पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ व्यवहारमयूख. ११७ लेला अर्थ विशेष प्रस्फुट होत आहे. याच कारणास्तव " स्थावर वस्तु आणि द्विपाद हीं जरी पुरुषानें स्वतः संपादलेलीं असतील, तरी त्यांचें दान किंवा विक्री सर्व पुत्रांस बोला- विल्यावांचून (ह्मणजे ते त्यांत सामील असल्यावांचून ) होत नाहीं ' या स्मृतीत केवळ [ वस्तूंचें ] दान, विक्री, वगैरेस मात्र प्रतिबंध सांगितलेला आहे; त्याचे उपभोगास सांगितलेला नाहीं ; ह्मणून अनेक भावांची वगैरे मालकी पूर्वी जो अस्पष्ट असते ती दायभागानें (वांटणीनें ) स्पष्टपणें ठरविली जाते. कांहीं [ ग्रंथकारांचे ] ह्मण आहे कीं, पूर्वी जी सर्वसामान्य मालकी द्रव्यावर असते ती [ वांटणीनें ] नाहींशी झाली ह्मणजे त्या द्रव्याचे हिश्शांवर एक विशेष प्रकारची मालकी उत्पन्न होते. परंतु एक मा- लकी नाहींशी झाली व दुसरी उत्पन्न झाली अशा कल्पनेत गौरव ( ह्मणजे व्यर्थ विस्तार आहे. ह्मणून [ .असा सिद्धांत करणें विशेष सुयुक्तिक आहे कीं ], द्रव्याचे हिश्शावर [ जन्मादि कारणानें ] जी एक विशेष प्रकारची मालकी उत्पन्न झाली ती अमुक वस्तूंत अमुक मर्यादेपावतों इतकें विभागाने ( वांटणीनें ) स्पष्ट ठरविलें जातें. आतां चालू विषयास अनुसरूं. 'ब्राह्मणस्याधिकं लब्धं ' [ अशी गौतमस्मृति १४१ पृष्ठावर सांगितली आहे ] त्या वचनाचा कांहीं [ ग्रंथकार ] असा अर्थ करितात कीं, प्रतिग्रहाने ( दानाच्या स्वीकारानें ) में ब्राह्मणास प्राप्त झालें तें त्यास विशेष फल देणारें आहे. परंतु त्याचा खरा अर्थ असा आहे की, वारसानें व [या स्मृतीचे पूर्व भागांत सांगितलेले ] इतर द्वारानें मालमत्ता मिळण्याचे जे मार्ग आहेत ते खेरीज क- रून प्रतिग्रह हा एक अधिक मार्ग ब्राह्मणास मात्र आहे. तसेंच लढाईंत जिंकून घेणें वगैरे व [ पूर्वी सांगितलेल्या ] इतर रीति हे क्षत्रियास आणि इतरांस ( ह्मणजे वैश्यांस व शूद्रांस अनुक्रमानें ) शिवाय मार्ग आहेत. ज्या स्थलांत ही पराजित पुरुषाची माल- जमीन, द्रव्यादि, ज्या ज्या वस्तूवर होती त्या त्या वस्तूवर जिंकणाऱ्याची- ही उत्पन्न होते. जिंकलेल्या पुरुषास जर एकादा कर घेण्यापुरता हक्क असेल, तर तितकाच जिंकणारास प्राप्त होतो, त्यास मालकी प्राप्त होणार नाहीं. की घर, माल- की नाहीं ह्मणूनच पूर्वमीमांसा ( अ० ६ ) यांत असें सांगितलेलें आहे की, सार्व- भौमराजानें सर्व पृथ्वीदान देऊं नये व मांडलिक राजानें आपले मंडलाचें सर्व राज्य 46

दान देऊं नये. " सर्व पृथ्वींतील किंवा मांडलिक राज्यांतील दर एक गांव, शेत व- गैरेची मालकी निरनिराळें भूमिकांचीच ( जमीनदारांचीच) आहे. [ जमिनीवर वगैरे ] कर घेण्याचा अधिकार मात्र राजास आहे. या कारणासाठी ज्याला पारिभाषिक ११७ मि० प० ४७ पृ० २; वी० प० १६३ पृ० २; व्य० मा० क० वि०. हें नारदस्मृतीचें वचन आहे, असे कमलाकरांत लिहिलेले आहे.

  • जैमिनीसूत्र, अभ्या० ६, पाद ७, अधिकरण २, 'न भूमिः स्यात्सर्वान्प्रत्यविशिष्टत्वात्.'