पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. ११: १४३ विभागाच्या कालाचा विधायक समजावयाचा; कारण 'विभजेयुः ' ( वांटून घ्यावें ) हैं रू- च विद्ध्यर्थक आहे. उत्तरार्ध हैं [ जो वांटणीचा काळ सांगितला ] त्याच्या स्तुत्यर्थ अमू- न तें पुत्रांचें बापावर अवलंबन दर्शवितें, त्यांची मालकी नाहीं असें दर्शवीत नाहीं. असा अर्थ केल्याने मात्र पुढील शंखस्मृतीचें वचन सुसंगत होतें. तें वचन " जरी पुत्रांच्या [ जन्मा ] नंतर त्यांस स्वतः मिळविलेल्या द्रव्यावर मालकी प्राप्त झालेली असेल तरी ज्या अर्थी ते धर्म व अर्थ ( धर्मसंबंधाची कार्ये व लौकिक संबंधाची कार्ये ) या बाबतीत [ बाप जिवंत असतां ] स्वतंत्र नाहींत, त्या अर्थी "3 त्यांनी बाप जिवंत असेपावेतों द्रव्य वांटून घेऊं नये." येथें ( या स्मृतीचे उत्तरार्धात ) स्वातंत्र्य नाहीं असें ह्यटलेले आहे तें पूर्वी विभाग करण्याचा निषेध सांगितलेला आहे त्याचे मजबुदीसाठीं आहे. 'यद्यपि तैः पश्चात् अधिगतं ' (जरी त्यांस तें नंतर प्राप्त झालेले असेल तरी) असा. पदांचा अन्वय क- रावयाचा. 'तैः ' ह्मणजे पुत्रांनी. 'पश्चात् ' ( नंतर ) ह्मणजे त्यांचे जन्मानंतर. 'अधिगतं' ( मिळालेलें) ह्मणजे प्रतिग्रह वगैरे कारणांनी संपादिलेले. याचा तात्पर्यार्थ इतका कीं, पु- त्रांनी संपादिलेले द्रव्यावर त्यांची विनतकरांर मालकी असतांही जर त्यासंबंधानें ते परतंत्र आहेत तर त्यांचे बापानें संपादिलेले द्रव्याचे संबंधाने त्यांचा परतंत्रपणा त्याहूनही अधिक असला पाहिजे. हा परतंत्रपणा वांटणी करणें, काम्य धर्मकृत्यें, व व्यावहा- रिक इतर कामें इतक्यापुरता आहे असे समजावयाचें ह्मणून हारीत ह्मणतो प जिवंत असेपावेत मालमत्ता घेणें व देणें, [ द्रव्याची ] वांटणी करणें, व कोणास " आदानव रागानें बोलणें या बाबदीत पुत्रांस स्वतंत्रपणा नाहीं. ""४ ( घेणें व देणें ) या शब्दांनी सर्व प्रकारची व्यावहारिक कृत्ये समजावयाचीं, व ' आक्षेप' ह्मणजे दासींस वगैरे शिविगाळ करणें असें मदनाचे ह्मणणें आहे. “ हिरे, मोस्यें, व पोंवळीं या सर्वांचा मालक बाप मात्र आहे; परंतु सर्व स्थावर [ मिळक- तीचे ] बाप किंवा आजा हे मालक नाहीत. अशी (विष्णु) स्मृति आहे ति चा आशय असा आहे कीं, कानांतील बाळ्या, आंगठ्या [ वगैरे दागिन्यांचा ] उपयोग कर- ण्यापुरतें मात्र स्वातंत्र्य बापास आहे, परंतु [ त्या वस्तु ] कोणास देण्यास [ किंवा को- णत्याही प्रकारें फरोक्त करण्यास ] नाहीं. तसेंच पुत्रोत्पत्तीचे कारणानें उत्पन्न हो- णारी पुत्राची मालकी दूर करण्याचाही [ या स्मृतीचा ] हेतु नाहीं. शिवाय उपभोगानें न नासण्याजोग्या अशा हिन्यांचा वगैरे मात्र उल्लेख केलेला अंसल्यामुळे वरील लिहि- 998 19 ११५ " बां- 2 ११३ वी० प० १६१ पृ० १. ' यद्यपि स्यात्पश्चादधिगतं' या ठिकाणी 'यद्यपि स्वाम्यं पश्चादधिगतं ' असा वीरमित्रोदयांत पाठ आहे; ध्य० मा० ११४ व्य० मा० क० वि०. १९५ हैं विष्णुस्मृतिवचन असें कमलाकरांत लिहिलेले आहे; मि. व्य० प० ४७ पृ० १; वी० प० १६० पृ० २. ११६ जी० दा० प० ५५-५६