पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. दाय ह्मणजे काय याचा निर्णय. १४१ अशी मालकी शास्त्रावरून स्थापित कर- दायादिक (वारसा वगैरे) यांचे निर्णयास उपयोगी जें स्वत्त्व ( मालकी) त्याचें स्वरूप आतां सांगतों. विकत घेणें वगैरे, व दान घेणें वगैरे, क्रियेनें उत्पन्न झालेला जो विशेष धर्म त्यांचे नाव स्वत्त्व ( मालकी ). विकत घेण्याचे वगैरे कारणानें मालकी उत्पन्न होते हैं लौकिक व्यवहारावरून समजतें. ण्याची जरूर नाहीं. कारण ज्यांस शास्त्र समजत नाहीं त्यांस मालकी ह्मणजे काय हैं। समजते. शास्त्रापासून [ मालकी ] उत्पन्न होते अशी कल्पना केल्यास गौरवाचा ( व्यर्थ कल्पनाविस्तार केल्याचा ) दोष येतो. नयविवेक नांवाचे ग्रंथांत भवनाथाचें असेंच ह्मण आहे. आतां " वारसा, खरेदी, वारशाचा विभाग, [ बिनवारस स्वल्प किं- मतीची वस्तु ] घेणें, [ पुरलेलें द्रव्य ] सांपडणें, या कारणांपासून मालकी उत्पन्न होते ; [ पण ] दान घेणें वगैरे हा ब्राह्मणास जिंकून घेणें हा क्षत्रियास, व वैश्य आणि शूद्र यांस [ अनुक्रमानें ] व्यापाराचे व चाकरीचे द्वारें पैसा मिळविणें हा [ मालकी उत्पन्न होण्यास ] आणखी एक मार्ग आहे " अशी जी गौतमाची स्मृति आहे ती मालकी उत्पन्न होण्यास जीं कारणें लौकिकांत ठरलेलीं आहेत त्यांचीच अनुवादक आहे, [ अपूर्व नाहीं ] असें समजावें. ज्या कोणत्याही वस्तूवरील पहिल्या मालकाच्या मालकीचा नाश झाल्यानें मात्र आपली मालकी उत्पन्न होते त्या वस्तूम लोक रिक्थ हा शब्द लावितात. विकत घेणें वगैरे व दान घेगें वगैरे इत्यादिकांनी ज्या वस्तूवर मालकी उत्पन्न होते त्या वस्तूस रिक्थ शब्द न लागावा ह्मणून 'मात्र' हें पद घातलेले आहे.* वरील गौतम- वचनांत स्वामीच्या मालकीचे नाशाचे वाचक रिक्थपद होय, कारण क्रयादिक जे स्वत्त्व साध्य करण्याचे उपाय ह्मणून सांगितलेले आहेत त्यांत रिक्थपदाची गणना आहे, तेव्हां १०७ रिक्थ हा शब्दही उपायवाचकच झाला पाहिजे. १०४ य ( ङ ) ( च ). 6 दुसरें कारण असें कीं, 'नगृहीत १०५ जी० दा० प० १४ परंतु या ह्मणण्याविषयीं तर्कसंग्रहदीपि- १०६ जी० दा० प० २५. १०७ मि० व्य० प० ४६ पृ० १. केत शंका घेतलेली आहे: प० ४६. वी० प १६ १ पृ० २; क० वि०; व्य० मा० .

  • विकत घेणें इत्यादि स्थलांत क्रयादि तसाच स्वामिस्वत्वध्वंस अशीं अनेक कारणे असतात. प- रंतु ‘ रिक्थ ' स्थलांत स्वामिस्वत्वध्वंस हेंच केवळ कारण आहे.

१०८ ' अगृहीतविशेषणा बुद्धिर्विशेष्ये नोपजायते ' असा न्याय आहे. त्याचा अर्थ असा कीं, पदार्थाचे गुणांचे किंवा धर्माचें ज्ञान झाल्यावांचून पदार्थाचें होऊं शकत नाहीं. ( नागेशरुत लघुमंजूषायं- थांत नामार्थवादप्रकरणांत हैं स्पष्ट केलेले आहे. ) उदाहरणार्थ 'दंडी' असें ह्यटलें, तर दंड पदार्थ सम- जल्यावांचून तद्गुणविशिष्ट दंडी पदानें जे समजावयाचें त्याचें ज्ञान होणार नाहीं. तद्वत् स्वत्त्वनाशरूप धर्मांचें किंवा गुणाचे ज्ञान प्रथम झाल्यावांचून तो गुण ज्यावर आहे अशा 'रिक्भाचे ' ज्ञान होणार नाहीं. -