पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ १४७ नीलकंठीय.. किंवा नपुंसक लिंगी असतां धनवाचक असा कोश आहे. " [पूर्वमीमांसेच्या ] सा- हाव्या अध्यायांत गर्भदासदान ( गर्भात असतां ज्याची आई दासी असते तो दासीपुत्र; याचें दान ) सांगितलेलें आहे तें अयुक्तिक आहे; कारण मुख्यार्थी दान व प्रतिग्रह, आणि खरेदीविक्री वगैरे गर्भदासाचे मातेचे झालेले नसल्यामुळे तिजवर मालकी येतच नाहीं, त्या अर्थी तिला झालेला जो जन्मापासूनच गुलाम त्यावर तर नाहींच नाहीं. प्रसंगानें प्राप्त झालेला हा विषय आतां पुरे. दाय ( वारसा ). आतां दाय ह्मणजे काय हें सांगतों. दाय ह्मणजे असंसृष्टे ( न एकवटलेलें ) वां- टणी करण्यास योग्य जें धन तें. नफा वगैरे मिळविण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी आपाप- ले हिस्से एके ठिकाणी मिळवून एकत्र केलेले. भांडवलाचा समावेश दाय. शब्दांत होऊं नये ह्मणून ['लक्षणांत असंसृष्ट ] असें ह्यटलेले आहे. कारण व्यापायांनी भांडवल ह्मणून एकत्र जमविलेले द्रव्याचे हिश्शास दायभाग ह्मणण्याचा परिपाठ नाहीं. तसेंच संसृष्ट ( पुनः एकत्र केलेलें ) अशी पारिभाषिक संज्ञा ज्याला आहे व ज्याचें लक्षण पुढे सांगावया - चें आहे तशा प्रकारच्या धनाचाही समावेश त्यांत होऊं शकत नाहीं. ह्मणूनच ग्रंथांत असें ह्यटलेलें आहे की, "बापाचे द्वारे किंवा आईचे द्वारे मिळालेलें जें द्रव्य त्यास दाय असें ह्मणतात. त्याचे वांटणीचा प्रकार आतां सांगतों. " . १ २४," निघंदूंत असेंच आहे “वांटणी करण्यास योग्य जे बापाचें ( बापापासून मिळालेलें त्याला पंडित लोक दाय ह्मणतात. " येथें ' बापाचें ' असें ह्मटलेलें आहे हें रुषांचें उपलक्षण समजावयाचें. ह्मणजे पितृशब्दानं धनाचे सर्व पूर्व स्वामी ध्यावे. हा दाय दोन प्रकारचाः १ सप्रतिबंध आणि २ अप्रतिबंध. द्रव्याचा मालक किंवा त्याचे पुत्र जि- वंत असणें ही गोष्ट [मालकी मिळण्यास ] जेथें आड येते तो सप्रतिबंध दाय; जसें, चुल- त्याचे किंवा इतर नातलगांचें द्रव्य ; पण जेथें [ मालकी येण्यासाठीं ] दुसऱ्या कारणां- ची जरूर नसून द्रव्याच्या मालकाशी असणाऱ्या संबंधानेंच पुत्रादिकांस मालकी प्राप्त होते. तो अप्रतिबंध दाय; जसें, बापाचें द्रव्य. दायाचें हें लक्षण झालें.. दायाचे विभाग. वगैरे ) धन सर्व संबंधि - आतां दायाचे विभाग सांगतों. “ आईबापांच्या ( वडिलार्जित) द्रव्याची वांटणी १२२ अ० को० कां० ३ ० ३ श्लो० २१० १२३ (अ) एक वेळ वाटप होऊन पुन: एकत्र झा लेलें व ज्यास संसृष्ट असें ह्मगतात तसें नसेल तें. १२४ जी० दा० प० ९. १२५०० मा० क० वि०..

  • जैमिनिसूत्र, अध्या० ६, पाद ७, अधिकरण ५, 'शूद्रश्वधर्मशास्त्रत्वात् । 'सोपि सर्वस्व १भ्यपा- तित्वात् गर्भदासवद्देयः ' ॥ अशी जैमिनिन्यायमाला आहे.