पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १४९ बाप जिवंत असतांही ] जर मातेची रजोनिवृत्ति झालेली असून बहिणींची लग्ने झालेलीं असतील तर; किंवा बापाची कामनिवृत्ति झालेली असून त्यास ऐहिक सर्व विषयांपा- सून उपरति झौंली असेल [ आणि बहिणींची लग्ने झालेली असतील ] तर पुत्रांनों विभाग करावा." ' रमण' ह्मणजे काम. ‘उपरतस्पृहः' ह्मणत्रे विरक्त. ' प्रत्तासु भगिनीषु च ' (बहिणींची लग्ने झालेली असल्यास ). या शब्दांचा अन्वय काकाक्षिगोलकन्यायानें (कावळ्यांची बुबुळे डावे उजवेकडे अशा दोहों बाजूंस जशी फिरतात त्या न्यायानें ) ' रजोनिवृत्ति ' ( रजस्वलादशा गेल्यावर ) आणि 'रमणनिवृत्ति ' ( काम गेल्यावर ) या दोहींकडेही करावयाचा. १३५ गौतम " पिता मरण पावल्यावर, किंवा तो जिवंत असून माता निवृत्तरजस्क ( तिचा रजस्वलादशेचा काल गेला आहे अशी ) झाली असल्यास, किंवा [ विभाग करण्याची ] बापाची इच्छा असेल तर; पुत्रांनी द्रव्याची वाटणी करावी. " 'इच्छति' ( बापाची इच्छा असल्यास ) असा शब्द स्मृतींत आहे, यावरून माता निवृत्तरजस्क झालेली नसतांही केवळ बापाची इच्छा असल्यास वांटणी करणें योग्य आहे असें समजावयाचें. बृहस्पतीचें मत आहे कीं, बापाची इच्छा नसतांही कांहीं प्रसंगी वांटणी होते " परंपरागत (वडिलार्जित) घरें व जमिनी यांचे संबंधानें बाप व पुत्र यांस एक- सारखाच विभाग मिळावयाचा. परंतु बापाच्या ( बापाने मिळविलेल्या ) द्रव्याचे, त्याचे इच्छेबांचून, पुत्र हिस्सेदार होण्यास योग्य नाहींत. " या स्मृतीवरून निष्पन्न होतें कीं, बापाची इच्छा नसतांही आजानें वगैरे संपादिलेल्या मिळकतीचा हिस्सा घेण्यास पुत्रांस हक्क आहे. आजानें संपादिलेले द्रव्याचेही हिस्से करणें कांहीं ठिकाणी केवळ बापाचे इच्छेनु- रूपच होतें असें मनु (अ० ९ श्लो० २०९ ) आणि विष्णु हे स्मृतिकार सांगतात " आजाची मालमत्ता [ दुसरीकडे गेलेली ] त्याच्याने परत घेववली नाहीं, पण ती बापानें परत संपादिली तर, ती ज्या अर्थी स्वसंपादितासारखी समजली जाते, त्या अर्थी बाँपाचे इच्छेवांचून पुत्रांस तींतील हिस्सा मिळावयाचा नाहीं. " बृहस्पति “ आजाची रमणातू १३२ जी० प० २ आजाचे धनाचे अभिप्रायानें हें आहे. १३३ ' निवृत्ते चापि रमणे' असा येथे पाठ आहे, पण 'विनष्टे वाप्यशरणे ' किंवा 'निवृत्ते वापि ' असे आणखी दोन पाठ जीमूतवाहनकृत दायभागांत दिलेले आहेत. (जी० दा०प० ३४/३५). १३४ मि० व्य० प० ४२ पृ० १०२; वी० प० १७० पृ० १; क० वि०; व्य० मा० . १३५ मि० व्य० प० ४८ पृ० २; वी० प० १७० पृ० २; क० वि १३६ वी० प० १७७ पृ० २.