पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० २ असे समजूं नये. हिंदु लोकांच्या दाव्यांत हिंदु लोकांचे रिवाज अवश्य पाहिले पाहिजेत. एका कज्यांत पुराव्यांत असे दिसून आले की, नवयानें परस्त्री घरी आणिली व अन्य जुलुमाची वागणूक स्त्रीशीं केली त्यावरून स्त्रीनें नवऱ्याचें घर- सोडिलें व ती आ- पल्या आईच्या घरी जाऊन राहिली. पुढे कोणी कोणत्याही प्रकारची सक्ती केली नप्ततांही आईच्या घरीं नवऱ्यापाशी ती नांदत असे. कोर्टाचा ठराव कीं, स्त्री प्रथम नवऱ्याचें घर सोडून गेली तसे करण्यास तिला अधिकार होता. मात्र कांही एक सक्ती नसतां आईच्या घरी नवऱ्याबरोबर राहू लागली यावरून पूर्वीच्या नवऱ्याच्या वागणुकीची क्षमा केली असे समजले पाहिजे. ह्मणून त्यापूर्वी वादीला कोर्ट हुकुम- नामा न देतें तरी क्षमा केलेल्या स्थितींत प्रतिवादी बायकोनें त्याजवळ राहावे असा हुकुमनामा वादीला मिळाला पाहिजे. मात्र ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, नव- राबायकोमध्ये एकानें दुसन्यास क्षमा केली असतां तो क्षमा झालेला अपराध पुन्हां घ डणार नाहीं या शतींवरच दिली आहे असे मानले पाहिजे. जुलमी वागणुकीची क्षमा करून स्त्री नवज्यापाशीं राहायाला जाऊं लागल्यानंतर नवरा पुन्हां तशीच वागणूक करूं लागेल तर पहिल्या खेपेला जितक्या जुलुमाचा पुरावा कोर्ट अपेक्षील तितका दुसऱ्या खेपेस : मागणार नाहीं.. नवरा. पहिल्या वागणुकीवर जाण्याचा रंग आहे असे स्त्रीस मानण्यास कारण झाल्याचा पुरावा झाला ह्मणजे पुरे होईल. बायकोसमक्ष रांडा 'घरांत आणित असे ही नवऱ्याची वागणूक लक्षांत घेऊन कोर्टानें असा ठराव केला कीं, प्रतिवादीला वादीच्या घरी जाण्याचा हुकुम करितेवेळी आणखी कोर्ट असा हुकूम करितें कीं, प्रतिवादी ज्या घरांत राहील त्यांत व्यभिचारिणी स्त्रिया वादीनें येऊं देतां नये. हा हुकूम बिनतकार प्रतिवादीनें मानिला असतां दाव्याचा खर्च तिजवर बसूं नये-- ( जगेंद्रनंदिनी दासी वि० हरीदास घोस इं० ला० रि० कल० व्हा० ५. पा० १५००). A ( ४६.) पतीला व पत्नीला परस्परांचें धन वास्शानें घेण्याचा हक्क कोणत्या प्रसंगी येतो याविषयीं दायग्रहणप्रकरणांत पहावें. तसेच स्त्रीला भरणपोषणाचा अ- धिकार विवाहानें येतो तो केव्हां बाधित होतो त्याविषयीं पोषणसदरांत पुढे विचार होईल. परंतु नवरा व बायको ह्यांपैकी बायकोनें आपला पोटगीचा हक्क सोडल्याची. फारखत दिली असली, तरी त्या फारखतविरून तिच्या नवऱ्याने आपली स्वसंपादित इष्टेट कोणास बक्षीस दिली असली तरी तेवढ्यानें त्या मिळकतींतून पोटगी मागण्याचा नवऱ्याच्या पश्चात् तिचा हक्क जात नाहीं." ५१ (४७.) आतां, नवराबायकोच्या हयातीत विवाह रद्द कसा होतो याविषयीं ५१. नर्मदाबाई वि. महादेव नारायण इं. ला. रि. ५. मुं. ९९