पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय: 66 १११ आपल्या ( बापाच्या ) इच्छेस येईल तेव्हां त्यानें त्यांस आपणापासून विभक्त करावे. " वरील श्लोकाच्या प्रथम अर्थात स्वेच्छेनें विभाग करण्याचा विधि केला, त्याचीच व्याख्या पुढील अर्धात केली आहे ( १४१ ) अ. कारण बापाला हवे तसे कमजास्त विभाग मुख आहे असें समजावयाचे नसून [ उत्तरार्धात ] जे दोन प्रकार सांगितले त्यांतील कोणता तरी एक इच्छेप्रमाणें स्वीकारण्यास त्यास मोकळीक आहे · इतकें समजावयाचें. असें न समजल्यास वाक्यभेद केल्याचा ( १४१) व दोष होईल; शिवाय आणखी अशी अव्यवस्था होईल की, एका पुत्रास एक लक्ष रुपये, दुसन्यास एक कवडी आणि तिसऱ्यास कांहीं नाहीं. वडील पुत्रास जास्ती भाग देण्याविषयीं विशेष नियम मनु सांगतो ( अ० ९ श्लो० ११२, ११६, ११७.) [ वारशाचा ] विसावा हिस्सा, शिवाय जंगमवस्तूंपैकी उत्तम उत्तम असतील त्या इतका वडील पुत्राचा उद्धार ह्मणून काढला जातो; मधल्या भावास त्याचें अर्ध ( चाळिसावा हिस्सा ); धाक- ट्यास त्याचें अर्ध (ऐशीवा हिस्सा); [याप्रमाणें हिस्से देऊन जें बाकी राहातें तें सर्व पुत्रांनी समभाग घ्यावें ]. असे भाग न केल्यास सर्वांत वडील पुत्राने दोन भाग घ्यावे; त्याचे खालच्यानें दीड भाग घ्यावा; त्याहून लहान भावांस प्रत्येकीं सव्वा सव्वा भाग मिळावा* याप्रमाणें धर्मशास्त्राचा नियम ठरविलेला आहे. ४२ (ह्मणजे जर साहा रुपये जिनगी असे- ल आणि ४ भाऊ असतील, तर पहिल्याने दोन रुपये घ्यावे, दुसऱ्याने दीड, व बाकीचांनी सव्वा सव्वा ). जुळे भाऊ असल्यास प्रथम जो जन्मला तो वडील असें मनु ह्मणतो ( अ० ९ श्लो० १२६ ) [ अग्निष्टोमादिक्रतूंमध्ये ] ' सुब्रह्मण्य' संज्ञक वैदिक ऋतही [ इंद्रा- चा वगैरे धावा करते वेळीं ] पूर्वी जन्मलेल्याचें नांव प्रथम घ्यावें असें सांगितलेले आहे; जु- ळ्या भावांत जो पहिल्यानें जन्मला तोच वडील मानलेला आहे. जुळ्या भावांपैकीं मातापितरांस आणि ज्ञातिबंधूंस ज्या भावाचें सुख पहिल्याने दृष्टीस पडतें त्याजकडे वडीलपणा व४ १४३ १४ १ ( अ ) भाषांतरांत मूळ श्लोकाचा अनुक्रम साधत नाहीं व तसा यत्न करण्याची तादृश स- जरूरही नाहीं. पहिल्या व दुसऱ्या अर्थाचा अनुक्रम धरून भाषांतर येणेप्रमाणे: " बापानें विभा- ग केल्यास त्याचे इच्छेप्रमाणे पुत्रांस विभक्त करावें. वडिलास उत्तम भाग द्यावा, किंवा सर्व पुत्रांस सा- रखे विभाग द्यावे. " १४१ (ब) वडिलास मोठा हिस्सा द्यावा, किंवा सर्व पुत्रांस सारखे विभाग द्यावे, ही दोन वाक्यें मुळचीं आहेत. बापानें पाहिजे तसे कमजास्त हिस्से करून मुलास द्यावे असा अर्थ करूं लागल्यास आणखी तिसरें बाय केल्याचा दोष येईल, कारण वाक्यें वाढवू नयेत असा सामान्य नियम आहे.

  • जरी मिताक्षरा व कुल्लक या उभयतांच्या मतें कनिष्ठ भावांस हिश्शापेक्षां जास्त प्राप्त होत नाहीं, तथापि श्रीकृष्णतर्कांलंकारकृत जीमूतवाहन टीकेवरून वरील अर्थ दिला आहे.

१४२ मि० व्य० प० ४९ पृ १; वी० प० १७३ पृ १; क० वि० ; व्य० मा० १४३ ही देवलस्मृति आहे असें निर्णयसिंधु ग्रंथांत सांगितलेले आहेः परि० ३ ५० प० १० पृ०१.