पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ व्यवहारमयूख. सबळ, दोन्ही पक्षांकडे सारखेच गुणी पुरुष असल्यास त्यांतही जे अत्यंत गुणसंपन्न त्यांची साक्ष ग्राह्य होय. " साक्ष देण्याचे कबूल केल्यानंतर जो साक्षी साक्ष देणार नाहीं त्यास शिक्षा तोच • स्मृतिकार सांगतो ( व्य० श्लो० ७६ ) " जो मनुष्य [ प्रथम कबूल असूनही ] जवानी देणार नाहीं त्याजकडून राजानें दाव्याची सर्व रक्कम व शिवाय [ तिचा ] एकदशांश शेचाळिसावे दिवशी देवावा. " ' सर्व ' ह्मणजे पुरा दावा व्याजासुद्धां ' सदशबंधक' ( दहाव्या हिश्शासहित) ह्मणजे [ दाव्याचा ] दहावा हिस्सा दाव्यांत मिळवून होईल ती एकंदर रक्कम. मिताक्षरा ग्रंथांत लिहिलेलें" आहे कीं, वरील दहावा हिस्सा राजानें घ्यावा व धनकोनें व्याजासुद्धां आपली रक्कम घ्यावी. करावें. ” ९८ 66 ९९ [· दाव्यांत मागितलेले विषयांसंबंधी ] माहिती असूनही जो साक्ष देण्याचें बुद्धि- `पुरस्सर नाकबूल करील, त्यास त्याच स्मृतिकारानें शिक्षा सांगितलेली आहे (याज्ञ० व्य ० लो० ८२ ) साक्ष देण्यास बोलाविलेले असून उन्मत्तपणानें जो पुरावा छपवितो, त्यास [ दाव्याच्या रकमेचे ] आठपट दंड करावा; " [ तो ब्राह्मण असल्यास ] त्यास हद्दपार ज्या पक्षाचा दावा बुडेल त्यास [ त्या कारणानें ] जो सर्व दंड भरावा लागेल त्याने आठपट दंड अशा साक्षीस करावा. ब्राह्मणाच्याने हा दंड देववत नसल्यास त्यास हद्दपार करावें. क्षत्रिय व [ खालचे ] इतर वर्ण यांजकडून त्यांच्या त्यांच्या धंद्याचें काम करून ध्यावें असें मिताक्षराग्रंथकार ह्मणतो. मनु ( अ० ८ श्लो० १०८ ) “ साक्षीनें साक्ष दिल्यापासून सात दिवसांचे आंत जर त्याला दुखणें येऊन पीडा होईल, आगीनें त्याचें नुकसान होईल, किंवा संबंध्याला मरण येऊन त्यापासून वाईट होईल, तर • या साक्षीकडून सर्व दावा व दंड देववावा.” याज्ञवल्क्य (व्य० श्लो० ८० ) " साक्षी- चा पुरावा घेतल्यावरही, जर विशेष विश्वासास योग्य असे साक्षी किंवा पहिल्यानें जि- तके साक्षी झाले त्यांचे दुप्पट साक्षी, पहिल्या साक्षींच्या विरुद्ध पुरावा देतील, तर पहिले साक्षी खोटे पडतात [असें समजावें ]. " नारद " [ लेखी किंवा साक्षी ] पुरावा असल्याबद्दल जर पूर्वी पक्षकाराने [ कोर्टास ] कळविलेलें नसेल, तर मुकदम्याचा निकाल झाल्यानंतर तो पुरावा व्यर्थ होतो; मग तो साक्षिरूपी असो किंवा लेखी असो. " कांहीं विशेष मुकदम्यांत खोटी साक्ष देण्यास मोकळीक, व त्याबद्दल प्रायश्चित्त काय करावें, यांबद्दल याज्ञवल्क्य सांगतो ( व्य० श्लो० ८३ ) " [ खरें बोललें असतां ] चार वर्णातील कोणा पुरुषांस देहांत शिक्षा होण्याचा जेथें संभव असेल अशा ठिकाणी साक्षीनें असत्य बोलल्यास कदाचित् चालेल. [ अशा असत्य बोलण्यापासून घडलेले ] ९६ वी० प० ५४ पृ० २. ९९ मि० व्य० प० ३१ पृ० २. ९७ मि० व्य० प० २९ पृ० २. १०० वी० प० ३४ पृ० १. ९८ वी० प० ५७ पृ० २.