पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीलकंठीय. १३७ दिला जातो तो. ' अन्यथा ' ह्मणजे जेथें खुनाच्या खुणा असतील तेथें. तोच स्मृतिकार ह्मणतो " साक्षींच्या जबान्या घेण्याचे काम आजचें उद्यावर राजानें कधीं ढकलू नये, कारण [ दरम्यान जो काल जातो त्यांत ] धर्मकृत्यांचा लोप झाल्यामुळे ( वेळचे वेळेस कार्य न केल्यानें ) मोठें पातक घडतें. १९४ नारद “ शास्त्रोक्त आचाराने चालणारे ह्मणून प्रसिद्ध व ज्यांस तंट्यांतील वि- षयाची माहिती आहे अशा सर्व साक्षींस बोलाविल्यावर व त्यांस शपथेनें निर्वाधित केल्या- नंतर त्यानें ( ह्मणजे न्यायाधिशानें ) त्यांच्या जबान्या निरनिराळया घ्याव्या. " वसिष्ठ " जे कृत्य सर्व साक्षींनी मिळून जसें पाहिलें असेल तें त्यांनी त्याच रीतीनें सांगावें (स- वनी मिळून सांगावें ); पण जें कृत्य त्या सर्वांनी मिळून न पाहातां निरनिराळें पाहिलें असेल तें प्रत्येकानें निरनिराळे सांगावें. जेथें एकादें कृत्य साक्षींचे समजण्यांत निरनिराळे वेळेस आलेलें असेल, तेथें साक्षींच्या जबान्या निरनिराळ्या घ्याव्या, असा नियम ठरविलेला आहे. मनु ( अ० ८ श्लो० ११३, १०२ ) " सत्याची शपथ ब्राह्मणाकडून घेववावी; क्षत्रियाकडून त्याची शस्त्रं व बसण्याची जनावरें यांची शपथ करवावी; वैश्याकडून त्याच्या गाई, धान्य, व सोनें यांची; व शूद्राकडून खोटें बोलेन तर सर्व पातकें माझे मस्तकीं पडोत, असें ह्मणवून शपथ करवावी. जे ब्राह्मण गुरे राखण्याचें काम करतात, व्यापारधंदा कर तात, शिल्पकाम करतात, जे नाचण्यावर, गाण्यावर, उपजीविका करतात, जे रोजानें नो- करी करतात, व जे फार व्याज घेऊन [ व्याजवट्याचा ] धंदा करतात, त्यांस शूद्राप्रमाणें गणावें. " जे आपापल्या धर्माच्या कार्यापासून पतित झाले आहेत, जे दुसयानें दिलेले अन्नावर निर्वाह करतात, व द्विजाचे अधिकार मिळावे ह्मणून जे इच्छा करतात, त्यांस शूद्राप्रमाणें मानावें ”. ‘ खाँटें वोलशील तर तुझ्या सत्याचा नाश होईल ' [ अशी शपथ ब्राह्मणाकडून करवावी ] व इतरांविषयीं ही वर सांगितल्याप्रमाणे, असा अर्थ. साक्षींच्या जवान्यांच्या खरेपणाची किंवा खोटेपणाची परीक्षा पाहण्याची रीति बृहस्पति सांगतो 66 १५ [ जबानी देणारानें ] दिलेला पुरावा त्याचा देश, काल, वय, दाव्याची वस्तु, नांव व जाति यांशी सुसंगत असेल किंवा त्या [ गोष्टीं] वरून पुरावा खरा ह्मणतां येईल, तर दा- व्यांतील तक्रारीची शाबिती झाली असें राजाने ठरवावें. " एकमेकांविरुद्ध साक्षींच्या जवान्या पडल्यास तेथें निर्णय करण्याचा नियम याज्ञवल्क्य सांगतो (व्य० श्लो० ७८ ) " साक्षींचे पुराव्यांत विरोध आल्यास जास्ती साक्षींच्या संख्येनें जें शाबीत तें सबळ; एकमेकांविरुद्ध साक्ष देणारे साक्षींची संख्या सारखीच असल्यास तेथें गुणी पुरुषांची साक्ष ९४० ५० ५३ पृ० १. ९५ हे वचन बृहस्पतीचें आहे. (बी० प० ५४ पृ० १) १८