पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. ૨૬' संज्ञेनें सांप्रत भूमिदान असें ह्यटलें जातें त्या दानानें वस्तुतः भूमीचें दान हाऊं शकत नाहीं, पण त्या जमिनीवर जो कर येणें वाजवी असतो त्याचें मात्र दान होतें, परंतु जमीनदारांपासून, किंवा जमिनीचे मालकांपासून विकत घेतल्यास घरावर व जमिनी - वर मालकी प्राप्त होते ह्मणून [ जमीनदारांकडून किंवा मालकाकडून जमीन विकत घेऊन ] अशा जमिनीचे दान देणारास मात्र भूमिदान दिल्याचें फल प्राप्त होतें. 'नि- विष्टं' ह्मणजे व्याज, शेतकी, व्यापार, गुरचराई, तसेंच ( दुसऱ्या अर्थी ) दुसऱ्याची चाकरी इत्यादिक करून जें मिळविलेलें तें. ' निवेश: ' याचे भृति ( चाकरी ), व भोग ( व्यापार ), असे ( कोशांत सांगितल्याप्रमाणें ) दोन अर्थ आहेत. ११८ ' भृतिः' ह्मणजे चाकरी; ' भोगः ' व्याज घेणें वगैरे धंदे. [ मालकी मिळविण्याच्या येथें सांगित- लेल्या शिवाय मार्गांपैकीं] पहिला मार्ग व्याज वगैरे घेणें वैश्याचा आहे; व दुसरा ( चाक- री) शूद्राचा. यासाठी खरेदी वगैरे कारणांनी मालकी उत्पन्न होण्याचा मार्ग हा लोकसिद्धच आहे ( शास्त्रापासून किंवा कायद्यापासून उत्पन्न झालेला नाहीं. ) या कारणावरून आपल्या घरचे गाईस वांसरूं झाल्यास त्यावर आपली मालकी स्थापण्याची जी लो- कांत चाल आहे ती सुयुक्तिकच आहे. पण मालकीचें मूळ जर शास्त्रापासून निघालेलें असतें, तर अशी मालकी उत्पन्न न होती; कारण एकाद्या मनुष्याचे गाईस वांसरूं झा- ल्यास अशी उत्पत्ति मालकीच्या कारणांपैकी एक कारण आहे असें शास्त्रांत [ कोठेही ] सांगितलेलें नाहीं, पण आपली गाय ह्मणून तीस वांसरू झाल्यानें जशी त्या वांसरा- वर आपली मालकी उत्पन्न होते, तशी आपल्या स्त्रीस संतति झाल्यानें संतति होणें हैं त्या संततीवर आपली मालकी प्राप्त होण्यास कारण होणार नाहीं काय ? अशी कोणी शंका घेतली तर तीस ' इष्टापत्ति' ( पाहिजे तेंच मिळालें असें उत्तर देणें ) योग्य होणार नाहीं. कारण " विश्वजित् यज्ञांत सर्वस्वाचें (जे काय वस्तुमात्र कर्त्या - पाशीं असेल त्याचें ) दान करावें " असें वेदवचन आहे, त्यावरून कन्यापुत्रादि- कांचें दान करावें असें प्राप्त होईल आणि [ पूर्वमीमांसाग्रंथाच्या ] सहाव्या अध्या- यांत 'कन्यापुत्रादिकांचें दान करूं नये' असें सांगितलेलें आहे, तेव्हां याचा ( वेद- वचन व मीमांसा यांचा ) परस्परविरोध येईल. [ तर वरील शंकेस हेंच उत्तर कीं] गाई वगैरेवर ज्या प्रकारची मालकी धन्याची असते त्या जातीची मालकी नव- ११९ ११८ अ० कौ० कां० ३ प० श्लो० २४. ११९ मीमांसादर्शनग्रंथांत सहाव्या अध्यायांत सातव्या पादी हा विषय स्पष्ट केलेला आहे (मी- मांसादर्शनं सायं पूर्वषट्कः पृ० ७४२ ४३ कलकत्त्याची प्रत ) १९