पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ व्यवहार मयूख. 4 १२० प्याची पत्नीवर नसल्यामुळे त्या प्रकारची मालकी पत्नीस झालेल्या अपत्यांवरही नाहीं. आपल्या वस्तूस [ गाईस वगैरे ] संतति झाल्यास त्या गाईवर मालकी असून तिचे ठायी उत्पन्न होणें हें संततीवरील मालकी उत्पन्न होण्यास कारण होतें, हा नियम लौकिकांत ठरीवच आहे; आणि आपल्या पत्नीवरही आपण तिचा प्रतिग्रह केल्या कारणानें मालकी येईल अशी [ पुनः ] कोणी शंका घेतल्यास तसेंही होऊं शकत नाहीं; कारण क्षत्रियादिकांस स्वत्वहेतुभूत मुख्य प्रतिग्रहाचा अधिकार नसल्या कारणानें त्यांचे पत्नीवर त्यांची मालकी नाहीं; ह्मणून त्यांचे अपत्यांवरही नाहीं. या कार- णास्तव ज्या अर्थी " हा विधि सजातीय (वर्णांतील ) पुत्रांविषयीं मी प्रतिपादित केलेला आहे १,१२१ , अशी याज्ञवल्क्यस्मृति आहे ( व्य० लो० १३३ ) व तेणेंकरून सवर्ण पुत्र मात्र दत्तपुत्र घेतला जातो, त्या अर्थी क्षत्रियादिक इतर वर्णांनी केलेला दत्तकप्रति- ग्रह गौणच आहे. ब्राह्मणाचे संबंधाने मात्र दत्तकप्रतिग्रह मुख्य आहे, अही ह्मणतां येत नाहीं; कारण मुख्यार्थी घेतल्यास वृत्तिद्वयदोष ( एकाच नियमांत एकाच शब्दाचे ह्मणजे पुत्रप्रतिग्रह या शब्दाचे एका ठिकाणी मुख्य व दुसऱ्या ठिकाणी गौण असे दोन अर्थ करण्याचा दोष ) येईल. शिवाय असेंही ह्मणतां येणार नाहीं कीं, दत्तकप्रतिग्रह- विधीचा ब्राह्मणास मात्र अधिकार आहे, क्षत्रियादिकांस नाहीं, कारण, “ कन्येचा पुत्र, तसाच बहिणीचा पुत्र, शूद्रासही दत्तपुत्र ह्मणून दिले जातात" इत्यादि शौनकादिक ऋषिवचनांवरून त्यांस तो अधिकार प्राप्त आहेच. त्याचप्रमाणे क्षत्रिय व इतर नीच वर्णांचे कन्यांशीं ब्राह्मणांचा विवाह ब्राह्मविधीने करण्यांत दान व प्रतिग्रह हीं दोन्हीही गौण आहेत असें मानिलें पाहिजे. इतर लग्नसंस्कारांत ते ( दान व प्रतिग्रह ) मुख्य समजणें जरूर होईल. याप्रमाणे एकाच वचनांतील एकाच शब्दाचे भिन्नार्थ करावे लागतील व येणेंकरून वृत्तिद्वय करूं नये या नियमास विरोध. येईल. क्षत्रियांनी ब्राह्म- विधीनें विवाह करण्याची चाल सर्वात (सर्व ग्रंथकारांस ) संमत आहे; ह्मणून तंत्ररत्न- ग्रंथांत मिश्र ह्मणतो कीं, पुत्रादिकांचें दान हें गौण दान होय. पला पुत्र, आपली कन्या इत्यादिक लोकांत बोलण्याची तीवरून स्वस्त्री- वर वगैरे मालकी आहे असा तर्क करतां येणार नाहीं. आपला बाप, आपली आई असे सजातीय शब्दप्रयोग करण्यांत ज्या रीतीनें 'स्व शब्दाचा अर्थ घेतों तसा घेऊन स्वस्त्री वगैरे शब्दांतील उपपत्ति करून दाखविण्याचा संभव आहे. स्वशब्दाची रूढि ज्ञातीवरही आहे. [पुल्लिंगी ] स्वः शब्दाचा अर्थ ज्ञाति, किंवा आत्मा; तिन्ही लिंगी असेल तेव्हां आपले किंवा स्वकीय असा अर्थ; पुल्लिंगी चाल आहे. आपली भार्या, आ- १२० विज्ञानेश्वरादिकांचे मतें स्वत्व आहेच (मि० व्य० प० ७० पृ० २; वी० प० १७५ पृ० १) १२१ वी० प० १९२ प०२.