिलेलें असेल तर अर्धा [ हिस्सा ] द्यावा. " वचनांत 'अर्ध ' (अर्धा) असें आहे त्याचा अर्थ असा कीं, पुत्राच्या हिश्शाबरोबर रक्कम होण्यास मिळाले- ल्या स्त्रीधनांत जेवढे कमी असेल तेवढें [ तिला द्रव्य द्यावयाचें ] असा अर्थ, परंतु तिला मिळालेले स्त्रीधनच [पुत्राच्या ] हिश्शापेक्षां जास्ती असेल तर तिला हिस्सा देऊ नये. पुत्रास धन मिळविण्याचें सामर्थ्य असल्यामुळे तो कधीं कधीं आपल्या दायाचा हिस्सा घेण्यास इच्छीत नाहीं, अशा प्रसंगी काय करावें हें तोच स्मृतिकार सांगतो १४९ वी० प० १७६ पृ० १; क० वि०, व्य० मा० १५० जी० दा० प० १५०. १५१ वी०प० १५३ जी० दा० प० ८९. १५४ क० वि० १७६ ५० २. १५२ वी० प० १७२ पृ० २. १५५ वी० प० १७३ पृ० १० क० वी०; व्य० मा० २०