पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० व्यवहार मयूख. कारण ( १०३ ) सामान्य विपत्ति ही नेहेमी होणारीच आहे, असें मिताक्षरेंत आहे. कात्यायन " [ शपथ घेतल्यापासून ] चवदा दिवसांचे आंत राजाचे किंवा ईश्वराचे कृतीने घडलेली एकादी मोठी भयंकर विपत्ति शपथ घेणारावर येणार नाहीं, तर तो शपथेनें पवित्र झाला असें समजावयाचें. " 'व्यसनं ' ह्मणजे विपत्ति; 'घोरं ' फार इजा देणारी, कारण कीं, वाचस्पतिमिश्र व स्मार्तभट्टाचार्य यांचे ह्मणण्याप्रमाणे, मानवशरिरास लहानसहान धोके होणें हें स्वाभाविकच होय. कात्यायन पुनः सांगतो " आतां जेथें खोटी शपथ घेतलेली असून दोन आठ- वड्यांचे आंत ईश्वरी कृतीनें उत्पन्न झालेली विपत्ति [ खोटी शपथ घेणारास ] प्राप्त होईल, तेथें ज्या वस्तूबद्दल दावा केलेला असेल ती वस्तु दंडासुद्धां [ त्याजकडून ] देव- वावी. जेव्हां [ दिव्य करणाऱ्या ] पुरुषाला मात्र एकादा रोग उत्पन्न होईल, आगीनें त्याचे एकट्याचे नुकसान होईल, किंवा जवळच्या नातलगास मृत्यु येईल, पण इतर सर्वांस असें होणार नाहीं, तेव्हां त्या [ दिव्य करणाऱ्या ] मनुष्याकडून कर्ज [ह्मणजे दाव्यांत मागितलें होतें तें ] देववावें व शिवाय दंड देववावा. ताप, अतिसार, गळत्रें, खोल हाडांचे आंत ठणका, नेत्रांस किंवा गळ्यास रोग होणें, किंवा वेड लागणें, किंवा मस्त- 19 कशूल होणें, आणि हात मोडणे, हे रोग ईश्वराचे [ कोपानें ] मनुष्यास उत्पन्न होतात. ' " ' दैवविसंवादे ' ह्मणजे ईश्वरी कृतीने उद्भवलेली विपत्ति, जसें ज्ञातींतील पुरुष मरणें वगैरे. [ खोट्या शपथेबद्दल दैविक कृतीने किंवा विकोपाने होणारी ] विपत्ति त्या एकट्यासच ' झाली तर असें मुळांत आहे, ह्मणून सर्व देशभर पसरणारा रोग झाल्यास तें दैविक विकोपाचें लक्षण समजावयाचें नाहीं. येथें ' तस्य ' या पदानें असें स्पष्ट होतें कीं, ज्यानें खोटी शपथ घेतली ( खरं बोलण्याबद्दल शपथ घेऊन खोटें बोलला ) `त्यासच जर रोगादि विपत्ति झाल्या, तर मात्र ते खोट्या शपथेचें लक्षण; परंतु त्या मा- णसाचे पुत्रास वगैरे विपत्ति आल्यास तें लक्षण नव्हे. ती विपत्तिही सामान्य असूं नये, मोठी भयंकर असावी, हें पूर्वी सांगितलेच आहे. अशाच अभिप्रायानें वाचस्पति- मिश्र ह्मणतो की " ज्याने खोटी शपथ घेतली त्यासच जर कांहीं महान रोगादिविप- त्ति झाल्या, तर मात्र त्या अन्यायाचे लक्षण समजवायाचें. " ह्मणूनच जवळच्या नातलगास मृत्यु आल्यास, असें ह्यटलेलें आहे; नातलगास रोगादि झाल्यास, असें ह्यटलेलें नाहीं. ( १०३ ) मि० व्य० प० ४५ पृ० १.