पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. पाप दूर करण्यासाठीं द्विजांनी सरस्वतीदेवीस चरुयाग करावा.. १०२ " १३९. शूद्रास [ खालीं लि-- हिलेलें ] प्रायश्चित्त विष्णु सांगतो " दहा गाईंस एक दिवस पुरण्याजोगी वैरण शूद्रानें: द्यावी. "०" ' ऐकाहिकं ' ( एक दिवसाची वैरण) ह्मणजे एक दिवसभर त्यांस खाण्यास जितकें लागेल तितकें.. [ व्यवहारमयग्रंथांत ह्या ठिकाणी 'दिव्यप्रकरण सांगितलें आहे. परंतु ज्या अर्थी सांप्रत व्यवहारांत तो प्रकार बंद झाला असल्यामुळे त्याचा आतां व्यवहार- दृष्टीनें तादृश उपयोग राहिलेला नाहीं, त्या अर्थी तें प्रकरण भाषांतरांतून गाळलें आहे.. याज्ञवल्क्यस्मृतीसहित व्यवहारमयूख मूळग्रंथ आह्मी निराळा छापिला आहे त्यांत हें प्रकरण आहेच. तेथें तें सांपडेल : पृ० १६-३०. शपथ घेणें हां दिव्य घेण्याचाच एक प्रकार आहे व तो अद्यापि कायम आहे, आणि जरी सांप्रत दिवाणी कामांत वगैरे शपथ घेण्याची वहिवाट [ आक्ट १०, स० १८७३ प्रमाणें ] चालते, तरी केवळ मराठी वाचणारांस या प्रकरणावर नीलकंठाचे विचार काय आहेत हे समजण्यासाठी शपथ - करणाचें भाषांतर दिलें आहे. ] शपथ. मनु (अ० ८ श्लो० ११३ ) " ब्राह्मणानें आपल्या सत्याची शपथ करावी; क्षत्रि- यानें आपली बसण्याची जनावरें व वस्त्रे यांची शपथ घ्यावी; वैश्यानें आपल्या गाई, धान्य, किंवा सोनें यांची, आणि शूद्राने सर्व पातकांचे नांवानें शपथ घ्यावी. " बृहस्पति 66 [ मनुष्याचें ] सत्य, बसण्याची जनावरें, शस्त्रे, गाई, धान्य, व सोनें, देवब्राह्मणांचे पाय,. आणि आपल्या पुत्रांचीं व स्त्रीचीं शिरें हे शपथ घेण्याचे [ प्रकार ] लहानसहान तंट्यांत उपयोगाचे आहेत. साहसाचे (मोठ्या अपराधांचे) व शिव्यागाळ्यांचे मुकदम्यांत दिव्य करवून चौकशी करावी. 66 याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ११३ ) “ शपथ घेतल्यापासून चौदा दिवसांचे आंत शपथ घेणाराला देवाच्या किंवा राजाचे कृतीनें घडणारी अशी एकादी भयंकर विपत्ति जर प्राप्त होणार नाहीं, तर तो निःसंशय निर्दोष होय... "३ 6- घोरं ' ( मोठी भयंकर ).. १०१ वी० प० ५८ पृ० २. १०२. बी० प० ५९ पृ० १